Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरच्या धामणी धरणात भरपूर पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

HARSHAD PATIL
Jul 04, 2025 13:32:13
Palghar, Maharashtra
पालघर - पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून दमदार पाऊस सुरू असून याच पावसाचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह नालेही ओसंडून वाहत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेलं सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण पूर्ण भरलं असून या धरणाचे तीनही दरवाजे 40 सेंटी मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धामणी धरणातून 3285 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून ,धामणी आणि कवडास ह्या दोन्ही धरणांमधून जवळपास 14 हजार 337 कयुसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत द्वारे सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आलाय. धामणी धरण 82.26% भरला आहे धरणाची पाणी पातळी 114.60 मीटरवर गेले असून या धरणात 221.786 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे त्यामुळे आज धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचबरोबर या धरणातून व पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकाना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो त्यामुळे जिल्ह्यासह या दोन्ही महानगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटनार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement