Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

श्री साईबाबा संस्थानने खोट्या बातम्यांविरुद्ध सुरू केली कायदेशीर कारवाई!

Kunal Jamdade
Jul 04, 2025 13:34:37
Shirdi, Maharashtra
Anc - श्री साईबाबा संस्थान आणि साईबाबांविषयी चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. VO - शिर्डी श्री साईबाबा संस्थान संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'हज यात्रेसाठी ३५ कोटींचा निधी' या बातमीचे खंडन करत, संस्थानने स्पष्ट केले की असा कोणताही निधी देण्यात आलेला नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर स्पष्ट केले असून. यापूर्वीच, साईबाबांविषयी अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या अजय गौतम आणि गौतम खट्टर यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना बदनामीकारक विधाने करण्यास मनाई केली आहे. संस्थानचा कारभार नियमांनुसार आणि पारदर्शकपणे चालतो. देणग्यांचा उपयोग सार्वजनिक हिताच्या कामांसाठी केला जातो. अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे. Bite - गोरक्ष गाडीलकर,मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थानचे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement