Back
जनसुरक्षा कायद्याविरुद्ध डाव्या पक्षांचे आज मुंबईत भव्य आंदोलन!
Raigad, Maharashtra
स्लग - जनसुरक्षा कायद्या विरोधात आज डाव्या पक्षांचे आंदोलन ...... शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची माहिती ....... या विधेयकामुळे सामान्यांच्या अधिकारांवर गदा ......
अँकर - जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांतर्फे आज मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. जनसुरक्षा असं गोंडस नाव दिलं असलं तरी या विधेयकामुळे सर्वसामान्यांच्या घटनात्मक अधिकारावर गदा येणार आहे. सामाजिक चळवळी , जनआंदोलने आणि विरोधीपक्षांना दडपण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाणार आहे असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.
बाईट - जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Solar
Feed on - 2C
---------------------------------
Anchor - शासकीय कार्यालय विजबिलमुक्त करण्यासाठी शासन पुढाकार घेत असताना दुसरीकडे काही शासकीय कार्यालय मात्र उदासीनता बाळगाताना दिसताहेत. नांदेड जिल्हा परिषदेच्या इमारतीवर दोन वर्षांपूर्वी एक कोटी रुपये खर्चून सोलार यंत्रणा बसवन्यात आली मात्र ही यंत्रणा वापराविना धुळखात पडून आहे.
Vo - शासकीय यंत्रणा कशी बेजबाबदारपणे वागते याचे आणखी एक उदाहरण नांदेडमध्ये समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या इमारत विजबील मुक्त करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी इमारतीवर सोलार यंत्रणा लावण्यात आली. जवळपास एक कोटी रुपये खर्च यासाठी करण्यात आला. पण दोन वर्ष झालेहे सोलार वपारविना पडून आहे. पण त्यामुळे जिल्हा परिषदेला विद्युत बिल भरावे लागत आहे. जिल्हा परिषदेला महिन्याला साधारणता पाच ते सहा लाख रुपये लाईट बिल येते. मग यंत्रणा लावली पण ती वापरली नाही त्यामुळे जिल्हा परिषदेला विजबील भरावे लागले. दोन वर्षाचा विचार केला तर एक कोटी पेक्षा जास्त विजबिल जिल्हा परिषदेला भरावे लागले. सोलार यंत्रणा कार्यान्वित केली असती तर हे बिल भरावे लागले नसते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस, शिवसेनेसह इतर संघटनानी केलीये.
Byte - बालाजी गाडे - काँग्रेस प्रवक्ता
Byte - सुनील पाटील - शिवसेना यु. बी. टी.
Byte - दशरथ पाटील - जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय छावा.
Vo - याबाबत झी 24 तासने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याशी संपर्क साधला. सोलार सुरु करण्यास का उशीर झाला याबाबत विचारणा केली. मात्र कोणतेही उत्तर न देता त्या थेट कॅबिन बाहेर पडून आपल्या वाहनातून निघून गेल्या. अधिकाऱ्यांनी आगोदरच बेजबाबदाररपणा दाखवलेला असताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी झाटकून पळ काढला.
Vo - विजाबिलपासून मुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर योजना सुरु केलीये. प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. दुसरीकडे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयाचा असा बेजबादारपणा समोर आलाय. त्यामुळे हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
-------------------
0
Share
Report
Beed, Maharashtra:
*"बीड हादरतंय! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — आरोपींना आमदार संदीप क्षीरसागरांचं अभय? धनंजय मुंडेंचा थेट स्फोट!"*
Anc- बीडमधल्या 'उमाकिरण क्लासेस'मध्ये एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी विकृत अत्याचार केला. याप्रकरणी तीन दिवसानंतर आरोपी शिक्षकांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलीय.. आता याच प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडे हे आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अनेक आरोपांनी घेतलेले धनंजय मुंडे यांनी तब्बल 200 दिवसानंतर मौन सोडला आहे. लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनीच अभय दिल्याचा गंभीर आरोप मुंडेंनी केलाय.
-----------
पोलिसांच्या कोठडीत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर – हे दोन नावं आता बीडच्या काळजावर ओरखडे घालणारी नावं बनली आहेत... शहरातील नामांकित असलेल्या उमाकिरण खासगी क्लासेस मध्ये याच दोन राक्षसानी एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. याच प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडे हे आक्रमक झाले आहेत..बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यात त्यांना मंत्रिपद देखील मुकावे लागले... आता बीडच्या लैंगिक प्रकरणात धनंजय मुंडे यांनी लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासनावरच बोट ठेवले आहे. या आरोपींना संदीप क्षीरसागर यांनीच पाठीशी घातले आहे. त्यांचे आरोपींसोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांची देखील चौकशी करावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
बाईट: धनंजय मुंडे,
----------
संदीप क्षीरसागर आरोपींशी संपर्कात होते! हे लाजीरवाणं आहे. हे भीतीदायक आहे. असा सुरू धनंजय मुंडे यांनी काढल्यानंतर संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी देखील आरोपाचे समर्थक करत भावावर टीकेची तोफ डागली आहे. आरोपी विजय पवार म्हणजे संदीप यांचा उजवा हात आहे! गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी थेट आमदाराच्या घरात बसलेला होता. या सर्व बाबीची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.
बाईट: डॉ. योगेश क्षीरसागर, चुलत बंधू
--------------
लैंगिक अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर थेट आरोप केले. त्यानंतर मात्र बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या आरोप प्रत्यारोपात सहभाग घेतला आहे..लैंगिक अत्याचाराची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र मुंडे यांनी क्षीरसागर यांच्यावर केलेले आरोप सिद्ध होणे गरजेचे आहे. आरोप करणे खूप सोपे असते..! या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांचा कसलाही संबंध नसल्याचे सांगत मुंडे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहे..
बाईट: बजरंग सोनवणे, खासदार
----------
बीड मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची गय कोणीही करू नये. मी पीडित कुटुंबाची स्वतः भेट घेणार आहे. आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी मी बीडच्या पोलिस अधीक्षकांना तशा सूचना देखील दिल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
बाईट: पंकजा मुंडे, मंत्री ( हा बाईट मुंबईत झाला आहे)
---------
घटना समोर आल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर मात्र गायब असल्याचे समजते..त्यांच्यावर गंभीर आरोप होऊन देखील ते अद्याप माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. आरोपींना खरंच संदीप क्षीरसागर यांचे अभय होते का? गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी त्यांच्या घरी होते का? ह्या सर्व बाबी तपासाअंती पुढे येतीलच..! आता आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडे यांच्या आरोपावर काय बोलतील याकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे.
महेंद्रकुमार मुधोळकर, बीड
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3006ZT_CHP_NP_SEIZURE
( single file sent on 2C)
टायटल- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेवर जप्तीची कारवाई, मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील साहित्य आणि बुलेरो वाहन कोर्टाने मार्फत केले जप्त
अँकर -चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील नगर परिषदेवर न्यायालयाच्या आदेशाने जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली. नगर परिषदेकडून आठ वर्षे थकलेल्या भाडे थकबाकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, तब्बल ५० लाख रुपयांच्या थकबाकीच्या अनुषंगाने नगर परिषदेमधील साहित्य कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.संजय गुंडावार यांच्या मालकीची जागा नगर परिषदेकडून भाडेतत्त्वावर भाजी मार्केटसाठी घेतली होती. दरमहा ६६ हजार रुपये भाडे ठरविण्यात आले होते. मात्र, मागील आठ वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे भाडे भद्रावती नगर परिषदेकडून भरण्यात आले नाही. संबंधित भाडे आणि व्याज मिळून सुमारे 66 लाख रुपयांची रक्कम थकीत राहिली.थकबाकी रक्कम वसुलीसाठी गुंडावार यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर आज 50 लाखाची नगर परिषद कार्यालयात जप्तीची कारवाई राबविण्यात आली. या कारवाईत मुख्याधिकारी यांच्या केबिनमधील सर्व साहित्य, खुर्च्या, संगणक तसेच नगर परिषदेकडे असलेले एक बुलेरो वाहन देखील जप्त करण्यात आले.या कारवाईमुळे नगर परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
बाईट 1) संजय गुंडावार, तक्रारदार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड:खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर परळीतील सरपंच खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेचे फोटो
Anc:खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जवर परळीतील बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गीते याचे देखील फोटो लावण्यात आल्याने चर्चा होऊ लागलीय.. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या बॅनर वर वाल्मीक कराडचा फोटो आल्यानंतर मोठी चर्चा झाली होती.. त्यानंतर ते बॅनर देखील काढण्यात आले.. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांच्या बॅनरवर अशा पद्धतीने आरोपीचे छायाचित्र झळकल्याने याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn sena beaten pkg
Feed by live u both bytes
सकाळी मारहाण व्हीडिओ दिलाय, आता कारखाण्याचे शिट्स आणि उपनेत्याचे फोटो attche केले आहेत...
Anchor : साखर कारखान्यातील उसाचे पैसे देण्याच्या वादातून ठाकरे गटाच्या उपनेत्यांना एका शेतकऱ्याला पैठण मध्ये बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत शेतकरी जखमी झाला आणि त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे आता याबाबत गुन्हा दाखल झाला असला तरी ठाकरे गटाचा हा उपनेता तथा साखर कारखान्याचा एमडी सचिन घायाळ वर कारवाई होईल का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे
Vo 1...
ठाकरे गटाच्या उपनेत्याकडून शेतकऱ्याला मारहाण
उसाचे पैसे देण्यावरन मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा आरोप
ठाकरे गटाचा उपनेता आणि बँकेचा चेअरमन सचिन घायाळ वर गुन्हा दाखल
राहुल कांबळे नावाच्या या शेतकऱ्याला साखर कारखान्याच्या चेअरमन तथा ठाकरे गटाचा उपनेता सचिन घायाळ याने बेदम मारहाण केली असा शेतकऱ्यांचा आरोप आहे, या शेतकऱ्याची चुकी इतकीच की त्याने सहा महिन्यापूर्वी 110 टन ऊस कारखान्याला दिला होता त्याचे 1लाख वर पैसे अजूनही दिले नाहीय, ते पैसे मागण्यासाठीच हा साखर कारखान्याच्या चेअरमन च्या घरी पैठण ला गेला होता साखर कारखान्याच्या चेअरमन सचिन घायाळ हा ठाकरे गटाच्या शिवसेनेचा उपनेताही आहे यांना या शेतकऱ्याला घरात बोलवलं आणि त्यानंतर घरात कोंडून त्यानं आणि त्याच्या चार साथीदारांनी बेदम मारहाण केली असा आरोप शेतकऱ्याचा केला आहे मला न्याय द्या अशी मागणी आता हा शेतकरी करतोय
Byte राहुल कांबळे, शेतकरी
Vo 2... याबाबत पोलिसांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे आणि लवकरच याबाबत कारवाई करण्यात येईल असा आश्वासन पोलिसांनी दिले आहे...
Byte अन्नपूर्णा सिंग, अपर पोलीस अधीक्षक
Vo 3....शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं ठाकरे गटाच्या शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच रान उठवलं होतं ठीक ठिकाणी आंदोलनही केली मात्र त्यांच्याच पक्षाचा एक उपनेता शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मागितले म्हणून मारहाण करतोय हे शोभनीय नाही.. पोलीस कारवाई करतीलच मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आता या मारहाण करणाऱ्या उपनेत्यावर काय कारवाई करतात याचीही जोरदार चर्चा सुरू आहे...
विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
Share
Report
Thane, Maharashtra:
ठाण्यातील मुंब्रा बायपास मार्गावर कंटेनर पलटी..
वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात..
अपघातात कुणालाही दुखापत नाही परंतु कंटेनरचे मोठे नुकसान..
मुंब्रा बायपास येथून ठाण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक अपघातामुळे काही वेळ होतो खोळंबा
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - श्री संत गजानन महाराज पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांची मोफत दाढी, कटिंग करून दिली जातेय सेवा ( WKT )
- सोलापुरात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना विविध प्रकारची मोफत सेवा देण्यासाठी संघटनांचा पुढाकार
- सोलापुरातील उपलप मंगल कार्यालयाजवळ संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम
- पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची नाभिक बांधवांकडून दिली जातेय मोफत सेवा...
- शेगाव पासून चालत येणाऱ्या वारकऱ्यांची दाढी कटिंग तसेच परीट बांधवांकडून वारकऱ्यांचे कपडे धुवून इस्त्री करून दिली जातेय सेवा
- चर्मकार बांधवांकडून वारकऱ्यांच्या तुटलेल्या चपला , बूट शिवण्याची सेवा
- संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळा निमित्ताने दिवसभर येणाऱ्या भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे वाटप
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....( WKT )
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_YSP_RADA तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
बोगस बियाण्याच्या मुद्द्यावर आमदार रवी राणांच्या कार्यकर्ते आक्रमक; जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर फेकले कपाशीचे बियाणे, कार्यकर्त्यांचा राडा
अँकर :– अमरावती जिल्ह्यात कपाशीचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकल्याचा आरोप करत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर कपाशीचे बोगस बियाणे एकच कृषी अधिकारी कार्यालयात चांगलाच राडा घातला आहे. HTBT हे प्रतिबंधित बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानंदारावर कारवाई न केल्याने कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं आहे. अजित 155-5G F1 या प्रतिबंधित बियाण्याची अमरावती जिल्ह्यात विक्री केल्याचा युवा साभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला असून युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांच जिल्हा कृषी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानंदारावर कारवाही होत नाही तो पर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची घेतली आहे.
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_congresspkg
Feed by 2C
Video 5
Byte from Mumbai
Anchor काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस संपूर्णतः संपणार आहे. कुणाल पाटील यांचा धुळे ग्रामीण मतदारसंघात मजबूत प्रभाव आहे, आणि त्यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची पकड कमी होऊन धुळे भाजपचा किल्ला होणारे.
Vo 1 गेल्या पाच दशकाची अनिर्बंध पिढीजात सत्ता असलेले काँग्रेसचा तरुण चेहरा कुणाल पाटील .... sधुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसकडून 2014 आणि 2019 या वर्षी दोन वेळा आमदार राहिले आहेत . त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2023 मध्ये धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 16 जागा जिंकून भाजपचा दारुण पराभव केला होता. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांना भाजपच्या राम भदाणे यांच्याकडून 66,320 मतांनी पराभव पत्करावा लागला. गेल्या पाच वर्षापासून भाजपप्रवेशाच्या चर्चांना विराम देत ते आता विकास कामांसाठी भाजपच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहेत. पाटील यांच्यासोबत त्यांचे समर्थक, स्थानिक कार्यकर्ते आणि काही शैक्षणिक संस्थांचा प्रभावही भाजपकडे जाणारे., जिल्ह्यातील सहकार चळवळी वरती काँग्रेसचे जे प्रभुत्व होतं तेही आता कुणाल पाटील भाजपत गेल्यामुळे संपणार आहे.
Byte कुणाल पाटील
Vo 2 कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छ प्रतिमा, उच्चशिक्षित आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला मराठा नेता भाजपाला गवसला आहे. माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पर्याय म्हणून कुणाल पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पसंती दिल्याचे बोलले जात आहे. डॉक्टर सुभाष भामरे नंतर पक्षाकडे जिल्ह्यात मजबूत आणि स्वच्छ प्रतिमेचा मराठा चेहरा नव्हता तो कुणाल पाटील यांच्या माध्यमातून मिळाला आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यामध्ये पाटील कुटुंबाचं असलेलं नातं गोत आणि शैक्षणिक संस्थांचं जाळ हे भाजपच्या पथ्यावर पडेल. कुणाल पाटील यांच्या पक्षांतरामुळे उरलीसुरली काँग्रेसची ग्रामीण भागातील पकड कमजोर होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवणे आणि नवीन नेतृत्व उभे करणे कठीण होणारे. यासाठी गेल्या तीन पिढ्यांच्या प्रमाणाईकतेला जागत त्यांनी भाजप जाऊ नये असे ज्येष्ठ नेत्यांना वाटतेय
Byte 3 हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष
GFX
सध्याची परिस्थिती
धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे वर्चस्व
2022 जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी
धुळे शहरात AIMIM चे आमदार फारूक शहा यांचा प्रभाव
काय होणार फायदा
उत्तर महाराष्ट्रात भाजपाला मराठा तरुण चेहरा गवसेल
सहकार चळवळीत प्रभुत्व वाढवण्यासाठी ही कुणाल पाटलांची होणार मदत.
खानदेशात मराठा समाजाला बळ देण्यासाठी कुणाल पाटील भाजपच्या पथ्यावर पडणार
Vo 3 उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला 2024 च्या निवडणुकीत मर्यादित यश मिळाले. भाजपने उत्तर महाराष्ट्रात विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात सामील करून घेण्याची रणनीती अवलंबली आहे. यापूर्वी अमरिशभाई पटेल आणि राजवर्धन कदमबांडे यांच्यासारख्या नेत्यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता कुणाल पाटील आणि संभाव्यतः अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाने भाजपचा प्रभाव आणखी वाढेल.
Byte विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते
Byte (प्रशांत परदेशी धुळ्याचे स्थानिक पाठवतो आहे )राजकीय विश्लेषक
Vo 3 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल. काँग्रेसला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि नवीन नेतृत्व उभे करणे आवश्यक आहे, तर भाजप या संधीचा फायदा घेऊन आपली पकड आणखी मजबूत करेल.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या लिमला गावातील महिला दारू आणि ढाबे संस्कृतीच्या विरोधात आक्रमक झाल्या असून आज महिला सरपंच प्रज्ञा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन काटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत लिमला गाव आणि परिसरातील दारू बंद करण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला. यावर ग्रामपंचायतीच्या या बैठकीला गावातील शेकडो महिला आणि पुरुष ही उपस्थित होते, दारूमुळे अनेकांची संसार देशोधडीला लागली आहेत. नव तरुण ही व्यसनाधीन होत चालले असून यामुळे गावाचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक नुकसान होत असल्याचे मत गावकर्यांनी उपस्थिती केला. तर महिलांनी मद्यपी पती मुलांकडून कुटुंबियांची कसा मानसिक शारीरिक छळ होत आहे,याची आपबीती सांगितली,येत्या 7 जुलै रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून यामध्ये परवाना धारक दारु विक्रेते आणि ढाबा बंदीचा ठराव घेतला जाणार असल्याचे गावकर्यांनी सांगितले...
बाईट- १,२- महिला
0
Share
Report