Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

गणेश मूर्तिकार महावितरणविरोधात आक्रमक, वीज खंडित होण्याने संताप!

PRAFULLA PAWAR
Jul 04, 2025 12:30:15
Raigad, Maharashtra
स्लग - पेणचे गणेश मूर्तिकार महावितरण विरोधात आक्रमक ..... सतत खंडित वीज पुरवठ्यामुळे संतापले ...... तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ...... अँकर - पेणमधील गणेश मूर्तिकार आता महावितरणच्या विरोधात एकवटले आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना ते वैतागले. गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलाय. कार्यशाळांमध्ये रात्रंदिवस काम सुरू आहे. मात्र सतत वीज खंडित होत असल्याने मूर्तिकामात व्यत्यय येत असून त्याचा कामावर परिणाम होत आहे. महावितरणने यावर कायम स्वरुपी उपाय योजना केली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा मूर्तिकारानी केला आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन आम्ही व्यवसाय करतो. पण महावितरणमुळे आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येईल असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे. बाईट - श्रीकांत देवधर, अध्यक्ष मूर्तिकार संघटना
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement