Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

पोलीस अधिकारी आणि माजी आमदाराच्या मुलामध्ये बुलेट गाडीवर वाद!

PRASHANT PARDESHI
Jul 05, 2025 14:33:21
Dhule, Maharashtra
ANCHOR - वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि माजी आमदाराच्या मुलामध्ये शाब्दिक वाद झाला. बुलेट गाडी अडवल्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला. शहरात वाहतूक शाखेकडून, बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई सुरु आहार, त्यादरम्यान स्वतः पोलीस अधिकारी सागर देशमुख उपस्थित होते. या कारवाईदरम्यान धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल जवळ पोलीस अधिकारी सागर देशमुख कारवाई करीत असताना, माजी आमदार फारुक शहा यांच्या मुलाची देखील गाडी अडवत फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे दंड भरण्यात सांगितला. याचा राग आल्यामुळे माजी आमदार फारुक शहा यांच्या मुलाने देखील पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांनी इंगा दाखवातच माजी आमदार पुत्र नरमला, मात्र भर चौकात माजी आमदार पुत्राची दमबाजी पाहायला मिळाली. यावेळी पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी माजी आमदार यांचे मुलाला ताब्यात घेण्यात सांगितले व फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे दंड भरावाच लागेल, कोणीही असो कायदा सर्वांना सारखा आहे असे ठणकावून सांगत त्याच दंड भरण्यास सांगितले. तर काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. Byet - सागर देशमुख, पोलीस उपधीक्षक प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement