Back
येवला शहरात चोरट्यांनी मांडला उच्छाद, गाडी चोरीची धक्कादायक घटना!
Yeola, Maharashtra
अँकर :-येवला शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून भुरट्या चोरानंतर आता चोरट्यांनी विठ्ठल नगर भागातून चार चाकी वाहनाची चोरी केली आहे. विपुल किशोर भावसार यांच्या मालकीची ईरटीका गाडी चोरी चोरी गेली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत असून पोलिसांची संख्या वाढून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nashik, Maharashtra:
nsk_bhovari
-
Anc :- उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याच्या पायथ्याशी असलेला भोवरी धबधबा प्रवाहित झाला असून, भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.पावसामुळे सप्तशृंगी घाट व डोंगर परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे.घाटातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहे.निसर्गाचा हा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक व भाविकांचे सप्तशृंग गडाकडे वळू लागले आहे.
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_Mountaineer
सातारा - साताऱ्यातील कोणेगाव येथील गिर्यारोहक मानसिंह चव्हाण यांनी हिमाचल प्रदेशातील 6111 मीटर उंच माउंट युनाम शिखर यशस्वीपणे सर केले. देशभरातून ३० गिर्यारोहक सहभागी झालेल्या मोहिमेत केवळ ७ जण शिखरावर पोहोचू शकले. त्यात मानसिंह चव्हाण यांच्यासह पुण्याच्या कृष्णा मरगळे आणि अनंता कोकरे यांचा समावेश होता.कडाक्याच्या थंडीमध्ये, ऑक्सिजनच्या कमतरतेसह अनेक नैसर्गिक आव्हानांना तोंड देत त्यांनी ही कामगिरी पार पाडली. मोहिमेपूर्वी टप्प्याटप्प्याने उंची वाढवत शरीर सवयीचं (Acclimatization) करण्यावर भर देण्यात आला. रात्री २ वाजता सुरू झालेल्या चढाईनंतर सकाळी १० वाजता शिखर सर झाले.या मोहिमेत देशभरातील विविध राज्यांतील गिर्यारोहक सहभागी झाले होते. उंचीवर होणाऱ्या त्रासामुळे काहींना माघार घ्यावी लागली. मात्र मानसिंह चव्हाण यांच्यासह इतर गिर्यारोहकांनी चिकाटी आणि जिद्दीने हिमशिखर सर करत मराठमोळा अभिमान उंचावला.
byte
0
Share
Report
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग
आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस, धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी, व्हिडिओ व्हायरल!
महाराष्ट्राची चेरापुंची म्हणून प्रसिद्ध आंबोलीतील मुख्य धबधब्या जवळ कर्नाटकातील काही तरुण धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्या थांबवून जोरजोरात हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध उभे राहून नाचणे, जोरात आरडाओरडा करणे आणि सार्वजनिक शिस्तभंग करणारे प्रकार करताना दिसत आहेत. या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक प्रशासनाने यावर कारवाई करावी अशा मागणीला जोर धरू लागला आहे. अश्याच कृत्यातून आंबोलीचे नाव खराब होत, सोबत हुल्लडबाजी केवळ सामाजिकदृष्ट्याच नव्हे तर पर्यावरणीय दृष्ट्याही चिंतेची बाब मानली जात आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn hijab issue av
fees attched
हिजाब का घालू देत नाही' म्हणत टोळक्याचा महाविद्यालयात धिंगाणा
ANC - परीक्षेदरम्यान परीक्षार्थीना हिजाब का घालू देत नाही म्हणत प्राचार्याच्या केबिनमध्ये धिंगाणा केल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पीईएस महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
अर्जात नमूद असल्याप्रमाणे एमआयएम विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी असल्याचे म्हणत टोळक्याने प्राचार्याच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी मुलींना हिजाब का घालू देत नाही याबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली. चर्चा सुरू असताना त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव घेतले. आम्ही तुला धडा शिकवू, अशी धमकी दिली. प्राचार्य यांनी इम्तियाज यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांनी या सर्व प्रकारचे खंडन करून या प्रकरणांशी कुठलाही संबंध नाही. आपण कोणत्याही व्यक्तीला त्याठिकाणी पाठवले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर प्राचार्य वाडेकर यांनी छावणी पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार अर्ज सादर केला..
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
संजय राऊत
*संजय राऊत ऑन ट्वीट*
* या ट्विट चा अर्थ काय असणार सकाळी उठल्यावर आपण आपल्या माणसांना जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत मला सवय आहे
* नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री अमित शहा देशाचे गृहमंत्री फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या तिघांनी मिळून शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही सांगितलं आहोत आम्ही अजून *टायगर अभी जिंदा है जगे जगे पे* आणि 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचा त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे पाच जुलै चा
* मराठी भाषे संदर्भात किंवा हिंदी सक्ती संदर्भात मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त केला हा विजय या महाराष्ट्र द्वेष्टे वरचा विजय प्राप्त
* देशाचे त्यांनी ज्या पद्धतीने शत्रूला कधी प्रिय म्हटलं पाहिजे शिवसेनाप्रमुखांनी सांगितला आहे शत्रू तोलामोलाचा असला पाहिजे महाराष्ट्राच्या दुश्मनांना आम्ही जो काल संघर्ष झाला आम्ही त्या दुश्मनांना दाखवलं महाराष्ट्र एकजूट काय आहे ती
* *हेट द सीन बट नॉट द सिन्नर* पापाचा द्वेष करा पण पाप्याचा करू नका असा एक इंग्रजीमध्ये सुविचार आहे
* आणि असे जेव्हा दुश्मन महाराष्ट्राच्या समोर राहतील तेव्हा संघर्ष करायला शिवसेनेला असेल किंवा माननीय उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शरद पवार असतील आम्हाला माझ्या येथे आम्ही लढणारे लोक आहोत त्यांना वाटलं असेल की त्यांनी जे घाव घातले त्याच्यामुळे महाराष्ट्र कोलमडून गेला असणार शिवसेना कोलमडून गेली असेल पण अजिबात नाही आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार
* माझं काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहेत तिथे हा 16 करावा पण त्याचबरोबर शिवसेना आधी शिवतीर्थ मिळावा या कार्यक्रमासाठी यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे
* कारण मराठी माणसाचा सोहळा हा शिवतीर्थ येथे व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे अनिल परत त्यासाठी प्रयत्न नक्कीच करत आहेत पण हे सरकार याची आम्हाला परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे शिवतीर्थ वर जिथे शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणसा एकजुटीचा जन्म झाला त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोम चा पर्याय सुचवला आणि तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारला त्या संदर्भात काल आमची एक बैठक ही झाली त्या कार्यक्रमात साधारण कार्यक्रम स्वरूप कसा असावा किती माणसं येतील सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली
* पाच जुलैला साधारण बारा ते साडेबारा दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्याविषयी आता शंका असल्याचे कारण नाही पण या लढ्याचे सहभागी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू
* आम्हाला दिल्लीला हेच दाखवायचा आहे जेव्हा जेव्हा दिल्लीने आघोरी कायद्याच्या आधारे किंवा सत्याचा आधारे आमच्यावर हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकतीने उसळून उभा राहिला नरेंद्र मोदी अमित शहा यांना दाखवायचे आहे आणि त्यांना जय महाराष्ट्र
*ऑन राज ठाकरे पत्रकार परिषद विधान*
* हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे हा मोर्चा असेल विजय मेळावा असेल याला पक्षी लेबल लावू नका हे जरी खरं असलं तरी या सोहळ्याचा आयोजन शिवसेना आणि मनसे एकत्र करत आहे हे देखील तेवढा खर आहे दुसरं कोणी करीत नाही
* या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी होते हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही आपण असे कितीही बोललो नाही केलं तरीही दोन पक्षांच्या माध्यमातून हे सगळे घडत आहे
*ऑन देवेंद्र फडणवीस दोन भाऊ एकत्र*
* देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे काय शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाही देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढला असेल शिवसेना फोडण्याचा तरी मराठी माणूस एकत्र आहे त्याच्यामुळे जीआर च्या गोष्टी आम्हाला तुम्ही सांगू नका
*ऑन ईडी स्क्रिप्ट*
* ठाकरे दोन या सिनेमाचा अर्ध स्क्रिप्ट येडी वाले घेऊन गेले जॉर्ज फर्नांडिस त्यांना वाटलं खूप मोठा स्कॅनडल घेऊन गेले असे त्यांना वाटलं पण आम्ही अर्ज केला आहे की आम्हाला ते परत द्या आम्हाला त्याच्यावर काम करायचे आहे
*ऑन अहवाल*
* तो दो अहवाल आहे तो स्वीकारला त्याच्यावरती काय कार्यवाही केली तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जीआर काढला हे समोर आणा तो जी आर
* देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एक जीआर काढला हिंदी त्रिभाषा सूत्र शक्ती हा जीआर आहे ना त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केलं अशा प्रकारचा जीआर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल ते लपवत आहेत कशाला तुमच्या हातात सरकार आहे
* हे खोटारडी लोक आहेत ही खोटेपणातून सत्तेवर आली आहेत ढोंग हे त्यांचा हत्यार आहे यांच्याकडे खोटं बोलण्याशिवाय कोणता दुसरा साधन नाही
* जर उद्धव ठाकरे साहेबांचा जीआर असता तर तो आम्ही कशाला जायला असता आम्ही तुमच्या जीआर जाळतो तुम्ही आमचा जीआर जाळा
* उद्धव ठाकरे साहेबांनी जो जीआर काढला असे म्हणत आहे तो जीआर जाळा आम्ही तुम्हाला जागा देतो आझाद मैदानला किंवा शिवसेना भावना समोर जाळा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा जीआर जाळतो उद्धव साहेबांच्या सईचा जीआर असेल त्यांनी तो जाळावा आणि शिवसेना भावना समोर गडकरी चौकात घेऊन जाळावा आम्ही तो साफसफाई करून घेतो
*ऑल काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर चाचपणी*
* करू द्या त्यात काय झालं काँग्रेस हा एक स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष आहे निवडणुका संदर्भात कोणत्या निवडणुका घ्यायचा काय करायचं महाविकास आघाडी ही लोकसभा आणि विधानसभेसाठी होती
* स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय आहे
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : एका दिवसात दोन चेन स्नॅचिंग; अहिल्यानगरच्या दोघांना बीड पोलिसांकडून अटक..
Anc- शहरात एकाच दिवशी दुचाकीवरून दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. रायडर दुचाकीवरून हे आरोपी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावयाचे आणि भरधाव वेगात पळून जायचे.. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे बीड पोलिसांनी या आरोपींचा छडा लावत त्यांना अहिल्यानगर मधून अटक केली आहे. सुमीत रुपेकर आणि अजय पंडित अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचा सर्वच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्हीही आरोपी सराईत असून त्यांनी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात उरळ पोलीसांना यश आलं आहेय...फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत अंगावरील चांदीच्या दोन अंगठ्या, मोबाइल आणि पल्सर दुचाकी असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी लुटून नेला होता..तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा सुद्धा सहभाग आहेय..
पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेला माल हस्तगत केला असून पुढील तपास करीत आहेय.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
ब्रेक
कर्जत वरून मुंबई कडे जाणाऱ्या लोकल मध्ये महिला ची हाणामारी
हाताचा कोपरा लागत असल्यामुळे दोन महिला मध्ये हाणामारी
विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान झाली हाणामारी
महिलांच्या फर्स्ट क्लास कोच मध्ये झाली हाणामारी
हाणामारी सोडवायला गेले असता दुसऱ्या महिलांना देखील केली मारहाण आणि हाताला घेतला चावा
रेल्वे पोलिसांना कळवले असताना पोलिसांनी काहीही केले नाही असा महिलाच आरोप
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : आडागळे कुटुंबावर हल्ला प्रकरण; 35 ते 40 जणांचा जमाव सीसीटीव्हीत कैद.. शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल..!
Anc : शहरातील शाहूनगर परिसरातील गजानन कॉलनीत आडागळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तब्बल 19 दुचाकींवर बसलेले 35 ते 40 जणांचा जमाव सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रात्री बारा बाजेच्या सुमारास हाच जमाव दिनकर आडागळे यांच्या घराकडे गेला होता. चाकूचा धाक दाखवत घरातील सामानाची तोडफोड करत आडागळे कुटुंबातील दोघांना मारहाण केली होती. सध्या आडागळे कुटुंबावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसात पाच मुख्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सीसीटीव्हीत कैद झालेल्या 35 ते 40 जणांचा तपास सुरू आहे.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0107ZT_WSM_BUSSTAND_WORK
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे कोट्यवधी रुपये खर्चून नव्या बस स्थानकाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे स्थानक परिसरात सर्वत्र चिखल साचलेला आहे.या अस्वच्छतेमुळे आणि अपूर्ण कामामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर हाल सहन करावे लागत आहेत.बस स्थानकात चढ-उतार करताना प्रवाशांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत आहे.स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून देखील नियोजनशून्य पद्धतीने आणि हलगर्जीपणे हे काम सुरू असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत असून या कामाला गती देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
Share
Report