Back
अकोला महापालिका सत्ता की घमासान: काँग्रेस-भाजपा के बीच हाई-टेंशन पॉलिटिक्स
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 11:31:58
Akola, Maharashtra
अकोला महापालिकाेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा और कांग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाल सुरू असून शहरात ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच गोड बातमी देणार असल्याचं वक्तव्य साजिद खान पठाण यांनी केलं आहे. 41 नगरसेवकांच्या संख्याबळासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस, एमआयएमचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविकेचे पती तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबद्दल सकारात्मक चर्चा झाली असून उद्यापर्यंत सत्ता स्थापनेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून केवळ चर्चेसाठीच आम्ही आलो होतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक रफिक सिद्दिकी यांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजपसोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नसून भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका एमआयएमने स्पष्ट केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष बाब म्हणजे अकोला महापालिकेची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र लढवली होती. राष्ट्रवादीच्या एका महिला उमेदवाराचा विजय झाला असतानाच, त्यांचे पती काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला उपस्थित होते. मात्र आपण केवळ लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे ,अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनीही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून आपल्याला मोठ्या पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली असून भेटीसाठी आलेल्या सर्व पक्षांनी आधी एकत्रित संख्याबळ दाखवावं, त्यानंतरच आम्ही निर्णय जाहीर करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. अकोला महापालालिकेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र पाच नगरसेवकांची संख्या असलेली वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण अकोल्याचं लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 22, 2026 12:36:020
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 22, 2026 12:35:360
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 22, 2026 12:26:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 22, 2026 12:02:350
Report
ABATISH BHOIR
FollowJan 22, 2026 11:25:290
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 22, 2026 11:21:520
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 22, 2026 11:12:340
Report
ABATISH BHOIR
FollowJan 22, 2026 10:49:010
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 22, 2026 10:47:440
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 22, 2026 10:34:420
Report
PNPratap Naik1
FollowJan 22, 2026 10:22:510
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 22, 2026 10:22:360
Report
DPdnyaneshwar patange
FollowJan 22, 2026 10:19:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 22, 2026 10:18:300
Report