Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

महापालिका रस्त्यांसाठी १,००० कोटींची मागणी, गडकरींच्या भेटीची उत्सुकता!

VISHAL KAROLE
Jul 05, 2025 10:36:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn manpa demand av Feed attached छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील प्रमुख ४ रस्ते २०० फूट रुंद केले. सर्व्हिस रोडसाठी महापालिकेकडे निधी नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७ जुलै रोजी दिल्लीत भेटीसाठी वेळ दिला आहे. यावेळी मनपा अधिकारी रुंद रस्त्यांचे सादरीकरण  करणार आहेत. एक हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी रस्त्यांसाठी करण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. शेंद्रा एमआयडीसी, बिडकीन डीएमआयसी भागात भविष्यात अनेक नवीन उद्योग येतील. त्याचप्रमाणे पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. शहरातील मुख्य चार रस्ते सुंदर आणि पुरेसे रुंद असावेत, अशी महापालिकेची भूमिका आहे. त्यादृष्टीने मागील महिनाभरात बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा रोड ३०० फूट रुंद करण्यात आले. या चारही रस्त्यांवर सर्व्हिस रोड करायचा म्हटले तर निधी खूप लागणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने थोडासा हातभार लावला तर रस्ते होतील. त्यामुळे महापालिकेने  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यश मिळत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७ जुलै रोजी मनपा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement