Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

बदलापूर गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, शस्त्र आणि दुचाकी जप्त!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 05, 2025 10:11:04
Ambernath, Maharashtra
बदलापूर गोळीबार प्रकरण   मुख्य आरोपीला अटक ,शस्त्र आणि दुचाकी जप्त उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई Bdl firing arrest Anchor - बदलापूर चिंचेश्वर पाडा येथील आमदार किसन कथोरे यांच्या घराजवळ शुक्रवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर गडदे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. अल्ताफ शेख हा युवकावर गोळीबार करण्यात आला होता त्यात तो गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळीच एक आरोपी विवेक नायडू नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आला होता. मात्र इतर आरोपीशेखर गडदे, उदय झुटे, सोहम आणि अन्य दोघे फरार झाले होते.शेखर गडदे उल्हासनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी बदलापूर पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.या अटकेमुळे गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement