Back
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात' वर मनसेची खरपूस टीका!
Mumbai, Maharashtra
अँकर -- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलं यावर मनसेच्या वतीने मनोज चव्हाण यांनी खरपूस टीका केली असून आज खऱ्या अर्थाने खरी लाचारी बघितली. महाराष्ट्रामध्ये अमित शाह यांना बरं वाटावं म्हणून जय गुजरात बोलले असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जी गोष्ट बोलायची आहे ते विचार करूनच बोलायला पाहिजे. ही लाचारी कुठल्या लेव्हलला चालली आहे हे दिसून येते.
Byte -- मनोज चव्हाण मनसे प्रवक्ते
मनोज कुळकर्णी
byte attach
२C
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Shirdi, Maharashtra:
Anc - श्री साईबाबा संस्थान आणि साईबाबांविषयी चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
VO - शिर्डी श्री साईबाबा संस्थान संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'हज यात्रेसाठी ३५ कोटींचा निधी' या बातमीचे खंडन करत, संस्थानने स्पष्ट केले की असा कोणताही निधी देण्यात आलेला नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर स्पष्ट केले असून. यापूर्वीच, साईबाबांविषयी अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या अजय गौतम आणि गौतम खट्टर यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना बदनामीकारक विधाने करण्यास मनाई केली आहे. संस्थानचा कारभार नियमांनुसार आणि पारदर्शकपणे चालतो. देणग्यांचा उपयोग सार्वजनिक हिताच्या कामांसाठी केला जातो. अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे.
Bite - गोरक्ष गाडीलकर,मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थानचे
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर - पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून दमदार पाऊस सुरू असून याच पावसाचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह नालेही ओसंडून वाहत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेलं सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण पूर्ण भरलं असून या धरणाचे तीनही दरवाजे 40 सेंटी मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धामणी धरणातून 3285 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून ,धामणी आणि कवडास ह्या दोन्ही धरणांमधून जवळपास 14 हजार 337 कयुसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत द्वारे सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आलाय.
धामणी धरण 82.26% भरला आहे धरणाची पाणी पातळी 114.60 मीटरवर गेले असून या धरणात 221.786 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे त्यामुळे आज धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचबरोबर या धरणातून व पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकाना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो त्यामुळे जिल्ह्यासह या दोन्ही महानगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटनार आहे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर परभणी येथे वकिल संघाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले आहे, सोमनाथ हा परभणी येथे लाँ चे शिक्षण घेत होता,त्याला लाँ पूर्ण करून वकीली व्यवसाय करायचा होता,
बाईट- वकील
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - खारघर मद्ये एकाच रात्री चार घरफोडी, सीसीटीव्ही समोर
खारघर मे एक ही रात मे चार घर फोडे
ftp slug - nm kharghe house broken
shots- व्हिडीओ ,सीसीटीव्ही
reporter - swati naik
navi mumbai
anchor ; खारघर सेक्टर सेक्टर 16 वास्तू विहार गृह संकुल मधील संस्कृती सोसायटीतील बंद असलेली पाच घरे फोडून चोरटयांनी घरातील मौल्यवान ऐवज चोरी करून पसारा झाले.हि घटना गुरुवार रात्री घडली. चोऱ्याच्या हाती धारदार सस्त्रे हाती असल्याचे सिसिटीव्ही निदर्शनास येत असल्यामुळे रहिवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खारघर सेक्टर 16 वास्तुविहार गृह संकुल तीन महिन्यापूर्वी उत्सव सोसायटी मधील चार घरांतील चोरी झाल्याची घटना ताजी असतांना गुरुवार रात्री तीन ते चार चोरट्यानी संस्कृती सोसायटीत प्रवेश करून बंद असलेल्या पाच घरांचे कडी कोयंडा तोडून घरातील लोखंडी आणि लाकडी कपाट तोडून घरातीलरोख रक्कम आणि ऐवज चोरून पसार झाल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.रहिवाशीयांनी सकाळी खारघर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घरात प्रवेश केला असता, चोरी झालेल्या पाचही घरात चोरट्यानी सामानाची नासधूस केल्याचे दिसून आले.सोसायटी तील रहिवासी आणि भाजपाचे पदाधिकारी समीर कदम म्हणाले पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालणे आवश्यक आहे. मात्र पोलिस कधीही गस्त घालताना दिसून आले नाही. दरम्यान सोसायटी मधील रहिवासीयांनी पोलीस आयुक्तांनी या प्रश्नाकडे लक्ष देवून चोरांना पकडून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करीत आहे. या संदर्भात खारघर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस घटनास्थळी जावून तपास करीत असल्याचे सांगितले.
gf-
=======================
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव -
DHARA_JARANGE
राज आणि उद्धव एकत्र येणार असतील तर चांगली गोष्ट, यात कोणाचं दुखण्याचे कारण नाही.
मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
Anchor
धाराशिव – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर त्यात कोणाचं दुखावण्यासारखं काहीच नाही, असं मत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात" वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.
VO 1
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यात कोणाचं काय दुखावलं जाईल असं काहीच नाही. दोघांनी एकत्र यावं, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, सामाजिक नाही, असं स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले, "ते दोघं काही बोलणार असतील तर ते माझं ऐकणार आहेत का? त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यावर बोलण्यासारखं काहीच नाही.
Byte – मनोज जरांगे पाटील
– एकनाथ शिंदे यांचे जय गुजरात वक्तव्य आणि जरांगे यांची प्रतिक्रिया
VO 2
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात" या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले – "माझी प्रतिक्रिया खवखवीत असते, पण मी ते ऐकलं नाही म्हणून फारसं बोलणार नाही. तुम्ही राज्यात हिंदी सक्ती करत असाल, तर देशभर मराठी सक्ती करा, आम्हाला विरोध नाही – उलट आम्ही पाठिंबा देऊ.
Byte – मनोज जरांगे पाटील
*लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर अप्रत्यक्ष टीका*
दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर अप्रत्यक्ष टीका करत मनोज जरांगे म्हणाले –
चिरगुट आंदोलनं करून न्याय मिळत नाहीत. मी त्यांना विरोधक मानत नाही, ते मला मानतात.
ओबीसी समाजातील मोजके लोकच आरक्षणाचा फायदा घेतात. गोरगरीब ओबीसी ना शिष्यवृत्ती मिळते, ना राजकारणात स्थान. त्यामुळे आता गरीब ओबीसीनेही आपला हक्कासाठी लढा दिला पाहिजे.
Byte – 3मनोज जरांगे पाटील
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- लातूरमधील पवार दाम्पत्याला अखेर बैल जोडी मिळाली.... रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून पवार दाम्पत्याला दिली बैलांची जोडी…वाजत गाजत काढली बैल जोडीची मिरवणूक.... शेतकरी संघटनेने ZEE 24 TAAS या वृत्तवाहिनीचे मानले आभार... शेतकरी संघटनेकडून प्रत्यक्ष मदतीचा हात... सरकारकडून फक्त आश्वासनच, शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर...
AC ::- लातूरमधील पवार दाम्पत्याला अखेर बैल जोडी मिळाली आहे . लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याने बैल नसल्यामुळे स्वतःलाच नांगराला जुंपून शेतीची मशागत केल्याचा धक्कादायक प्रकार ZEE 24 TAAS ने सातत्याने दाखवला. या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, मात्र सरकारकडून अद्याप फक्त घोषणाच झाल्या आहेत, ठोस मदत मिळालेली नाही. दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुढाकार घेत पवार दाम्पत्याला दोन बैलांची जोडी देऊन प्रत्यक्ष मदत केली आहे. विशेष म्हणजे जेव्हा ही बैलांची जोडी हाडोळती गावात पोहोचली, त्यावेळी गावकऱ्यांनी ती वाजत-गाजत मिरवणूक काढत थेट पवारांच्या शेतापर्यंत नेण्यात आली. संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबासाठी ही मदत मोठा दिलासा ठरली आहे. याच संदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...
WKT :: वैभव बालकुंदे रिपोर्टर
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - पेणचे गणेश मूर्तिकार महावितरण विरोधात आक्रमक ..... सतत खंडित वीज पुरवठ्यामुळे संतापले ...... तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ......
अँकर - पेणमधील गणेश मूर्तिकार आता महावितरणच्या विरोधात एकवटले आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना ते वैतागले. गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलाय. कार्यशाळांमध्ये रात्रंदिवस काम सुरू आहे. मात्र सतत वीज खंडित होत असल्याने मूर्तिकामात व्यत्यय येत असून त्याचा कामावर परिणाम होत आहे. महावितरणने यावर कायम स्वरुपी उपाय योजना केली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा मूर्तिकारानी केला आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन आम्ही व्यवसाय करतो. पण महावितरणमुळे आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येईल असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे.
बाईट - श्रीकांत देवधर, अध्यक्ष मूर्तिकार संघटना
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - जिओ टॅगिंग प्रणालीला ठेकेदारांचा विरोध ...... नेटवर्क आणि इंटरनेटअभावी अडसर .......जिओ टॅगिंग रद्द करण्यासाठी निदर्शने ....... जलजीवनची बिले रखडल्याने कर्जाचा बोजा .... बिले तातडीने अदा करण्याची मागणी .....
अँकर - जिओ टॅगिंग विरोधात रायगड जिल्हा परिषदेतील ठेकेदार आक्रमक झाले आहेत. जिओ टॅगिंग प्रणाली रद्द करावी या मागणी साठी आज ठेकेदार संघटनेने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली. जिओ टॅगिंग प्रणाली बंधनकारक केल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. इंटरनेट आणि नेटवर्क अभावी दुर्गम डोंगराळ भागात जिओ टॅगिंग होत नाही त्यामुळं कामांची बिलं अडकून पडतात. जलजीवन मिशन च्या कामांची कोट्यवधी रुपयांची बिलं अडकून पडली आहेत त्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालोय. ती तातडीने अदा करावीत अशी मागणी ठेकेदार संघटनेने केलीय.
बाईट - ठेकेदार
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Hostel
Feed on - 2C
--------------------------
Anchor - वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील आनंदनगर भागात ही घटना घडली. वैभव पांचाळ अस मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेल आणि कोचिंग क्लासेस आहे. याच हॉस्टेलचा वैभव हा विद्यार्थी होता. आठ दिवसा पूर्वी कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेल येथे ठेवले होते. आज सकाळी सहा च्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. तात्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यावरून पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जातं आहे. वैभवचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला विमानातळ पोलिसांकडून याबाबत तपास केला जात आहे.
-----------------
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0407ZT_WSM_CROP_DAMAGE_RAIN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले आहेत. सुरुवातीला पावसाने दडी मारली, त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची पेरणी अयशस्वी ठरली.सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांकडे खते, बियाणे व आर्थिक साधनसंपत्तीचा अभाव आहे.अडोळी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व कृषी विभागाला निवेदन देऊन मोफत किंवा अनुदानित दराने खते व बियाणे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
बाईट:सतीश पाटील,शेतकरी आडोळी
0
Share
Report