Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

केजच्या सांस्कृतिक कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय; ठाकरे गटाचा माजी प्रमुख आरोपी!

Mahendrakumar Mudholkar
Jun 28, 2025 06:04:42
Beed, Maharashtra
बीड: केजमध्ये सांस्कृतिक कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय; ठाकरे गटाच्या माजी जिल्हाध्यक्षाविरीद्ध गुन्हा दाखल Anc : बीडच्या केजमधील महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रात मोठा अनैतिक व्यवहार उघड झालाय. कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या चौकशीत शिवसेना ठाकरे गटाचा माजी जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दीड महिन्यापूर्वी पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात केज येथील महालक्ष्मी कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा पर्दाफाश झाला होता. पोलीसांच्या AHTU पथकाने केलेल्या कारवाईत १० महिलांची सुटका करण्यात आली. त्या विविध जिल्ह्यांतून फसवून आणण्यात आल्याचं उघडकीस आले होते. छाप्यात व्यवस्थापक मयूर अंधारे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच हजार रुपये रोख आणि निरोधही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात सत्वशीला अंधारे, तिचा मुलगा आदित्य अंधारे हे मुख्य सूत्रधार होते. या ठिकाणी यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात आणखी आरोपी रत्नाकर शिंदे याचा सहभाग असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.. कलाकेंद्रावर छापा पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर केलकेंद्राची परवानगी कायस्वरुपी रद्द केली आहे..यापूर्वी देखील याच कलाकेंद्रावर पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले होते. त्यावेळी देखील ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा रत्नाकर शिंदे हा दुसऱ्या प्रकरणात देखील आरोपी झाल्याने राजकीय गोठ्यात भुवया उंचावल्या आहेत. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. बीडमधील उमाकिरण खासगी क्लासेस मधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याचे उघड झाल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा समर्थक आहे. ही घटना ताजीच असताना आता उद्धव ठाकरे गटाच्या माजी जिल्हा प्रमुखावर वेश्याव्यवसाय करवून घेतल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement