Back
शरद पवार गटाला चंद्रपूरमध्ये मोठा धक्का, 15 पदाधिकारी अजित पवार गटात!
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 3006ZT_CHP_NCP_SP_JOLT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक आणि 11 पदाधिकारी उद्या अजित पवार गटात करणार प्रवेश, अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान शहराध्यक्ष दीपक जयस्वाल आहेत प्रमुख चेहरा
अँकर:--चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का अपेक्षित आहे. शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक आणि 11 पदाधिकारी उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्यासह मंगला आखरे, राजू आखरे आणि विनोद लभाने यांचा समावेश आहे. उद्या मुंबईत संध्याकाळी हा पक्षप्रवेश होणार आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठं पाठबळ मिळाले असून दुसरीकडे शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement