Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar411030

कापूस-सोयाबीनला फाटा, शेतकऱ्यांचा मका पिकाकडे वळण्याचा निर्णय!

LAILESH BARGAJE
Jul 05, 2025 12:07:05
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- जिल्ह्यात कापूस सोयाबीन झाला कमी तर मका पिकाची पेरणी वाढली फीड 2C अँकर:- यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या पिकांना फाटा देत मका लागवडी लक्ष केंद्रित केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 78 हजार हेक्टर वर घेतलं जाणार मका पीक हे एक लाख 25 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर घेतलं जाण्याची शक्यता आहे या तुलनेत दीड लाख हेक्टर वर असलेला कापूस वीस ते पंचवीस हजार हेक्टर कमी झाला आहे याबरोबरच सोयाबीन पिकाची लागवड देखील 25 ते 30 हजार हेक्टरने कमी होणार आहे कापूस आणि सोयाबीन पिकाचे पडत असलेले भाव आणि मजुरांची समस्या या कारणामुळे या दोन्ही पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे तुलनेने मकाचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे याबरोबरच मका पिकातून पशुखाद्य मिळते आणि रब्बीचे पीकही घेता येतं या कारणांमुळे शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत ६४% पेरणी झाली असून यामध्ये पिकांच्या सरासरी मध्ये सर्वाधिक प्रमाण मका पिकाच्या पेरणीच आहे बाईट:- सुधाकर बोरळे, जिल्हा कृषी अधिक्षक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement