Back
वाशिममध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे 15,303 हेक्टर क्षेत्राचे नुकसान!
Washim, Maharashtra
वाशिम:
File:2806ZT_WSM_CROP_DAMAGE_SURVEY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यात 25 आणि 26 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं असून 38 महसूली मंडळातील गावांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला असून तब्ब्ल 15303 हेक्टर क्षेत्रावरील नुकतीच पेरणी केलेली पिकं वाहून गेलीत.त्यामध्ये सर्वाधिक नुकसान रिसोड तालुक्यात झाला असून 51 गावाला पावसाचा फटका बसला त्यात 11964 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झालीत.प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून.लवकरच या नुकसानीचा अंतिम अहवाल मदतीसाठी शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.हातबल झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकारने खंबीरपणे उभे राहून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून केली जात आहे.
बाईट: प्रतीक्षा तेजनकर,तहसीलदार रिसोड
बाईट: शेतकरी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
6 FILES
SLUG NAME -SAT_HINDI_MANSE
महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना सातारा शहराच्या वतीने सातारा शहरातील महाराजा सयाजीराव महाराज विद्यालय येथे मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारने पहिली ते चौथीसाठी केलेल्या हिंदी सक्तीच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. दरम्यान सातारा शहरातील नागरिकांचा या स्वाक्षरी मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हिंदी सक्ती विरोधात तीव्र निषेध करण्यात आला.
byte
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2806_BHA_RAIN
FILE - 4 VIDEO
भंडाऱ्यात जोरधार पावसाची बॅटिंग
Anchor ;- भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी ते आभार यात्रेच्या निमित्ताने नागरिकांना संबोधित केले या दरम्यान उपमुख्यमंत्री यांचे भाषण संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून जोरदार पावसाने भंडाऱ्यात बॅटिंग सुरू केली आहे.यामुळे वातावरनात गारवा निर्माण झाला असला तरी भंडारा जिल्ह्याला शेती कामासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा होती आज अखेर उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावरच जोरदार पावसाने बॅटिंग केल्याने भंडारा जिल्ह्याला साठी उपमुख्यमंत्री गुड लक ठरल्याचे बोलले जात आहे.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर - लैलेश बारगजे
स्लग:- निलेश लंके
फीड 2C
निलेश लंके ऑन बबनराव लोणीकर
अँकर:-भाजपच आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार निलेश लंके यांनी निशाणा साधला आहे. हा सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे... लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा बबनराव लोणीकरांना खासदार लंकेने दिलाय...
बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
निलेश लंके ऑन मराठी भाषा ऑन ठाकरे बंधू
अँकर:- हिंदी भाषा सक्ती आणि ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यावरून खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी ही मातृभाषा असून मराठीला प्राधान्य दिल्यास पाहिजेत असं वक्तव्य निलेश लंके यांनी केला आहे. तर मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं महाराष्ट्रात मिटींग होत आहे तर मराठी बोललं पाहिजे असं लंके यांनी म्हटलं आहे. तर ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकच अजेंडा असून मराठी हा अजेंडा असून या अजेंडा खाली एकत्र आलेच पाहिजे असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय.
बाईट:- निलेश लंके, खासदार SP
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर विनय भंगाचा गुन्हा दाखल
दोन महिन्यापूर्वी उगले याला एका महिलेने भररस्त्यात दिला होता चोप
शिवसेना शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगले याच्यावर महिलेचा छळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मोहन उगले वारंवार पीडित महिलेला वाईट नजरेने पाहून तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे
पीडित महिलेने कल्याण बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने मोहन उगले या माजी नागसेवकाला भर रस्त्यात चप्पलने मारहाण केल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असताना पुन्हा विकृत शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगलेचा प्रताप समोर आला आहे
byte... पीडित महिला
चेहरा ब्लर करणे
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव/परंडा
DHARA_TEACHER
जिल्हा परिषद शाळेत गुरुजी दारूच्या नशेत, ग्रामस्थांनी केले व्हिडिओ चित्रण
सोमवार पासून दारू पिणार नाही शिक्षकाने गावकऱ्यांना दिले आश्वासन
गावकऱ्यांनी केली गटशिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार
Anchor
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाने थेट वर्गावर दारू पिऊन एन्ट्री केली. या शिक्षकाच्या वारंवार अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यासह गावकरी परेशान झालेत. शिक्षक बी एस मोहोळकर या गुरुजींनी आज दारू पिऊन वडगाव येताच
हा प्रकार मुख्याध्यापकांच्या लक्षात आला त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि सरपंच यांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच, सदस्य आणि पालक शाळेत दाखल झाले. त्यांनी संबंधित शिक्षकाला पाहिले असता तो शिकवण्याच्या अवस्थेत नव्हता. या संपूर्ण घटनेचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलवर व्हिडिओ चित्रण केले. संबंधित शिक्षकाला यापूर्वीही मद्यपान करून शाळेत न येण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.माञ शिक्षकाचे दारु पिणे थांबले नाही आज याप्रकरणी गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
0
Share
Report
Thane, Maharashtra:
राष्ट्रवादी महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते
आनंद परांजपे बाईट पॉइंटर
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आपली बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य आहे पण महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्यात येईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मांडलेली आहे आणि महायुतीच्या सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे..
कुठल्याही प्रकारचे आंदोलन केली तरी महाराष्ट्राची जनता आणि बळीराजा हा सरकारच्या मागे उभा आहे..
शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये ज्या वळेला निवडणुका होतात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांनी तर 90 पेक्षा अधिकच्या जागा लढल्या आणि केवळ दहा आमदार संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे निवडून आले त्या नैराश्येतून अजून देखील तो पक्ष बाहेर येत नाहीये महायुतीची भूमिका स्पष्ट आहे की योग्य वेळेला बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी हे महायुतीचे सरकार देईल..
18 ते 20 हजार कोटी रुपये ही वीज माफी देण्यात आली सोयाबीन असेल कापूस असेल यांना चांगला भाव देण्यात आला आणि त्यामुळे सातत्याने हे सरकार बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभी आहे ..
ज्यांना नाटक करायचे काम आहे...
ऑन राऊत..
जी भूमिका पहिली ते चौथी हिंदी नको अशा प्रकारची भूमिका ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले बहुतेक तो बाईट संजय राऊत यांनी ऐकला नसेल..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका जी राष्ट्रीय अध्यक्षांनी मांडली पहिली ते चौथी हिंदी नको पाचवी नंतर हिंदी असावी अशा प्रकारची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट होईल त्यावेळेला मुख्यमंत्री असतील त्यांच्याशी अजित दादा पवार नक्कीच या विषयावर चर्चा करतीl..
राष्ट्रवादीची भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे सोमवारपासूनच पावसाळी अधिवेशन सुरू होतंय ज्या वेळेला महायुतीचे तिन्ही नेते एकत्रितपणे बसतील त्यावेळेला योग्य तोडगा कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार घेणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलं त्यामुळे मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषेच्या विरोधात जाईल असा कुठलाही निर्णय महायुतीचे सरकार घेणार राष्ट्रवादी घेणार नाही.
त्यांना लव यू कुणाला बोलायचं होतं त्यांना विचारलं तर बरं राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा राजकीय पक्ष आहे. आमची वेगळी राजकीय भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या घटक पक्ष आहोत आणि केंद्रातील एनडीए सरकारमध्ये आम्ही आहेत..
एकत्र यायचं की नाही हे अजित पवार ठरवतील..
जयंत पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ते प्रांतात अध क्ष आहेत त्यांनी कधी कसा निर्णय घ्यावा यावर बोलू शकत नाही...
त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले असेल.परंतु अजित पवार यांच्या पक्ष कडे नाही...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती घटक पक्ष आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा महायुतीमध्येच लढण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे महाराष्ट्राचे महायुतीचे तिन्ही नेते महायुतीबद्दलचा योग्य निर्णय घेतील...
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : पहिली ते तिसरीपर्यंत हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे , तर त्यांच्या एकत्र येण्याचा फायदा राज्याला होणार का ? हिंदी सक्ती नामंजूर होणार का ? काय आहे जनतेच्या मनात पाहूया..
Byte : 6 bytes आहेत..
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाला समर्थन..
Anc हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये पाच तारखेला होणाऱ्या मोर्चेला डोंबिवलीतील नागरिकांनी समर्थन दिला आहे जे मोर्चा होणार आहे तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसांचा भलं होणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ काहीतरी करतील असा विश्वास डोंबिवलीकरांनी दर्शवला आहे
Byte... नागरिक 3
डोंबिवलीकर
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यात आगमन... जल पर्यटनाला दिली भेट
Anchor ;- शिवसेना शिंदे गट तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने भंडाऱ्यात आगमन झाले असून याप्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी मंचर उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री यांनी भंडारा शहरातील जल पर्यटन प्रकल्पाला भेट दिली आहे हे विशेष...!
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2806ZT_WSM_UNCLEAN_WATER_SUPPLY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून तोही गढूळ, गाळयुक्त आणि अस्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आला असून, हे पाणी ना पिण्यायोग्य आहे ना घरगुती वापरासाठी सुरक्षित.परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून नालेसफाई,अपुरा पाणी शुद्धीकरण प्रक्रिया आणि जलवाहिन्यांतील गाळ यामुळे पाणी पुरवठ्याचा दर्जा खालावला आहे.शहरातील अनेक भागांतून अशा निकृष्ट पाण्याच्या तक्रारी सातत्याने येत असूनही नगरपालिकेकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष गंभीर बाब मानली जात आहे.त्यामुळे लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा,अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बाईट:रवी वानखेडे,
0
Share
Report