Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूरमध्ये १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचा संप, नागरिकांच्या जीवाला धोका!

VAIBHAV BALKUNDE
Jul 01, 2025 09:06:04
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन.... AC ::- समान काम, समान वेतन... त्यासोबतच योग्य सुविधा आणि सुरक्षित रुग्णवाहिका मिळाव्यात, या मागण्यांसाठी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेतील डॉक्टर आणि चालकांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा ठप्प झाल्या आहेत. दिवसेंदिवस जीर्ण व धोकादायक गाड्यांमधून सेवा देताना होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी थेट संपाचा मार्ग पत्करला आहे. ‘समान वेतन, समान काम’ या तत्त्वावर त्यांनी सरकारकडे वारंवार मागणी केली, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अखेर, आजपासून काम बंद आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनामुळे लातूर शहरांसह ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा कोलमडली असून नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. आता प्रशासन आणि शासन या गंभीर स्थितीची कशी दखल घेतं, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बाईट ::- आंदोलक  बाईट::- आंदोलक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement