Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन: स्मारकाची दयनीय अवस्था पाहून शरद पवार चकित!

SHRIKANT RAUT
Jul 01, 2025 10:33:21
Yavatmal, Maharashtra
AVB Anchor : आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या गहुली येथील वसंतराव नाईक यांच्या दुर्लक्षित व दयनीय अवस्था झालेल्या स्मारका शेजारी त्यांची जयंती साजरी करून, शासनाप्रती रोष व्यक्त केला. वसंतराव नाईक यांच्या स्मृती जिवंत राहाव्या  यासाठी शासनाने 100 कोटीं रुपयाचा निधी त्यांच्या जन्मशताब्दीला घोषित केला होता.  त्यापैकी 10 कोटी रु. चा निधी हा त्यांच्या पुसद तालुक्यातील गहुली या जन्मगावी स्मारक आणि संग्रहालयासाठी खर्च झाला, हे स्मारक आणि संग्रहालय आठ वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. या वास्तूची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या वास्तूच्या खिडक्यांची तोडफोड करण्यात आली असून येथील बरेचसे साहित्य लंपास करण्यात आले आहे. ही एक प्रकारे स्व. वसंतराव नाईक यांची विटंबना आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी केल, या वास्तू चे लोकार्पण लवकरात लवकर करून सामान्य नागरिकांसाठी खुले करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली. बाईट : शरद मैंद, प्रदेश सरचिटणीस राकॉ sp
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement