Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

राज आणि उद्धव एकत्र येत असल्याने मनोज जरांगे पाटील यांचा सकारात्मक दृष्टिकोन!

dnyaneshwar patange
Jul 04, 2025 12:33:20
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव - DHARA_JARANGE राज आणि उद्धव एकत्र येणार असतील तर चांगली गोष्ट, यात कोणाचं दुखण्याचे कारण नाही. मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया Anchor धाराशिव – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर त्यात कोणाचं दुखावण्यासारखं काहीच नाही, असं मत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात" वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. VO 1 राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यात कोणाचं काय दुखावलं जाईल असं काहीच नाही. दोघांनी एकत्र यावं, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, सामाजिक नाही, असं स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, "ते दोघं काही बोलणार असतील तर ते माझं ऐकणार आहेत का? त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यावर बोलण्यासारखं काहीच नाही. Byte – मनोज जरांगे पाटील – एकनाथ शिंदे यांचे जय गुजरात वक्तव्य आणि जरांगे यांची प्रतिक्रिया VO 2 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात" या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले – "माझी प्रतिक्रिया खवखवीत असते, पण मी ते ऐकलं नाही म्हणून फारसं बोलणार नाही. तुम्ही राज्यात हिंदी सक्ती करत असाल, तर देशभर मराठी सक्ती करा, आम्हाला विरोध नाही – उलट आम्ही पाठिंबा देऊ. Byte – मनोज जरांगे पाटील *लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर अप्रत्यक्ष टीका* दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर अप्रत्यक्ष टीका करत मनोज जरांगे म्हणाले – चिरगुट आंदोलनं करून न्याय मिळत नाहीत. मी त्यांना विरोधक मानत नाही, ते मला मानतात. ओबीसी समाजातील मोजके लोकच आरक्षणाचा फायदा घेतात. गोरगरीब ओबीसी ना शिष्यवृत्ती मिळते, ना राजकारणात स्थान. त्यामुळे आता गरीब ओबीसीनेही आपला हक्कासाठी लढा दिला पाहिजे. Byte – 3मनोज जरांगे पाटील
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement