Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

प्रेमात तणावामुळे 23 वर्षीय तरुणाने घेतली आत्महत्या!

YOGESH KHARE
Jun 28, 2025 06:32:28
Nashik, Maharashtra
nsk_sucide feed by 2C vidoe 2 image 1 Anc: जायखेडा येथील विकी रवींद्र अहिरे या २३ वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधातील सततच्या तणावाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तेव्हा काही दिवसांपासून तरुणीचे कुटुंबीय संबंधित तरुणास सतत धमक्या देत होते, त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देत होते, असा आरोप करण्यात येत आहे. घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, मृतदेहाचे पोस्टमार्टम न करता, प्रथम संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी, संबंधित व्यक्तींपैकी एक होमगार्ड असल्याने त्याला तत्काळ सेवेतून निलंबित करावे, अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement