Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

हिजाबच्या मुद्द्यावर महाविद्यालयात धिंगाणा; प्राचार्याची तक्रार!

VISHAL KAROLE
Jul 01, 2025 06:03:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn hijab issue av fees attched हिजाब का घालू देत नाही' म्हणत टोळक्याचा महाविद्यालयात धिंगाणा ANC - परीक्षेदरम्यान परीक्षार्थीना हिजाब का घालू देत नाही म्हणत प्राचार्याच्या केबिनमध्ये धिंगाणा केल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पीईएस महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. अर्जात नमूद असल्याप्रमाणे एमआयएम विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी असल्याचे म्हणत टोळक्याने प्राचार्याच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी मुलींना हिजाब का घालू देत नाही याबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली. चर्चा सुरू असताना त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव घेतले. आम्ही तुला धडा शिकवू, अशी धमकी दिली. प्राचार्य यांनी इम्तियाज यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांनी या सर्व प्रकारचे खंडन करून या प्रकरणांशी कुठलाही संबंध नाही. आपण कोणत्याही व्यक्तीला त्याठिकाणी पाठवले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर प्राचार्य वाडेकर यांनी छावणी पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार अर्ज सादर केला..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement