Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

राज आणि उद्धव ठाकरे यांची युती: कल्याण डोंबिवलीत सत्तांतर होणार का?

ATISH BHOIR
Jul 04, 2025 09:09:05
Kalyan, Maharashtra
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास कल्याण डोंबिवलीत सत्तांतर होणार ?? की शिवसेना शिंदे गट आणि भाजपा पुन्हा बाजी मारणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून रंगली होती . महिनाभरापूर्वी राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले . त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला .त्यानंतर या चर्चेला आणखीनच बळ मिळालं . दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा आता दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उघडपणे करू लागलेत Vis मनसे पक्ष स्थापनेनंतर महापालिका निवडणुकीत मनसेची घोडदौड कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 2009 मध्ये मनसेने जोरदार मुसंडी मारत दोन आमदार निवडून आणले होते त्या पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल 29 नगरसेवक निवडून आणले होते मात्र त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली 2015 च्या निवडणुकीत मनसेला अनेक नेत्यांनी सोडचिट्टी दिली परिणामी मनसेला अवघ्या नऊ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं . Vis मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची घोडदौड सुरूच होती 2010 च्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले असले तरी शिवसेनेच्या महापौर बसला होता त्यानंतर झालेल्या 2015 च्या निवडणुकीत देखील शिवसेनेने बाजी मारत तब्बल 53 नगरसेवक निवडून आणले आणि भाजप सोबत युती करत भाजपमहापौर पद काबीज केलं होतं Vis शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची पीछेहाट एकंदरीतच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे असे दोन गट पडले त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचा वर्चस्व पाहता कल्याण डोंबिवली महापालिका महापालिकेच्या तब्बल 47 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.. मातब्बर पदाधिकारी देखील शिंदेंच्या गटात गेले. त्यामुळे ठाकरे गटाकडे अवघे आठ नगरसेवक आहेत. महाविका स आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद फारशी नाही त्यामुळे या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटासमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे आहे Vis.. गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा श्रीकांत शिंदे यांनी पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार पराभूत करण्यात शिंदेंना यश आले. दुसरीकडे भाजपाला लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कल्याण पूर्व आणि डोंबिवली या दोन जागा राखत आपला करिष्मा कायम ठेवला. सध्या कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना शिंदे गट भाजप अजित पवार राष्ट्रवादी गटाचे पारडे निश्चितच जड आहे .. Vis महायुती दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता तर विधानसभा निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले एकंदरीतच लोकसभा विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारी पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र आल्यास विरोधकांना कडवं आवाहन उभे राहू शकतं असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय दरम्यान या दोघांची युती झाल्यास येत्या महापालिका निवडणुकांमध्ये त्याचे काय परिणाम होतील याबाबत राजकीय जाणकारांनी विविध मत व्यक्त केली आहेत . Byte :- राजकीय विश्लेषक हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित सूर आवळल्यानंतर मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला त्यानंतर येत्या पाच तारखेला दोघांचे एकत्रित जाहीर सभा होणार आहे . अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर असल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते दोघांचे युती होणार का? दोघं काय निर्णय घेतात ? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे byte.. विजय राऊत राजकीय विश्लेषक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement