Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात महिला आयोगाची तत्काळ कारवाई!

Mahendrakumar Mudholkar
Jun 28, 2025 05:32:44
Beed, Maharashtra
बीड: अल्वयीन मुलीचे लैंगिक छळ प्रकरण; आरोपींना अटक होईपर्यंत उमाकिरण क्लासेस सील करून सीसीटीव्ही ताब्यात घ्या, महिला आयोगाचे बीड पोलिसांना निर्देश...! Anc : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची प्रसारमाध्यमांवर झळकलेली बातमी पाहून राज्य महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली आहे. उमा किरण क्लासेसमधील दोन प्राध्यापकांवर गंभीर आरोप असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं असल्याचं आयोगाने नमूद केलं आहे. आरोपी निश्चित होईपर्यंत क्लासेसची इमारत सील ठेवावी, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं, व फरार आरोपींचा शोध घ्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. इतर विद्यार्थिनींच्या तक्रारींचीही नोंद घ्यावी, अशी सूचना आहे. आयोगाने या प्रकरणी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ ईमेलद्वारे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान आरोपींना अटक करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नागरिक एकवटले असून आज सर्वच शाळा महाविद्यालये बंदची घोषणा करण्यात आली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement