Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 16, 2025 02:47:41
Nashik, Maharashtra:घरफोडीतील वीस लाखांच्या सोन्यासह व्यावसायिक जाळ्यात नेपाळमध्ये पळून गेलेल्या अट्टल गुन्हेगाराकडून घरफोडीत लुटलेले सोने घेऊन नाशिकरोडला आलेल्या सराफाला गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने बेड्या ठोकल्या. महेश पिंगळे असे संशयिताचे नाव आहे....सिडकोतील वंदना अहिरे यांच्या बंगल्यात २० ते ३० ऑक्टोबरदरम्यान घरफोडीची घटना घडली होती. सोळा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाकडे होता. घरफोडीतील सोने विक्रीसाठी एक व्यक्ती नाशिकरोड येथील सराफ बाजारात येणार असल्याची माहिती हवालदार दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप यांना मिळाली. पिंगळे हा संशयास्पद वावरताना आढळून येताच, त्यास पकडले. त्याने अट्टल घरफोड्या गणेश मारुती भंडारी व त्याचा साथीदार दीपक आहिरे यांच्याकडून चोरीचे सोने विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली. पथकाने सातपूर भागातील शिवाजीनगर गाठले. तेथे भंडारी हा लहान खोलीत वास्तव्याला होता. पोलिसांची कुणकुण लागताच तो निसटला. पोलिसांनी बंद खोलीचे कुलूप उघडून तपासणी केली असता घरफोडी करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक, तीक्ष्ण हत्यारे आढळून आली.... पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे.....
39
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 16, 2025 02:46:32
Beed, Maharashtra:बीड : मला विरोध करण्यासाठी नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका.. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा आ.धनंजय मुंडे यांच्यावर आरोप बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात त्यांचा विरोध होणार याची कल्पना मी अजित पवारांना दिली.. अँकर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.. माजलगाव मतदार संघातील माझे विरोधक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची परळी तालुक्यातील नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका होत आहेत.. याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटले असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना अजित पवारांना यापूर्वीच कल्पना दिलेली आहे.. विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते तेच आता देखील होणार आहे.. असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.. दरम्यान माझ्या मतदारसंघातील धारूर व माजलगाव या नगरपालिकेच्या निवडणुका होत असून या ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा होती.. परंतु भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या दोन्ही ठिकाणी भाजपच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल दिला आहे.. त्यामुळे आमची राजकीय ताकद वापरून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रकाश सोळुंके यांनी म्हटले आहे.. दरम्यान आता आमदार सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची पक्ष काय दखल घेतो आणि धनंजय मुंडे या सर्व आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. बाईट : आमदार प्रकाश सोळंके
77
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 16, 2025 02:45:54
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. तापमान तब्बल ९ अंश सेल्सिअस नोंदवल्याने सकाळी लवकरच गारठा जाणवू लागला असून नागरिकांना हुडहुडी भरत आहे. थंडीच्या या वाढत्या लाटेतही मॉर्निंग वॉकला नागरिकांची विशेष पसंती दिसून येत आहे. ऊबदार कपडे, मफलर आणि जाकेट घालून अनेक जण सकाळी फेरफटका मारत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने येत्या दोन ते तीन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक आरोग्य तज्ज्ञांनीही थंडीत योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला असून गरम पाणी पिणे, उबदार कपडे वापरणे आणि सकाळच्या धुक्यात अनावश्यक फिरणे टाळण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागात वाढलेल्या थंडीमुळे बाजारपेठेत ऊबदार कपड्यांची मागणीही वाढताना दिसत आहे. नाशिक ग्रामीणमध्ये थंडीची लाट तीव्र होत असताना नागरिक मात्र आरोग्यासाठी सकाळच्या चालण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत.
92
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 16, 2025 02:31:10
178
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 16, 2025 02:30:33
151
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 16, 2025 02:15:52
Pune, Maharashtra:राज्यातील ग्रामीण आरोग्यसेवेला मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी तसे संकेत दिले आहेत. अहил्या–नगराच्या राळेगण सिद्धी येथे उभारण्यात आलेल्या नव्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी समाधान व्यक्त केले. राळेगण सिद्धीत झालेल्या या दौऱ्यात त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही विशेष भेट घेतली. महाराष्ट्रातील इतर ग्रामीण रुग्णालयांसाठी जवळपास पाँच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रस्तावित असून संबंधित फाईल सध्या वित्त विभागाच्या अंतिम टप्प्यात आहे. मंजरी मिळताच राज्यातील इतर अपूर्ण रुग्णालयेही तातडीने सुरू करण्याचे आश्वासन आंबिटकर यांनी दिले.
77
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 16, 2025 01:15:44
Kolhapur, Maharashtra:राज्यात नगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अनेक नवनवे राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहे.. असंच नव समीकरण राजकीय विद्यापीठ म्हणून परिचित असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने उदयास येत असताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कागल नगरपरिषदेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ याचे निर्विवाद वर्चस्व आहे. हे वर्चस्व रोखण्यासाठी हसन मुश्रीफ याचे कट्टर राजकीय विरोधक शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीतसिंह घाटगे आणि शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक याचे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात दोन्ही नेत्याची प्राथमिक बैठक झाली असल्याचे माहिती समोर येत आहे. समरजीतसिंह घाटगे आणि संजय मंडलिक हे कागल नगरपरिषद निवडणूक निमित्ताने एकत्र आले तर कागल बरोबरच मुरगूड नगर परिषदेमध्ये हसन मुश्रीफ याच्या समोर तगडे आव्हान उभं राहू शकत.. त्यामुळे कागल मधील या नव्या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे... समरजीत घाटगे असो वा शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक असो या दोघांनी या संदर्भात अधिकृत कोणतेही भूमिका जाहीर केलेली नाही. पण या दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचं खात्रीशीर सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय विद्यापीठ असणाऱ्या कागल नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने नेमक्या काय राजकीय हालचाली होतात याची उत्कंठा लागून राहिली आहे.. कारण 2016 च्या नगर परिषद निवडणुकीमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांची साथ दिल्याने कागल नगरपरिषदे मध्ये हसन मुश्रीफ यांचे पारडे जड झाले होते.
150
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 01:15:35
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:एसटी चालक-वाहक की सतर्कता से वृद्ध प्रवाशी के जीवन को बचाने वाली घटना सांगली में हुई। तासगाव डेपो की एसटी बस आटपाडीहुन इचलकरंजीकडे जा रही थी; इस बस में एक वृद्ध यात्री भी यात्रा कर रहा था। सांगली शहर के पास बस से गुजरते समय वृद्ध यात्री के छाती में दर्द शुरू हो गया और हार्ट अटैक के संकेत नजर आने लगे। अन्य यात्रियों ने यह स्थिति चालक और कंडक्टर को बताई, जिन्होंने तुरंत हरकत में आकर बस को तुरंत सांगली के शासकीय अस्पताल पहुँचाया और वृद्ध यात्री का उपचार शुरू किया गया। समय रहते चिकित्सा मिलने से वृद्ध की जान बच गई, जिसके कारण चालक और कंडक्टर की प्रसंगावधान की खूब सराहना हो रही है।
201
comment0
Report
Advertisement
Back to top