Back
चंद्रपूर युवकाला 15 कोटींची आयकर नोटीस, काय होईल पुढे?
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2706ZT_CHP_IT_FRAUD_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात दुकानात काम करणाऱ्या युवकाला 15 कोटींची आयकर नोटीस, त्रस्त युवकाने यातून सुटकेसाठी चालवली धडपड
अँकर : डॉमिनोजमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य युवकाला आयकर विभागाने चक्क 15 कोटी 48 लाख रुपये भरण्यासाठी नोटीस जारी केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात धाबा गावातील रहिवासी दिवाकर कुकुडकर याचे पाच वर्षांपूर्वी शैक्षणिक दस्तावेज हरवले. याची त्याने पोलिसांत तक्रारही केली. त्यानंतर तो गुजरातला भावनगर येथे कामाच्या शोधात गेला. तिथे त्याला KFC, PIZZA HUT यासारख्या शोरुममध्ये काम मिळाले. त्यानंतर गुजरात येथील काम सोडून मागील वर्षी तो यवतमाळ इथे आला. डॉमिनोजच्या एका शॉपमध्ये तो काम करू लागला. सगळे सुरळीत असताना मागील मार्च महिन्यात त्याला आयकर विभागाची नोटीस मिळाली. प्रारंभी त्याला सुचलेच नाही. पण जाणकारांकडून माहिती घेतली, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने आयकर विभागात जाऊन वास्तविकता सांगितली. पण सकारात्मक उत्तर मिळाले नाही. दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून, GST नोंदणी पण करण्यात आल्याची माहिती त्याला इथे मिळाली. यामुळे चक्रावून गेलेल्या दिवाकरने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर आता काय निर्णय होतो, आयकर विभाग काय भूमिका घेते आणि दिवाकर निर्दोष आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायची आहेत. पण आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिवाकरचे श्रम, पैसे आणि वेळ वाया जात आहे.
बाईट १) दिवाकर कुकुडकर, त्रस्त युवक, धाबा
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Palghar, Maharashtra:
पालघर - बोईसर मध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार पैकी तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे . मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरज यादव , धीरज यादव , अंकित गुप्ता अशी या मृत अल्पवयीन मुलांची नाव असून बोईसर मधील गणेश नगर परिसरात असलेल्या खाजगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडल्याचा समोर आला आहे . दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली . गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास भिंत ओलांडून घराच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेली . मात्र पोहताना यापैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला असून एका मुलाला पाण्याबाहेर निघण्यास यश मिळाल . या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून खड्ड्याने भरलेल्या पाण्यातून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत .
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी धरली रोखून,अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या मध्ये वादा-वादा..
अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथे रोखून धरण्यात आले आहे,मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत शेतकऱ्यांचा वादावादीचा प्रकार देखील घडला आहे. सकाळपासून प्रशासनाचे अधिकारी पोलीस पाऊस फाटा घेऊन मोजणीसाठी तिसंगी मध्ये तळ ठोकून आहेत,मात्र शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे.त्यामुळे तिसंगी मध्ये शासकीय अधिकाऱ्यांना सकाळपासून थांबून राहावे लागत आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे,अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे.
बाईट - दिगंबर कांबळे - नेते - शक्तिपीठ विरोधी महामार्ग कृती समिती,सांगली.
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_RINGAN
सातारा - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण तरडगाव येथील चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडले. मात्र यावेळी मंदिरापासून तब्बल अर्धा किलोमीटर पुढे या वारीचे रिंगण पार पडल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.दिंडींमध्ये मधील पडलेल्या अंतरामुळे दरवर्षी चांदोबाच्या लिंब या मंदिरा समोर होणारे उभे रिंगण अर्धा किलोमीटर लांबल्यामुळे वारकऱ्यांसह प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.दोन उभ्या रिंगणातून धावणारा झेंडा घेतलेला अश्व हे या रिंगणाचे वैशिष्ट असते.या रिंगणावेळी वारकरी रस्त्याचा दोन्ही बाजूला उभे राहतात आणि मग अश्व या वारकऱ्यांच्या मधोमध धावतो.धावलेल्या अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी होते.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_CONG_MORCHA_1
( single file sent on 2C)
टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचा मोर्चा, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती
अँकर -शेतकरी, शेतमजूर तसेच संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा निघाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चाला सुरुवात झाली.या मोर्चातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देणे, शेतकऱ्यांचा बोनस आठ दिवसांत जमा करणे, तसेच निराधारांच्या थकीत मानधनाचे तातडीने वितरण करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.यावेळी बोलताना आमदार वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार उद्योगपतींचे असून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला.
बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_nasikpolitics
Feed by 2C and mojo
Anchor नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागले आहेत. 2025 च्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. नेत्यांचे पक्षांतर, नव्या आघाड्या आणि प्रभाग रचनेतील बदल यामुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Vo 1 नाशिक उभाठा गटाचे हे आहेत विलास शिंदे.... सध्याचे महानगर प्रमुख असलेले विलास शिंदे आता आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त करू लागले आहेत... नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाची निमित्त आयोजित केलेल्या मिसळ पार्टीमध्ये राजकीय पक्षांतर करण्याची वेळ आली असल्याचं आग्रह त्यांना केलाय...माजी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप आणि माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजप प्रवेश केलाये. तर दुसरीकडे, ठाकरे गटाला मोठा धक्का देत महानगरप्रमुखांसह आठ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता विलास शिंदे सुद्धा नाराजी व्यक्त करत शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत
Byte 1 विलास अण्णा शिंदे नाराज महानगरप्रमुख उबाठा सेना ( सकाळी वन टू वन मध्ये पाठवला आहे)
Vo 2 यामुळे नाशिक शहरात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली आहे. प्रभाग रचनेत बदल आणि सत्तेची समीकरणे यामुळे नेते आपली पावले जपून टाकत आहेत. उभाठा गटाने मात्र पक्षांतर करणारे संधी साधू नेते असल्याचे आरोप करत आम्ही भक्कम असल्याचा दावा केला आहे
Byte दत्ता गायकवाड ज्येष्ठ नेते डीजे सूर्यवंशी जिल्हाप्रमुख उबाठा सेना
gfxनाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 11 ते 16 जून 2025 दरम्यान प्रगणक गट तयार झाले असून, 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.
vo 3 मात्र, या प्रभाग रचनेवरून महायुतीतच अंतर्गत कलह दिसून येत आहे. आपले भवितव्य सुरक्षित करण्यासाठी उभाटा गटाचे आणि महायुतीतील काही अजून काही नेते भाजपा सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. . भाजप स्थानिक पातळीवर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतेय. भाजप आणि शिंदे गटात प्रभाग रचनेवरून रस्सीखेच सुरू असून, स्थानिक पातळीवर भाजप स्वबळावर निवडणूक लढवावी अशी स्थानिकांची इच्छा आहे
Byte सुनील केदार शहराध्यक्ष भाजपा
देवयानी फरांदे आमदार भाजपा ( या दोघांपैकी एक बाईट बीजेपी बाईट नावाने लाईव्ह युने मिळेल )
Vo 4 नाशिक महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, राज्यातील राजकीय ताकदीची कसोटी आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिलीतून मुंबईच्या मोर्चासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे एकत्र निघणार..
Anc..डोंबिवलीच्या पलावा ब्रिज च्या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाकडून एकत्र येत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आले होते याची चर्चा संपूर्ण राज्यांमध्ये झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत पाच तारखेला हिंदी भाषा संक्ती विरुद्ध आणि मराठीच्या अस्मितेसाठी मोठो ना भविष्य असा मोठा असा मोर्चा निघणार आहेत या मोर्चासाठी डोंबिवलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे एकत्र निघणार आहे
Vo..महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबई मध्ये होतोय तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या एकत्र आल्याने एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे मी हा मोर्चाला भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये ठरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाला आहे साहेबांनी जे पत्र दिलेले आहे ते पत्र डोंबिवली मधील मराठी कलाकार डॉक्टर वकील की सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना उद्धव ठाकरे यांचे पत्र पोचणार आणि मोठ्या संख्येने लोक या मोर्चासाठी सहभागी होतील मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील ला देखील आम्ही आव्हान करणार आहे की आमच्याबरोबर एकत्र लोकलचा प्रवास करत मुंबईला यावे आणि मोर्चे सहभागी व्हावे
Byte.. दीपेश म्हात्रे
जिल्हा प्रमुख
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे जिल्ह्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी कलम 175 (3) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश धुळे न्यायालयाने दिले असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली होती. कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडून देखील पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने माजी आमदार अनिल गोटे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी धुळे न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणाची दखल घेत धुळे न्यायालयाने BNSS चे कलम 175/3 नुसार गुन्हा नोंदवून तपास करण्याचे निर्देश धुळे पोलिसांना दिल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास आपण औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून गुन्ह्यात धुळे पोलिसांना सहआरोपी करण्याची मागणी करणार असल्याचे अनिल गोटे यांनी म्हांटल आहे.
Byte- अनिल गोटे माजी आमदार
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :– AMT_BAWANKULE_BYTE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
शक्तीपीठ महामार्गाला कौंडण्यपूरशी जोडण्याचा प्रयत्न करू; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
अँकर :- शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शक्तीपीठ महामार्ग हा अमरावतीच्या प्रति पंढरपूर असलेल्या कौंढणपूरला जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याच वक्तव्य केला आहे त्यामुळे आता हा महामार्ग अमरावती जिल्ह्यातूनही जाणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहे. शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार पर्यंत आला असून वर्धा जिल्ह्या लगत असलेल्या कौंडण्यपूरलाही हा मार्ग जोडण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा पाहायला मिळत आहे. मी लवकरच मंत्रालयात एक बैठक घेणार आहे आणि इतर मार्गाने कौंडण्यपुरला शक्तिपीठ महामार्ग कसा जोडता येईल हा प्रयत्न आम्ही करणार असल्याचा बावनकुळे यांनी सांगितला आहे.
बाईट :– चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड जिल्ह्यातील बेने इस्रायली समाज ......
अँकर - बेने इस्रायल म्हणजे इस्रायलचे पुत्र. हे मूळचे ज्यू म्हणजेच यहुदी. दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू समाजातील काही लोक त्या काळातल्या पॅलेस्टाइन म्हणजे सध्याच्या इस्रायलमधील लोक समुद्रामार्गे पूर्वेकडे निघाले. त्यातले एक गलबत फुटले आणि त्यातली सात जोडपी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग नवगावच्या किनाऱ्यावर आली.
स्थानिक जनतेने आश्रय दिल्यावर मूळचे उद्यमशील आणि कष्टाळू असलेले हे ज्यू प्रथम सुतारकाम, तेलाचे घाणे चालवणे अशा प्रकारचे लहान-मोठे व्यवसाय करून उपजीविका करू लागले. आपले पारंपरिक व्यवसाय सचोटीने करीत हा समाज कालांतराने रायगड जिल्ह्यातून मुंबई आणि ठाणे या परिसरात नोकरी-धंद्यासाठी स्थिरावला. बेने इस्रायली जमातीपकी जवळपास ऐंशी टक्के लोक महाराष्ट्रात राहतात, त्यातही अधिकतर लोक ठाणे परिसरात राहतात. काळाच्या ओघात ही यहुदी म्हणजेच ज्यू मंडळी स्थानिक समाजाबरोबर इतकी मिसळून गेली की काही चालीरीती वगळता त्यांचे परकेपण अजिबात शिल्लक राहिले नाही.
बेने इस्रायली मराठी संस्कृतीत इतके रमले की, त्यांना ‘स्थानिक यहुदी’ किंवा 'शनवार तेली' या नावानेही ओळखले जाते. ते मराठीत बोलतात. त्यांच्या प्रचलित मराठीला ‘जुदाव मराठी’ म्हणतात. ठाण्यातले हे यहुदी त्यांचे शायली हे मासिक मराठीत काढतात एवढेच नव्हे तर इस्रायलमध्ये स्थलांतरित झालेल्या बेने यहुदी लोकांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे मराठी भाषेचे वर्ग चालविले जातात.
मराठी भाषा, मराठी खाद्यपदार्थ, मराठी जीवनशैली हे सर्व अनेक शतकांपासून स्वीकारलेल्या या यहुदींना आपण मराठी असल्याचा अभिमान आहे. विवाहप्रसंगी मंगळसूत्र घालणे, हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात, प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात, मेणबत्तीचा वापर नाही, शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी, पुरणपोळी करतात.
हिंदूंच्या दिवाळीच्या सणाच्या जवळच यहुदींचा दिव्यांचा सण असतो. ज्युडाइसम हा त्यांचा धर्म आणि सिनेगॉग ही त्यांची प्रार्थनास्थळे. किहिमकर, रोहेकर, अष्टमकर अशी आडनावे लावणारे हे बेने इस्रायली हे गेल्या काही पिढय़ांपासून मराठी संस्कृतीशी पूर्णपणे समरस झालेले आहेत.
बाईट - ए. बी. आवासकर , पुरुष
बाईट - मार्गारेट तळकर, तरुणी
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट आहे
-------
नागपूर
* नागपूरात कचरा उचलणारा ट्रॅक आणि दुचाकीचा अपघात
* वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या अपघातात घटनास्थळीच दुचाकी स्वार ठार तर 2 जण गंभीर जखमी..
* नितीन पंजेश्वर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव तर दोन जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
* कचरा संकलन करणाऱ्या ट्रकच्या चालकाला वाहनासह वाठोडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत..
Byte हरीश बोराडे, पोलीस निरीक्षक, वाठोडा पोलीस स्टेशन
0
Share
Report