Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

शक्तिपीठ महामार्गावर एक जुलैला रस्ता रोको, शेतकऱ्यांचा संघर्ष!

Sarfaraj Musa
Jun 27, 2025 09:40:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शक्तिपीठ विरोधात १ जुलै कृषी दिनी अंकली येथे रास्ता रोको आंदोलन, मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना काळापासून धिंड काढत ठोकून काढण्याचा इशारा.. अँकर - शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात येत्या एक जुलै कृषी दिनी सांगलीच्या अंकली येथे सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात येणार आहे.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासून त्यांची धिंड काढत,ठोकून काढू,असा इशारा देखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग हा धोकादायक असून कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे, यासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावरची लढाई करण्यासाठी एक जुलै कृषी दिन, अंकली या ठिकाणी नागपूर-रत्नागिरी महामार्गावर सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा जाहीर करण्यात आले आहे. बाईट - महेश खराडे - जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,सांगली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement