Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेडमध्ये 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू!

SATISH MOHITE
Jul 04, 2025 11:34:40
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Hostel Feed on - 2C -------------------------- Anchor - वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील आनंदनगर भागात ही घटना घडली. वैभव पांचाळ अस मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेल आणि कोचिंग क्लासेस आहे. याच हॉस्टेलचा वैभव हा विद्यार्थी होता. आठ दिवसा पूर्वी कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेल येथे ठेवले होते. आज सकाळी सहा च्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. तात्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यावरून पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जातं आहे. वैभवचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला विमानातळ पोलिसांकडून याबाबत तपास केला जात आहे. -----------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement