Back
पालकांचा संताप: एसटी बससेवा थांबवून रास्ता रोको आंदोलन!
Buldhana, Maharashtra
मोठी बातमी....
एसटी दुसऱ्या मार्गाने जात असल्याने , संतप्त पालकांनी बसेस अडवल्या.....
Anchor - जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्यावरील येरळी गावाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जुना पूल सोडून नवीन पुलावरून धावत असल्याने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे मानेगाव आणि येरळी येथील विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शाळेतून येताना रात्री उशिरा त्यांना रस्त्यावरच सोडले जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या मानेगाव आणि येरळी येथील नागरिकांनी आज महामंडळाच्या सर्व बस थांबवून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांनी आपली मागणी लावून धरली असून, महामंडळाने जुन्या पुलावरून बससेवा पूर्ववत सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि स्थानिक रहिवाशांना होणारी गैरसोय दूर होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Byte - अर्पिता साबे, विद्यार्थिनी
अभिजीत पाटील, नागरिक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement