Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार! संदीप क्षीरसागर यांचं अभय का?

Mahendrakumar Mudholkar
Jun 30, 2025 10:38:25
Beed, Maharashtra
*"बीड हादरतंय! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — आरोपींना आमदार संदीप क्षीरसागरांचं अभय? धनंजय मुंडेंचा थेट स्फोट!"* Anc- बीडमधल्या 'उमाकिरण क्लासेस'मध्ये एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी विकृत अत्याचार केला. याप्रकरणी तीन दिवसानंतर आरोपी शिक्षकांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलीय.. आता याच प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडे हे आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अनेक आरोपांनी घेतलेले धनंजय मुंडे यांनी तब्बल 200 दिवसानंतर मौन सोडला आहे. लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनीच अभय दिल्याचा गंभीर आरोप मुंडेंनी केलाय. ----------- पोलिसांच्या कोठडीत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर – हे दोन नावं आता बीडच्या काळजावर ओरखडे घालणारी नावं बनली आहेत... शहरातील नामांकित असलेल्या उमाकिरण खासगी क्लासेस मध्ये याच दोन राक्षसानी एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. याच प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडे हे आक्रमक झाले आहेत..बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यात त्यांना मंत्रिपद देखील मुकावे लागले... आता बीडच्या लैंगिक प्रकरणात धनंजय मुंडे यांनी लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासनावरच बोट ठेवले आहे. या आरोपींना संदीप क्षीरसागर यांनीच पाठीशी घातले आहे. त्यांचे आरोपींसोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांची देखील चौकशी करावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. बाईट: धनंजय मुंडे, ---------- संदीप क्षीरसागर आरोपींशी संपर्कात होते! हे लाजीरवाणं आहे. हे भीतीदायक आहे. असा सुरू धनंजय मुंडे यांनी काढल्यानंतर संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी देखील आरोपाचे समर्थक करत भावावर टीकेची तोफ डागली आहे. आरोपी विजय पवार म्हणजे संदीप यांचा उजवा हात आहे! गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी थेट आमदाराच्या घरात बसलेला होता. या सर्व बाबीची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी योगेश क्षीरसागर यांनी केली आहे. बाईट: डॉ. योगेश क्षीरसागर, चुलत बंधू -------------- लैंगिक अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर थेट आरोप केले. त्यानंतर मात्र बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या आरोप प्रत्यारोपात सहभाग घेतला आहे..लैंगिक अत्याचाराची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र मुंडे यांनी क्षीरसागर यांच्यावर केलेले आरोप सिद्ध होणे गरजेचे आहे. आरोप करणे खूप सोपे असते..! या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांचा कसलाही संबंध नसल्याचे सांगत मुंडे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहे.. बाईट: बजरंग सोनवणे, खासदार ---------- बीड मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची गय कोणीही करू नये. मी पीडित कुटुंबाची स्वतः भेट घेणार आहे. आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी मी बीडच्या पोलिस अधीक्षकांना तशा सूचना देखील दिल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बाईट: पंकजा मुंडे, मंत्री ( हा बाईट मुंबईत झाला आहे) --------- घटना समोर आल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर मात्र गायब असल्याचे समजते..त्यांच्यावर गंभीर आरोप होऊन देखील ते अद्याप माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. आरोपींना खरंच संदीप क्षीरसागर यांचे अभय होते का? गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी त्यांच्या घरी होते का? ह्या सर्व बाबी तपासाअंती पुढे येतीलच..! आता आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडे यांच्या आरोपावर काय बोलतील याकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे. महेंद्रकुमार मुधोळकर, बीड
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement