Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

चिखली तालुक्यात गार से किसानों के प्याज, गेहूँ, चना और फलों को नुकसान

MNMAYUR NIKAM
Mar 19, 2026 11:05:53
Buldhana, Maharashtra
चिखली तालुक्यात गारांचा पाऊस .. शेतकऱ्यांच्या कांदा पिकासांह, गहू हरभरा सह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज .. तर आंबा सह इतर फळबागांचे ही नुकसान झाल्याचा अंदाज .. अगदी हरभऱ्याच्या दाणा एवढ्या गारी पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या कांदा, गहू, हरभरा , आंबा सह इतर पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे .. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते .. रात्री सुद्धा शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला . मात्र आज दुपारी चिखली तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे ..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 19, 2026 12:17:21
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 19, 2026 12:00:27
Beed, Maharashtra:बीड: निवडणूकीच्या काळात मला मोठमोठे नेते संपवायला निघाले होते; आमदार धनंजय मुंडे यांचं धक्कादायक विधान ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो.. सर्वदूर जे एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम करता येईल त्याकरिता महाराष्ट्रातील मोठ मोठे नेते सर्व काही करत होते. शेवटी मला वाटलं आपल्या मध्ये काहीतरी नक्कीच आहे... हे बाबा आपल्याला पुरून उरेन.. असे त्यांनी वाटत असावे..! एवढं वातावरण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया युट्युबचे चैनल या परिस्थितीत सुद्धा परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. असे वक्तव्य परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या मनातील सल पुन्हा एकदा बाहेर पडली आहे.
579
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 19, 2026 11:51:16
Bhandara, Maharashtra:वाघाने घेतला एकाचा बळी.... मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला केलं ठार..... भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथील वसंत मेश्राम 52 वर्ष हा व्यक्ती सकाळी शेतावर मोहफुल वेचण्यासाठी गेला असताना अचानक वाघाने हल्ला करत ठार केला आहे. गावातील व्यक्ती वाघाने मारल्यावर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल झाली. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत व परिवारातील व्यक्तीला नोकरी देण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या नंतर मृतकाचे स्वविछेदनकरीता पाठविण्यात आले. मात्र वाघाने एक बळी घेतला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....
1019
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 19, 2026 11:40:08
Chandrapur, Maharashtra:2027 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मी पुन्हा चंद्रपुरात येईन, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले संकेत, चंद्रपूरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीांनी मी पुन्हा येईल असे म्हटले होते, त्याच पद्धतीने मी पुन्हा चंद्रपुरात येईन, विकासाचा झंझावात करेल असे भाष्य चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी बल्लारपूर येथून सलग चार वेळा निवडणूक जिंकली आहे. चंद्रपुरातून त्यांना तीन वेळा मतदारांनी संधी दिली आहे. चंद्रपूरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीांनी ज्या पद्धतीने मी पुन्हा येईन असे म्हटले होते, त्याच पद्धतीने मी पुन्हा चंद्रपुरात येईन, विकासाचा झंझावात करेन असे भाष्य केले. चंद्रपूर मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा पक्षांतर्गत वाद सुरू आहे. नवे भाष्य या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. सध्या किशोर जोरगेवार चंद्रपूर येथून भाजपचे स्थानिक आमदार आहेत.
939
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 19, 2026 11:39:44
Yavatmal, Maharashtra:यवतमाल के किसान साहेबराव करपे ने निराशा और कर्जबारी से प्रेरित होकर परिवार सहित सामूहिक आत्महत्या कर ली थी। उनकी स्मृति में पुसद में अन्नत्याग आंदोलन किया गया। किसानों की आत्महत्याओं को रोकने के लिए बळीराज के लिए अन्नत्याग आंदोलन हर वर्ष किया जाता है। किसानों की फसलें—कॉटन, सोयाबीन, प्याज, हरभरा आदि—सरकारी हस्तक्षेप के कारण प्रभावित हो रही हैं। किसानों के आत्महत्याओं की संख्या बढ़ी है। इसलिए नागरिकों सहित विविध संघनों ने एक दिन उपवास किया। सरकार को किसानों के श्रम की कीमत चुकानी चाहिए, फसल के लिए हमीभाव देना चाहिए और उन्हें कर्जमुक्त करना चाहिए—यह मांग इस अवसर पर की गई।
903
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 19, 2026 11:19:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - सांगलीच्या खानापूर घाटमाथ्याला गारपीठीचा तडाखा,द्राक्षांना फटका. अँकर - सांगलीच्या खानापूर घाट माथ्यावर गारपीट झाली आहे.वादळी वारयासह भिवघाट,हिवरे सहपळशी व आसपासच्या परिसरला गारपिटीचा तडाखा बसला आहे. दुपारच्या सुमारास जोरदार अशी गारपीट झाली आहे.गारपीटीचा मोठा फटका हा द्राक्ष बागांना बसण्याल्याची भीती व्यक्त केली जात आहे.द्राक्षांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पळशीला देखील मोठी गारपीट झाली आहे, या गारपिटीमुळे द्राक्षांना मोठा फटका बसला आहे.पळशी मध्ये निर्यातक्षम द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते,त्यामुळे छाटणीसाठी आलेल्या द्राक्षांना गारपिटीचा द फटका बसल्याचं भीती व्यक्त केली जात आहे. एक दिवसापूर्वी सांगलीसह मिरज तालुक्याला गारपिटीने झोडपून काढलं होतं, आज खानापूर घाटमाथ्यावर गारपीट झाली आहे.त्यामुळे द्राक्ष शेतीला याचा फटका बसणार आहे.
1100
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 11:05:30
Shirdi, Maharashtra:अशोक उर्फ कॅप्टन खरात अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.. चाकणकरांनी मात्र कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणाऱ्या आरोपांबाबत माहित नसल्याचं म्हंटल आहे.. एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता "कॅप्टन भोंदूबाबा" या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते.. त्यासमयी मात्र अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती.. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारणामे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. एक वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? याबाबत दत्तात्रेय खेमनर यांच्याशी सविस्तर बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
1097
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 19, 2026 10:49:54
1087
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 19, 2026 10:22:29
1092
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 19, 2026 10:06:16
Ambernath, Maharashtra:बदलापुरात 15 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचं लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण शिरगाव आपटेवाडी परिसरातील पाण्याची समस्या निकाली आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलापूरमध्ये तब्बल 15 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचं लोकार्पण आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या जलकुंभामुळे शिरगाव आपटेवाडी परिसरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. नगरोत्थान महाभियान योजनेतून हा जलकुंभ उभारण्यात आले आहे. तब्बल २२, मीटर उंच आणि 15 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेला हा जलकुंभ उभारण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागलेल्या असतानाच या जलकुंभачं लोकार्पण झाल्यामुळे आता शिरगाव आपटेवाडी परिसरातील रहिवाशांना मुबलक पाणी मिळणार असून या भागातील पाण्याची समस्यााही कायमस्वरूपी मार्गी लागली आहे.
1066
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 09:48:47
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी जो काही संशय व्यक्त केला आहे, तो संशय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं मिटकरी म्हणाले. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा लागू असतानाही अशा प्रकारे अघोरी पूजा झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बारामतीतील सहयोग सोसायटीसमोर, दादांच्या बंगल्यासमोर तसेच देवगिरी बंगल्यासमोर अशा प्रकारचे प्रकार झाल्याचं समजत असलं तरी या गोष्टींवर आमचा विश्वास नसल्याचंही ते म्हणाले. मात्र अघोरी विद्येचा प्रकार का केला गेला? काही लोकांना अजित पवार नकोसे झाले होते का? यामागचा मास्टरमाइंड कोण? कॅप्टन अशोक खरात यांचे काही मोठे भक्त आहेत का? तसेच त्यांचे व्ही. के. सिंग यांच्याशी संबंध आहेत का? या सर्व गोष्टींचा एसआयटी तपासातून खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीही मिटकरी यांनी केली. तसेच अघोरी पूजा आणि अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा संबंध नाकारता येत नाही, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
1059
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 19, 2026 09:47:44
1096
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 19, 2026 09:15:23
Shirur, Maharashtra:निसर्ग कोपलाय... आणि नशीब फाटलंय! ज्या मातीतून सोनं उगवण्याची स्वप्नं पाहिली, त्याच मातीने आज शेतकऱ्याचे अश्रू प्यायलेत. पश्चिम महाराष्ट्राचा वैभव असलेल्या पुणे जिल्ह्यात आभाळ फाटलं आणि इंदापूर, बारामतीसह शिरूरच्या काळजाला घरं पडलीत! कुठे सोसाट्याचा वारा, तर कुठे आभाळातून बरसणारे पांढरे गारांचे गोळे! अवघ्या काही मिनिटांच्या या निसर्ग कोपाने उभा शेतीमाल आडावा झालाय बळीराजा च्या डोळ्यात अश्रृ आलेत. आब्याच्या बागात कैय्रांच खच गळून पडलाय गव्हाचं सोनं काळं पडलंय, तर टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झालाय. हा पाऊस नव्हता... हा बळीराजाच्या घामावर पडलेला नियतीचा घाव होता! नुकसान ग्रस्त शेतकरी: नाना फुलसुंदर नुकसान ग्रस्त शेतकरी: गणेश जामदार सांगा आता आम्ही जगायचं कसं? खतं, बी-बियाणं आणि औषधांसाठी कर्ज काढलं होतं. पीक काढणीला आलं की कर्ज फेडू ही आशा होती, पण या गारांनी सगळं स्वप्नच चिरडून टाकलं. वावरात आता फक्त चिखल आणि अश्रू उरलेत! टोमँटो उत्पादक शेतकरी जगाचा पोशिंदा आज स्वतःच्या अन्नासाठी हवालदिल झालाय. बाजारभाव पडलेत म्हणून आधीच कंबरडं मोडलं होतं, आता निसर्गाने उरलं सुरलंही हिरावून नेलंय. आता प्रश्न एकच आहे... सरकारला या रडणाऱ्या डोळ्यांची आणि पडलेल्या शेतीमालाची दखल घ्यायला वेळ मिळेल का? की पुन्हा एकदा पंचनाम्यांच्या खेळात बळीराजाचा जीव टांगणीला लागणार? धर्मराज रासकर (नुकसान ग्रस्त शेतकरी) बळीराजा संकटात सापडलाय मदतीची हाक देतोय. त्यामुळ जगाच्या पोशिद्यांची आर्त हाक ऐकून मायबाप सरकार बळीराजा च्या मदतीला धावणार का हे येत्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे. बारामती वरून जावेद मुलाणी सह शिरूर वरूण हेमंत चापुडे झी मिडीया पुणे...
1045
comment0
Report
Advertisement
Back to top