Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या बसस्थानक उद्घाटनाला मिळाला 5 वर्षानंतर मुहूर्त.

Oct 14, 2024 06:50:44
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या बसस्थानकाचे उद्घाटन 5 वर्षानंतर होत आहे. 11 महिन्यात पूर्ण होणार्‍या या कामात कंत्राटदाराच्या संथगतीने व न्यायालयीन अडथळ्यांमुळे विलंब झाला. लोकप्रतिनिधींनीही यावर योग्य पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रवाश्यांना तात्पुरत्या बसस्थानकातून बस सुटत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्र्यांकडून आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. प्रवाश्यांना नवीन बसस्थानकातून सर्व सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 12, 2025 06:47:17
Kalyan, Maharashtra:कल्याण मोहने परिसरातील धक्कादायक घटना. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद गरोदर महिलेला मारहाण.. जखमी महिलेच्या बाळाचा पोटातच मृत्यू. टोपी वरून झाला वाद गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारल्यान पोटातच बाळाचा मृत्यू. डोक्यावरील टोपी काढून ती टोपी आरोपीन स्वताच्या डोक्यात घातली. त्यानंतर हीच टोपी तक्रारदार यांनी आरोपीच्या डोक्यावरून काढून आपल्या मित्राला पुन्हा परत दिली. याच गोष्टीचा मनात राग येऊन आरोपी अफजल, बाबा, शब्बीर शेख या तिघांनी शेजारी राहणारे यांना मारहाण कारण्यात आली. मारहाणीत गरोदर असलेल्या महिलेच्या पोटात जोरात लाथा बुक्क्याने मारहाण केल्यान तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण जवळील मोहने गावातील लहूजीनगर येथे घडली. या महिलेवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 12, 2025 06:36:09
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 12, 2025 06:30:17
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरच्या पाणी प्रश्नाववरून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका अधिकारियोंांना घेतले फैलावर - सोलापूरच्या पाणी प्रश्नावर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक - बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना घेतले फैलावर - सोलापूरकरांना रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत होणारा पाणीपुरवठा बंद होणार - अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत कडक शब्दात सुनावले - पाणी पुरवठ्याची 882 कोटी रुपयांची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याचे अण्णा बनसोडे यांचे आश्वासन - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 12, 2025 06:07:59
Dhule, Maharashtra: सारंगखेडा घोडेबाजारात 15 कोटींचा ब्रम्होस चर्चेत आहे. त्याच्या मालकाला तो विकायचा नाही म्हणून त्याची 15 कोटीना किंमत ठेवली आहे. विशेष म्हणजे त्याला 8 कोटी रूपायांची बोली लागली होती. पण त्याच्या मालकांना तो विकायचा मोह झाला नाही. कसा आहे हा घोडा, आणि का आहे त्याची इतकी किंमत पाहूया. साध्य बाजारात चर्चा आहे ती डिफेन्डर गाडीची, श्रीमंताना डिफेन्डरची भुरळ आहे, मात्र एखाद्या महागड्या लक्झुरियेस डिफेन्डर, मर्सेडीजपेक्षाही महाग घोडा असेल तर? ऐकून धक्का बसेल, लेकिन सारंगखेड्याच्या घोडेबाजारात असा एक घोडा दाखल झाला आहे. गुजरातच्या पाटण येथून आलेला ‘ब्रम्होस’ नावाचा हा घोडा तब्बल 15 कोटी रुपये किमतीचा असल्याची चर्चा असून, बाजारात त्याच्याभोवतीच गर्दी उसळली आहे. सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झालेला हा काळा, रुबाबदार आणि लयबद्ध चालणारा घोडा म्हणजे ब्रम्होस. कपाळावरचा आकर्षक पांढरा पट्टा आणि मारवाडी जातीची उठावदार ठेवण हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. गुजरातच्या नागेश देसाई यांच्या देसाई स्टडफॉर्मवर पाळलेला हा घोडा आता बाजारात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुष्कर बाजारात या घोड्याला 8 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली होती. परंतु देसाई कुटुुबांना 15 कोटी किंमत असूनही ब्रम्होस विक्रीसाठी तयार नाही. 36 महिन्याचा, तब्बल 63 इंच उंचीचा ब्रम्होस आज देशातील टॉप अश्वांपैकी एक मानला जातो.याच्या खानपानाची काळजीही तितकीच विशेष—दिवसभरात तब्बल 15 लिटर दूध, तसेच अश्वतज्ज्न्यांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक खाद्य.देखभालीसाठी दिवसभर स्वतंत्र मजूर, मसाज, ग्रुमिंगची विशेष व्यवस्था असते.त्यामुळेच देशभरात झालेल्या अनेक अश्व स्पर्धांमध्ये ब्रम्होस नंबर वन ठरला आहे. Byte नागेश देसाई, मालक Vo - सारंगखेड्याच्या या ऐतिहासिक घोडेबाजारात यंदा ब्रम्होसने खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा रुबाब, उंच किंमत आणि तुफान लोकप्रियता यामुळे हा घोडा बाजाराचा शोस्टॉपर ठरला आहे. ब्रम्हामोस हा ब्लड लाईन घोडा आहे, त्यामुळे त्याच महत्व ब्रिडींगसाठी सर्वाधिक आहे. अजून त्याची पुर्ण वाढ झालेली नाही. जसा तो वाढेल तसं अधिक रुबाबदार होईल. Byte जयपाल रावल अध्यक्ष चेतक फेस्टिवल Vo - देसाई स्टडफॉर्मवर ब्रम्होसच्या ब्लुडिंगमधून आतापर्यंत 10 पिलं तयार झाली आहेत. या सर्व पिल्लांना बाजारात लाखोंच्या बोली लागल्या आहेत.म्हणूनच हा घोडा भविष्यात केवळ हॉर्स ब्रीडिंगसाठी वापरण्याचा निर्णय देसाई कुटुंबाने घेतला आहे. पण ब्रम्होस सध्या अश्व प्रेमाच्या डोळ्याचे पारणे फेडतोय. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 12, 2025 05:48:20
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 12, 2025 05:47:59
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी येथील वेकोलीच्या निलजई खदान आणि घुग्घुस येथे महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कोल वॉशरी येथे सीबीआय आणि दक्षतेच्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यामुळे संपूर्ण कोळसा व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुमारे १२ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोलवॉशरी, निलजई खदान, वेब्रिज आणि उपक्षेत्र कार्यालयात व्यापक चौकशी करीत कागदपत्रे जप्त केली. कर्नाटकातील शक्ती नगर येथील रायचूर थर्मल पॉवर स्टेशन साठी निलजई खाणीतून जी-१३ ग्रेड कोळशाचे वाटप करायचे होते मात्र त्याऐवजी जी-10 ग्रेड कोळसा पोहचत होता. महामाया इन्फ्राच्या वॉशरीत कोळसा धुतला जायचा, तक्रारीनुसार कोळशाच्या ट्रकची यातायात, वेब्रिज रेकॉर्ड आणि कोळसा धुण्याच्या साठ्यात "गंभीर विसंगती" आढळली. यात सीबीआय काय अहवाल देते याकडे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 12, 2025 04:36:11
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 12, 2025 04:17:39
Amravati, Maharashtra:कापूस वेचणीदरम्यान फत्तेपूर येथील ३० वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली. पूनम अंकुश राऊत असे मृत महिलेचे नाव आहे. फत्तेपूर जावरा येथील गजानन राऊत यांच्या शेतात आपल्या पतीसह पूनम राऊत या कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. दुपारी जेवण आटोपल्यानंतर दोघे पुन्हा कामास परतले असता पूनम यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. येथील काही मजूर महिलांनी मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड झाल्याने त्यांना तातडीने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पूनम राऊत यांच्या निधनाने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पच्छात पती, एक सात वर्षांचा लहान मुलगा आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top