Back
पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सजले भजनी साहित्याचे दुकानं!
Pandharpur, Maharashtra
01072025
Slug - PPR_VINA_TABALA
feed on 2c
file 02
-----
Anchor - आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली आहेत. येथील विणे गल्लीतील दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते.
वारकरी संप्रदायामध्ये वीणा,टाळ आणि पखवाज या वाद्यांना महत्वाचे स्थान आहे. किर्तन आणि भजनामध्ये तर विण्याचे स्थान आग्रभागी असते. वारी काळात वीणा वाद्याला मोठी मागणी असते. याशिवाय पखावाज आणि टाळांना ही मागणी असते. पंढरपुरात सर्व प्रकारचे भजनी साहित्याची निर्मिती व विक्री केली जाते. कच्च्या मालाचे व मजूरी दरात वाढ झाल्याने यंदा भजनी साहित्यामध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे रामेश्वर कोकाटे या विक्रेत्यांनी सांगितले.
--------
बाईट - रामेश्वर कोकाटे.भजनी साहित्य विक्रेते.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: *कितने आदमी थे, सरदार दो…* *शोले डायलॉगच्या बॅनर ने वेधले नवी मुंबईकरांचे लक्ष, घाकरे बंधुची जय आणि वीरूची जोडी*
राज और उद्धव ठाकरे का पोस्टर
FTP slug - nm thakre poster
shots - poster
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: ठाकरे बंधूनी दिलेली मोर्चाची हाक आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कार्यकर्त्यांमार्फत जल्लोष साजरा करण्यात येतोय. याच पाश्वभूमीवर ऐरोली मध्ये लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधलेय. याबॅनर वर शोले चित्रपटातील “कितने आदमी थे, सरदार दो… और तुम तीन.. फिर भी वापस लोट आये“ या फेमस डायलॉग चा उल्लेख करण्यात आला असून वरती राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. सदरचा बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलाय. शोले चित्रपटा प्रमाणेठाकरे बंधुची जय आणि वीरूची जोडी महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी पुन्हा एकत्रित लढणार असल्याचे संकेत या बॅनर मधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा बॅनर सध्या नवी मुंबईत चर्चेचा विषय बनलाय.
gf-
===============================
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी बार्शीतील शेतकऱ्याचे सरकारला इंग्रजीतून खडेबोल
- सोलापुरातील बार्शी तालुक्यात शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असताना शेतकऱ्यांनी इंग्रजी भाषेतून सरकारला फटकारले
- बार्शी तालुक्यातील शेलगाव आर येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत शक्तिपीठाला तीव्र विरोध दर्शवला..
- भास्कर एकनाथ पाटील यांची तीन एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात भूसंपादन होणार असल्यामुळे विरोध केला आहे..
- शक्तिपीठ मार्गाच्या इंग्रजी जीआरला शेतकऱ्यांनी इंग्रजी मधून उत्तर दिला आहे..
- quotation are not invited असे म्हणत भास्कर पाटील यांनी इंग्रजी भाषेतून आपली व्यथा मांडली.
- भास्कर पाटील यांनी शेतीचं महत्व पटवून देताना अंतःकरणापासून सात पिढ्यापासून राबलेली जमीन असल्याचाही त्यांनी सांगितले..
- it should be cancelled, it's needs असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या..
Byte : भास्कर पाटील, शेतकरी..
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
01072025
Slug - PPR_KHARE_BANNER
feed on 2c
file 01
------
Anchor - विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा म्हणत आमदार राजाभाऊ खरे यांनी आपण शरद पवारांच्या सोबत असल्याचे ठाम पणे दाखवले
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळीकते बद्दल पक्षात काही दिवसापूर्वी चर्चा झाली होती.
यानंतर आता पंढरपूर आषाढी एकादशी साठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनर वर आमदार राजाभाऊ खरे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांना स्थान दिले आहे.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगर मधील स्काय डोम हॉलमधील वाढीव बांधकाम जमीनदोस्त
३ हजार चौरस मीटर अनधिकृत बांधकामावर महापालिकेची तोडक कारवाई
Ulh demolotion
Anchor उल्हासनगरमधील रिजेन्सी वाणिज्य ग्रहसंकुलात असलेल्या स्काय डोम या हॉल मधील वाढीव बांधकामावर आज महापालिकेने तोडक कारवाई केली , या गृह संकुलात तब्बल ३ हजार चौरस मीटर अनधिकृत बांधकाम करून
त्यावर भाडे आकारले जात होते,
याविषयी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी तक्रार केली होती, त्यानुसार आज उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात स्काय डोम हॉल वर कारवाई केली , तीन हजार चोरस मीटर बांधकाम पाडण्यासाठी तब्बल दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिंपी यांनी दिलीय,
Byte गणेश शिंपी सहाय्यक आयुक्त उल्हासनगर महापालिका
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग – छत्री निजामपूर नावाला गोपीचंद पडळकर यांचा आक्षेप ......... रायगडवाडी नामकरण करण्याची मागणी ...... पडकळकरांच्या भूमिकेवरून ग्रामस्थांमधून संमिश्र प्रतिक्रिया .........
अँकर – स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायत हददीत येतो त्या ग्रामपंचायतीचे नाव छत्री निजामपूर आहे. ते बदलून रायगडवाडी असं करावं अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. निजामाच्या खुणा इथं कशाला हव्यात असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केलाय. त्यावरून नवीन वादाला तोंड फुटलंय. मात्र स्थानिक ग्रामस्थांमधून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीनी हे नाव बदलण्यात यावे असे सांगत पडळकरांच्या भूमिकेला सहमती दर्शवली आहे. तर काहींनी या नावामागचा इतिहास लक्षात घेवून नावात बदल करण्यास विरोध दर्शवला आहे.
बाईट 1 – आ. गोपीचंद पडळकर
बाईट 2 – स्थानिक ग्रामस्थ
बाईट 3 – स्थानिक ग्रामस्थ
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांनी शेती करत असतांना कमी खर्चाची व अधिक उत्पन्न देणारी शेती करावी. बाजारामध्ये ज्या पिकाची अधिक मागणी आहे त्याची लागवड करावी तसेच शेतीला जोडधंदा आणि नैसर्गिक शेतीची जोड द्यावी, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमांमध्ये सन 2023-24 व 2024-25 या दोन्ही वर्षांमध्ये सोयाबीन तूर, हरभरा, गहू या पिकामध्ये उच्च उत्पादन घेतलेल्या 32 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापूर रेल्वे स्थानका जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्या धोकादायक
पावसाळयात पाय घसरून पडण्याची भीती,
bdl sky walk
Anchor बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची अतिशय दुरावस्था झाली असून त्या अतिशय धोकादायक बनल्या आहेत ,त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या स्कायवॉकच्या अनेक पायऱ्यांवरील लाद्या तुटलेल्या आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्याने प्रवाशांना पायऱ्यांचा अंदाज येत नसल्याने पाय घसरून अपघात होत आहेत .त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे
चंद्रशेखर भुयार ( बदलापुर )
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलन
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर येथील मुख्याध्यापकाची झालेली बदली तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन सुरू केला आहे रयत शिक्षण संस्थेची नगर शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या शाळेत शिवाजी लंके हे मुख्याध्यापक आहेत त्यांची बदली संस्थेतील दुसऱ्या शाळेवर झाली आहे मात्र या बदलीला विद्यार्थी आणि पालकांनी विरोध करत रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे शिवाजी लंके यांची बदली झाल्यामुळे शाळा पूर्णतः बंद झाली असून एकही विद्यार्थी शाळेमध्ये गेला नाही आमचे लाडके सर परत द्या लंके सरांची बदली रद्द करा असे फलक घेऊन विद्यार्थी आणि पालक रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आंदोलन करत आहे जोपर्यंत बदली रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी सांगितलं
बाईट:- रुद्र गुंजाळ, विद्यार्थी
बाईट:- स्नेहल सानप, पालक
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - महागाड्या बुलेट चोरणाऱ्या बुलेट राजाला त्याच्या साथीदारासोबत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हशवर्धन जगदाळे वय 22 व किरण कोळी या दोघांनी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा येथून चोरी केलेल्या 14 बुलेट पोलिसांनी जप्त केले आहेत. हर्शवर्धन हा स्वताला बुलेट राजा म्हणून गावात मिरवत होता. वेगवेगळ्या बुलेट त्यांच्याकडे असल्याने त्याच्यावर धुळे एलसीबी पथकाला संशय आला. हर्शवर्धन जगदाळे याला ताब्यात घेतले असता, त्याने त्याचा साथीदार किरण कोळी सोबत 14 बुलेट चोरी केल्याची कबुली दिली असून, लपवून ठेवलेल्या 14 बुलेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यां दोघांनी अजून कुठे अन्य गिन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.
Byte :- श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- आज परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. पण परभणी तालुक्यातील पोखरणी फाटा येथिल चक्काजाम आंदोलन मात्र पावसा मध्येही सुरूच होते. भर पावसात शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लाऊन धरली होती. तब्बल दोन तास परभणी गंगाखेड महामार्ग आंदोलकांनी आडवला होता. यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
0
Share
Report