Back
मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने मालवाहू ऍपे ला धडक दिली!
Yavatmal, Maharashtra
आर्णी दिग्रस मार्गावर रात्री दोन वाजताच्या सुमारास मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने मालवाहू ऍपे ला धडक दिली, ज्यामुळे ऍपे पलटी होऊन चालक जखमी झाला. राठोड यांनी स्पष्ट केले की, अपघातात ते आपल्या गाडीत नव्हते, तर ताफ्यातील दुसऱ्या वाहनात होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले आहे का याबाबत पोलीस चौकशी करतील. त्यांनी सांगितले की, रस्त्यावर खड्डे व अपूर्ण कामामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे, आणि अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती पोलिसांना सूचित न करता करण्यात आल्याबाबत त्यांना माहिती नाही.
1
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0107ZT_INDAPURATNKR
FILE 3
इंदापूरजवळ लिक्विड अमोनियाचा टँकर पलटला एक जण जखमी
ANCHOR :— पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लिक्विड अमोनिया वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना आज पहाटे घडली आहे .इंदापूर बाह्य वळणावरील व्यवहारे पेट्रोलियम समोर आज पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. टँकरमधील एक जण जखमी झाला असून त्याला इंदापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस, नगर परिषदेची अग्निशामक यंत्रणा आणि सरडेवाडी टोल कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून टँकरवर पाण्याचे फवारे मारण्यात आले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही...
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने मित्राचा,दोघा अल्पवयीन मित्रांकडून खून..
अँकर - समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने एका मित्राचा त्याच्या अल्पवयीन मित्रांकडून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या आरग येथे घडला आहे.सुजल पाटील वय,21 असं मृत तरुणाचं नाव आहे,
आर्मी मधील एका तलावामध्ये अर्धनग्न अवस्थेत सुजल याचा मृतदेह आढळून आला होता. सुजल आणि त्याचे दोघे मित्र हे बेळंकी या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले होते, त्यानंतर तिघेही दुचाकीवरून घरी परतत असताना,आरग मधल्या बेळंकी रोडवरील तलावाजवळ पोहोचले असता,दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रांकडून सुजल याच्यासोबत समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र सुजलने विरोध केल्याने,चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल याला मारहाण करत तलावातल्या पाण्यात बुडवून ठार करत अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला,या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सुजलच्या दोघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतला आहे.मात्र समलैंगिक संबंधातून अल्पवयीन मित्रांकडूनच मित्राचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
बाईट - अजित सिद - पोलीस निरीक्षक,मिरज ग्रामीण..
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _ डहाणू तालुक्यातील बाडापोफरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि विजेच्या समस्यांबाबत आमदार राजेंद्र गावित यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकात या भागातील ग्राम पंचायत सरपंच, प्रतिनिधी तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांना लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन उपस्थित अधिकारी वर्गाने दिले आहे.
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _ उबाठा पक्षाचे विक्रमगड तालुका प्रमुख संजय आगिवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उपनेते निलेश सांबरे, तसेच जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख वैभव संखे उपस्थित होते. आगिवले यांच्या प्रवेशामुळे विक्रमगड तालुक्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना झाल्यामुळे संस्थांचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून येवला शहरातील रस्ते स्वच्छता व दूषित पाणीपुरवठा या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या व माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे या आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट येवला नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना घेराव घालून जा विचारला याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी देखील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले थोड्या दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असा विश्वास मुख्यअधिकारी यांनी व्यक्त केला
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर :-येवला शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून भुरट्या चोरानंतर आता चोरट्यांनी विठ्ठल नगर भागातून चार चाकी वाहनाची चोरी केली आहे. विपुल किशोर भावसार यांच्या मालकीची ईरटीका गाडी चोरी चोरी गेली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत असून पोलिसांची संख्या वाढून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर :-येवला शहरातील म्हसोबा नगर परिसरामध्ये निळकंठेश्वर महादेव मंदिराची स्थापना झाली असून या ठिकाणी परिसरातील रहिवाशांनी लोकसहभागातून मंदिर परिसरामध्ये नारळ बेहडा ,पिंपळ, वड अशा विविध प्रजातीच्या 101 झाडांची लागवड केली आहे पर्यावरण संवर्धनासाठी कॉलनी रहिवाशांच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे
0
Share
Report
Chandwad, Maharashtra:
अँकर :-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भडाणे येथे बनकर वस्तीवर राहणाऱ्या पूजा शरद बनकर वय वर्ष 20 या विवाहितेने अज्ञात कारणाहून आत्महत्या केली या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आत्महत्येचे कारण समोर येईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _ पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांना सोबत घेऊन सातपाटी गावाची पाहणी केली. समुद्राच्या भरती वेळी सातपाटी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरते, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल आणि नुकसान होते.या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार गावित यांनी सांगितले.
0
Share
Report
Nandgaon Rural, Uttar Pradesh:
अँकर :-एकीकडे नाशिक जिल्ह्यात सलग जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील पूर्व भागात अत्याल्प पाऊस झाला असून नांदगावच्या नागा साक्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तर पावसाने हजेरीच लावली नाही त्यामुळे धरणाने तळ गाठला असून धरणात फक्त 8.6 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. या धरणावर नांदगावं शहरासह 42 खेडी पाणी पुरवठा योजना अवलंबुन आहे मात्र धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
0
Share
Report