Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम: खड्ड्यांनी भरलेले रस्ते, प्रवासी संकटात!

GANESH MOHALE
Jul 05, 2025 11:08:42
Washim, Maharashtra
वाशिम: File:0507ZT_WSM_DAVHA_SUDI_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम  अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डव्हा–अनसिंग–सुदी या ग्रामीण मार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे मार्ग चिखलमय व धोकादायक झाला आहे. या मार्गांवरून प्रवास करताना वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांची खोली व जागा लक्षात येत नाही, परिणामी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी अथवा पुनर्बांधणी न झाल्याने परिसरातील ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.अखेर या तणावाला कंटाळून अनसिंग येथील नागरिकांनी हातात टिकास व फावडे हाती घेऊन मुरूम व खडीने स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.रस्त्याचे योग्य डागडुजी काम न करणाऱ्या बांधकाम विभागाचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला असून,प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.आता तरी संबंधित बांधकाम विभागाने जागे होऊन त्वरित रस्त्याची डागडुजी करावी,जेणेकरून प्रवाशांचे व गावकऱ्यांचे होणारे हाल थांबतील अशी मागणी गावाकऱ्याणी केली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement