Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

धक्कादायक: शेतकरी पिता-पुत्रांची आत्महत्या कीटकनाशकामुळे!

Sarfaraj Musa
Jul 04, 2025 10:05:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_shetkari_suucied स्लग - धक्कादायक ! शेतकरी पिता-पुत्राने विषारी औषध पिऊन केली आत्महत्या.. अँकर - सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या सोनी येथे पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कीटकनाशक पिऊन पिता-पुत्रांनी आपलं आयुष्य संपवला आहे.गणेश हिंदुराव कांबळे वय 52 आणि इंद्रजित गणेश कांबळे,वय 23,असे पिता-पुत्राचे नाव असून दोघांना आपल्या शेतात ही आत्महत्या केली आहे. सकाळच्या सुमारास हे दोघेही पिता-पुत्र शेतामध्ये गेले होते,मात्र शेतामध्येच त्यांचा मृतदेह नागरिकांना आढळून आला,यावेळी दोघांच्या मृतदेह शेजारी कीटकनाशक औषधांच्या बाटल्या देखील आढळून आल्या, या घटनेची माहिती मिळताच,मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह मिरजेच्या शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तर दोघा पिता-पुत्रांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणातून केली ?हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत,मात्र या घटनेमुळे सोनी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement