Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

नीलगाय पिल्लाच्या जीवाची बचत: स्थानिकांची अद्भुत मदत!

GANESH MOHALE
Jul 05, 2025 10:36:41
Washim, Maharashtra
वाशिम: File:0507ZT_WSM_NILGAI_RESCUE रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशीम शहरातील पंचशील नगर परिसरात आज सकाळच्या सुमारास एक नीलगायचे पिल्लू मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.हे पिल्लू जवळच्या शेतात फिरत असताना काही मोकाट कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला चावले व जखमी केले. जीवाच्या भीतीने ते पिल्लू पळत पळत वस्तीच्या दिशेने धावले आणि धावत असताना एक पाण्याने भरलेला गड्डा दिसल्याने त्यात पडला स्थानिक नागरिक त्वरित मदतीला धावले.त्यांनी नीलगायच्या पिल्लाला त्या पाण्याच्या गड्यातून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.त्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी नीलगायच्या जखमी पिल्लाला ताब्यात घेत उपचार सुरू केले आहेत.सध्या त्याची प्रकृती स्थिर असून वनविभागाच्या देखरेखीखाली आहे.नागरिकांच्या या तत्परतेमुळे एका वन्यप्राण्याचा जीव वाचला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement