Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar411030

शनी मंदिरातील बनावट ॲप: करोडो रूपयांची लुट, माळवदे उपोषणावर!

LAILESH BARGAJE
Jul 01, 2025 10:01:15
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- शनी बनावट ॲप; उपोषण फीड 2C अँकर:- अहिल्यानगरच्या शनिशिंगणापुर देवस्थानतील बनावट ॲप, बनावट देणगी पावत्या आणि बनावट QR कोडच्या माध्यमातुन करोडो रूपयांची लुट केल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर ठोस करवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी कामगार विभाग अध्यक्ष संभाजीराजे माळवदे यांनी शनिशिंगणापूर येथे आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी शनी मंदिराचे बनावट ॲप तयार करून भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच समोर आलं होत या विरोधात शनी मंदिर प्रशासनाने पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत तक्रार देखील दिली आहे मात्र संबंधित ॲप तयार करणाऱ्यांच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे माळवदे यांनी शनी मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या आंदोलनाला सुरुवात केली आहे. अपहार झालेल्या निधी देवस्थानच्या खात्यावर आला पाहिजे अशी मागणी माळवदे यांनी केली आहे. जोपर्यंत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा इशारा माळवदे यांनी दिला आहे. बाईट:- संभाजी माळवदे, अध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी कामगार विभाग
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement