Back
पत्नीचा हल्ला: पतीने कोयत्याने केला हल्ला, अंबरनाथमध्ये गडबड!
Ambernath, Maharashtra
पत्नी नेमकी कुणाची? पतीचा सोडून गेलेल्या पत्नीवर हल्ला
तर वाचवायला आलेल्या दुसऱ्या पतीवरही कोयत्याने वार
अंबरनाथच्या गजबजलेल्या शिवमंदीर रोडवर घडली घटना
Amb wife attack
Anchor : पत्नी नेमकी कुणाची? या वादातून पहिल्या पतीने आपल्या सोडून गेलेल्या पत्नीसह तिच्या दुसऱ्या पतीवर कोयत्याने वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईच्या फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Vo : अंबरनाथ पश्चिमेला राहणारे वैशाली पितळे आणि तिचे पती महेश पितळे हे शुक्रवारी २७ जून रोजी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवरील एका ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी वैशालीचा पहिला पती लाभेश प्रभाकर म्हात्रे हा रिक्षा घेऊन तिथे आला आणि त्याने वैशालीवर धारदार कोयत्याने हल्ला चढवला. यात वैशालीच्या दोन्ही हातावर आणि गुडघ्यावर वार करून लाभेशने तिला गंभीर जखमी केलं. यावेळी वैशालीला वाचवण्यासाठी तिचा दुसरा पती महेश पितळे हा मध्ये पडला असता त्याच्याही हातावर लाभेश म्हात्रेने कोयताने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या वैशाली आणि महेश यांनी सुरुवातीला जवळच्या शोभा हॉस्पिटल आणि तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी धाव घेतली. मात्र तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी लाभेश मात्रे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला. याप्रकरणी त्याच्या विरोधात गंभीर हत्याराने दुखापत करणे, यासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement