Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूरच्या पवार दाम्पत्याला मिळाली बैल जोडी, शेतकऱ्यांमध्ये आनंद!

VAIBHAV BALKUNDE
Jul 04, 2025 12:30:50
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- लातूरमधील पवार दाम्पत्याला अखेर बैल जोडी मिळाली.... रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून पवार दाम्पत्याला दिली बैलांची जोडी…वाजत गाजत काढली बैल जोडीची मिरवणूक.... शेतकरी संघटनेने ZEE 24 TAAS या वृत्तवाहिनीचे मानले आभार... शेतकरी संघटनेकडून प्रत्यक्ष मदतीचा हात... सरकारकडून फक्त आश्वासनच, शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर... AC ::- लातूरमधील पवार दाम्पत्याला अखेर बैल जोडी मिळाली आहे . लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याने बैल नसल्यामुळे स्वतःलाच नांगराला जुंपून शेतीची मशागत केल्याचा धक्कादायक प्रकार ZEE 24 TAAS ने सातत्याने दाखवला. या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, मात्र सरकारकडून अद्याप फक्त घोषणाच झाल्या आहेत, ठोस मदत मिळालेली नाही. दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुढाकार घेत पवार दाम्पत्याला दोन बैलांची जोडी देऊन प्रत्यक्ष मदत केली आहे. विशेष म्हणजे जेव्हा ही बैलांची जोडी हाडोळती गावात पोहोचली, त्यावेळी गावकऱ्यांनी ती वाजत-गाजत मिरवणूक काढत थेट पवारांच्या शेतापर्यंत नेण्यात आली. संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबासाठी ही मदत मोठा दिलासा ठरली आहे. याच संदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी... WKT :: वैभव बालकुंदे रिपोर्टर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement