Back
ठाकरे बंधूंचा विजय मेळावा: मुंबईकडे ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांची रॅली!
Kalyan, Maharashtra
आज वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा भव्य विजय मेळावा
कल्याणहून मनसे व शिवसेना कार्यकर्ता एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात निघाले मुंबईच्या दिशेने !
Anc...आज मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, कल्याणमधून मोठ्या संख्येने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र जमत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाळा परब
त्यांनी “दोन्ही भाऊ एकत्र येणार, काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे... आजचा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे! आम्ही ढोल ताशांच्या गजरात ठाणे, डोंबिवली, कल्याणहून कार्यकर्ते मेळाव्यासाठी जात आहोत आणि आमचे साहेब काय याची आम्हाला उत्सुकता लागली आहे
Byte :- प्रकाश भोईर माजी आमदार मनसे
Byte:- बाळा परब ( शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख )
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0507ZT_WSM_NILGAI_RESCUE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशीम शहरातील पंचशील नगर परिसरात आज सकाळच्या सुमारास एक नीलगायचे पिल्लू मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.हे पिल्लू जवळच्या शेतात फिरत असताना काही मोकाट कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला चावले व जखमी केले. जीवाच्या भीतीने ते पिल्लू पळत पळत वस्तीच्या दिशेने धावले आणि धावत असताना एक पाण्याने भरलेला गड्डा दिसल्याने त्यात पडला स्थानिक नागरिक त्वरित मदतीला धावले.त्यांनी नीलगायच्या पिल्लाला त्या पाण्याच्या गड्यातून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.त्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी नीलगायच्या जखमी पिल्लाला ताब्यात घेत उपचार सुरू केले आहेत.सध्या त्याची प्रकृती स्थिर असून वनविभागाच्या देखरेखीखाली आहे.नागरिकांच्या या तत्परतेमुळे एका वन्यप्राण्याचा जीव वाचला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university issue av
Feed attached
राज्यातील बहुतांश विद्यापीठांमधील अधिष्ठातांच्या मुलाखती रखडल्या आहेत. मुलाखती घेण्यासाठी आवश्यक असलेला राज्यपाल तथा कुलपती यांचा प्रतिनिधी देण्यात आलेला नसल्यामुळे ही प्रक्रियाच खोळंबली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही कुलपतींचा प्रतिनिधी मिळावा, यासाठी पुन्हा एकदा राजभवनाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली...
अधिष्ठातांसह इतर संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्याचा थेट परिणाम विद्यापीठाच्या एकूण शैक्षणिक कामगिरी होत असल्याची बाबही समोर आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार शैक्षणिक निर्णय घेण्याचे अधिकार चार विद्याशाखांच्या अधिष्ठाता मंडळाला दिलेले आहेत. कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानंतर अधिष्ठातांची रीतसर नियुक्ती करण्याचे अधिकार कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील
समितीला दिलेले आहे. त्या समितीमध्ये कुलपती तथा राज्यपालांच्या प्रतिनिधीचाही समावेश असतो...
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn manpa demand av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील प्रमुख ४ रस्ते २०० फूट रुंद केले. सर्व्हिस रोडसाठी महापालिकेकडे निधी नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७ जुलै रोजी दिल्लीत भेटीसाठी वेळ दिला आहे. यावेळी मनपा अधिकारी रुंद रस्त्यांचे सादरीकरण करणार आहेत. एक हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी रस्त्यांसाठी करण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
शेंद्रा एमआयडीसी, बिडकीन डीएमआयसी भागात भविष्यात अनेक नवीन उद्योग येतील. त्याचप्रमाणे पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. शहरातील मुख्य चार रस्ते सुंदर आणि पुरेसे रुंद
असावेत, अशी महापालिकेची भूमिका आहे. त्यादृष्टीने मागील महिनाभरात बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा रोड ३०० फूट रुंद करण्यात आले. या चारही रस्त्यांवर सर्व्हिस रोड करायचा म्हटले तर निधी खूप लागणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने थोडासा हातभार लावला तर रस्ते होतील.
त्यामुळे महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यश मिळत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७ जुलै रोजी मनपा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn airport av
Fees attched
छत्रपती संभाजी नगर विमानतळ विस्तारीकरणात बाधित होत असलेल्या मालमत्ताधारकांनी आता आगाऊ भरपाईसाठी शासनाकडे अर्ज केला आहे. उपविभागीय अधिकारी व्यंकटेश राठोड यांच्याकडे मागणी करताना २०१३ च्या कायद्याचा आधार घेण्यात आला आहे. संबंधित कायद्याच्या अनुषंगाने ३० मार्च २०१६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार ५० टक्के रक्कम मालमत्ता बाधित होत असलेल्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी तरतूद आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने विमानतळ विकास कंपनीची स्थापना केली आहे. चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ७३४ कोटींच्या निधीला विधानसभेच्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे. काही रक्कम सरकारकडून देण्यात आली आहे. त्यातून संबंधित मालमत्ताधारकांच्या खात्यात ५० टक्के भरपाई जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय...
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0507_BHA_NITIN_GADKARI
FILE - 5 VIDEO
वैनगंगा नदीवर तयार झालेल्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा पडला पार.... नितीन गडकरी यांनी स्वतः रस्त्यावर वॉकिंग करत केली कामाची पाहणी...
Anchor :- भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 53 चा नवीन काम करण्यात आला आहे. तसेच वैनगंगा नदीवर नवीन पूल बांधकाम करण्यात आला आहे. या पुलाचा लोकार्पण केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. या पुलामुळे वाहतूक कोंडी पासून सुटका मिळणार आहे.. तसेच नितीन गडकरी यांनी स्वतः रस्त्यावर वॉकिंग करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच वैनगंगा नदी, पुलाची पाहणी देखील गडकरी यांनी केली आहे....
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
वांगणीत एकवीरानगरमधील मुख्य रस्त्याची चाळण
नागरिकांना करावा लागतो खड्ड्यातून प्रवास
ग्रामपंचायत प्रशासनाला जाग कधी येणार?
Vangni potholes
Anchor - अंबरनाथ तालुक्यातील वांगणीतील एकविरानगर मधल्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे चिखलाचं साम्राज्य पसरलंय. याच खड्ड्यांमधून दररोज इथल्या नागरिकांना प्रवास करावा लागतोय. गंभीर बाब म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केलय. या रस्त्यावर किमान राडाराडा टाकून तात्पुरती का होईना डागडुजी करण्याचं सौजन्य देखील ग्रामपंचायत प्रशासनानं दाखवलेलं नाही. रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत प्रशासन एखाद्या दुर्घटनेची किंवा अपघाताची वाट पाहतय का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय.
चंद्रशेखर भुयार , वांगणी
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापूर गोळीबार प्रकरण
मुख्य आरोपीला अटक ,शस्त्र आणि दुचाकी जप्त
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
Bdl firing arrest
Anchor - बदलापूर चिंचेश्वर पाडा येथील आमदार किसन कथोरे यांच्या घराजवळ शुक्रवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर गडदे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. अल्ताफ शेख हा युवकावर गोळीबार करण्यात आला होता त्यात तो गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळीच एक आरोपी विवेक नायडू नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आला होता. मात्र इतर आरोपीशेखर गडदे, उदय झुटे, सोहम आणि अन्य दोघे फरार झाले होते.शेखर गडदे उल्हासनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी बदलापूर पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.या अटकेमुळे गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Nala Sopara, Maharashtra:
Date-5july2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NSP BUILDING
Feed send by 2c
Type-Av
Slug- नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारत झुकली
अलकापुरी परिसरातील घटना
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही,
अँकर ... नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी परिसरातील साईराज अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्याला दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारत झुकल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली ...
तळमजल्यावरील घराचे दुरुस्तीचे काम सुरू असताना कारागिराने पिलर तोडल्यामुळे ही इमारत दुर्घटना घडली... स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात येतात वेळीच इमारत खाली केल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली...
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही या घटनेची माहिती महापालिका व पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे..
सध्या या इमारतीमध्ये राहणाऱ्या ३० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे..
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0507ZT_CHP_JAIL_MOHARAM
( file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या कारागृहात गैबी वली शाह दर्ग्यावर मोहरम निमित्त दोन दिवसीय उरुसाचा प्रारंभ, गौडा, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकानी दर्शन घेत फीत कापून उरुसाचा केली सुरुवात
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा कारागृह दरवर्षी मोहरम सणानिमित्त दोन दिवस सर्वसामान्यांसाठी खुले ठेवले जाते. यावर्षी 5 व 6 जुलै रोजी कारागृह खुले करण्यात आले. या काळात मुस्लिम व हिंदू भाविक एकत्र येऊन कारागृहातील बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतात. आजही हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत दर्ग्यातील पवित्र विहिरीचे पाणी प्राशन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या ऐतिहासिक कारागृहात मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून, दोन दिवस भाविकांसाठी कारागृह खुले ठेवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
बाईट १) अनुपकुमार कुमरे, कारागृह अधिक्षक
बाईट ३) तुफैल अहमद, मौलाना
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरणातून वारणा नदीत साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग...धरणाचे चारही दरवाजे उघडले..
अँकर - सांगलीच्या चांदोली-वारणा धरणातुन वाडावादी पात्रामध्ये साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने धरण 75 टक्के भरले.त्यामुळे आता धरणातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या चारही वक्र दरवाजे उघडण्यात आला असून वक्र दरवाज्यातून 2860 आणि विद्युत पायथागृहातून 1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे,त्यामुळे वानंदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने वाणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावा राहावे,असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला.
बाईट - बी आर पाटील - शाखा उप अभियंता ,वारणा ( चांदोली ) धरण,शिराळा.
0
Share
Report