Back
पालघरच्या आमदार राजेंद्र गावित यांनी पाणी पुरवठा समस्यांवर घेतली महत्त्वाची बैठक!
Palghar, Maharashtra
पालघर _ डहाणू तालुक्यातील बाडापोफरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि विजेच्या समस्यांबाबत आमदार राजेंद्र गावित यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकात या भागातील ग्राम पंचायत सरपंच, प्रतिनिधी तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांना लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन उपस्थित अधिकारी वर्गाने दिले आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे जिल्ह्यातील शिरपूर बस स्थानकाचे दुरावस्था झालेली आहे. बस स्थानक मध्ये खड्ड्यांचा साम्राज्य पसरला असून, या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने प्रवाशांना आणि वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिरपूर आगार बसस्थानक परिसरात खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बसस्थानकाच्या सुरुवातीलाच मोठं मोठ्याप्रमाणात खड्ड्यांमुळे प्रवासींना बसस्थानकात पायी ये जा करतांना कसरत करावी लागते.या खड्ड्यात बस आली तर बसची मागील बाजू खाली घासरली जात असल्याने बसचे देखील नुकसान होत आहे. रिपरिप पाऊसानंरत देखील बसस्थानकात खड्ड्यांमध्ये पाणी जमा होते. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor कैरीचे भाव कमी झाल्याने बाजारपेठेत कैरी घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे.मे महिन्यात लोणचं टाकण्यासाठी कैरी खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते मात्र जून महिन्याच्या अखेरीस कैरीचा भाव कमी होत असल्याने अनेकांकडून जून अखेरीस कैरी खरेदी करण्यास पसंती दर्शविली जात आहे.मे महिन्यात ६० ते ७० रुपये किलो असलेली कैरी आता ३० रुपये किलो प्रमाणे मिळत असल्याने कैरी घेण्यासाठी महिलांची गर्दी होत असून सातपूडा पर्वत रागेंतून येणाऱ्या गावरान कैरीची जास्त मागणी असल्याने गावरान कैरीचे इतर कैरींपेक्षा भाव जास्त आहेत.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- मुलीला भेटण्यासाठी जिंतूर तालुक्यातून परभणीकडे दुचाकीवर येत असतांना अचानक चक्कर येऊन घाम सुटल्याने 36 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. सदर दुचाकीस्वाराला परभणी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. सदर घटना परभणी - जिंतूर रोडवरील नांदापुर पाटीजवळ घडलीय. जिंतूर तालुक्यातील कसर येथील रहिवाशी 36 वर्षीय शिवाजी भोसले हे दुचाकीने परभणीकडे मुलीला भेटण्यासाठी येत होते. नांदापुर येथे आल्यावर त्यांना अचानक घाम सुटला. त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या बाजुला उभी केली. काही नातेवाईकांना फोन करुन माहिती दिली. अचानक चक्कर आल्याने शिवाजी भोसले हे जागेवर पडले. त्यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय साणालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन सदर व्यक्ती मयत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे...
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी येथे शाळकरी मुलांचे शिक्षणासाठीचे हाल दाखवणारी बातमी झी 24 तास दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची दाखल घेतलेली आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी याबाबत ठोस भूमिका घेत, पीडब्ल्यूडी विभागाचे पथक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाठवले. तसंच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सुविधा व्हावी यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल उभारन्याय येईल, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येणारे दिवसांमध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्यात येणार असल्याची ही माहिती मिताली सेठी यांनी दिलेली आहे. झी 24 तास च्या बातमी नंतर आता केलाखडी तील समस्या सुटायला मदत होणार आहे. अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरावा लागत आहे. नदीवर पूल नसल्याने आणि रस्त्याचा अभाव असल्याने या विद्यार्थ्यांना झाडांच्या फांद्या पकडत नदी पार करावी लागते. स्वातंत्र्यापूर्वीपासून रस्ता नसल्याची ही परिस्थिती आजही तशीच असून, या मुलांचा शिक्षणासाठीचा प्रवास अक्षरश जीवघेणा ठरत आहे. याबाबतचे वृत्त झी २४ तासने दाखल नंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे
byte - मिताली शेठी, जिल्हाधिकारी
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_Leopard_CCTV
नागरी वस्तीत दीड महिन्यात चौथ्यांदा बिबट्याचे दर्शन
अँकर
नाशिकच्या पंचवटी भागात असलेल्या बेंडकुळे मळ्यापासून अव्या काही अंतरावर रामवाडी तुला जवळील विरळ नागरी वस्ती पुन्हा काल सकाळच्या सुमारास बिबट्या दिसलाय... झाडीतून बिबट्या बाहेर येऊन रस्ता ओलांडताना भक्षाच्या शोधात असल्याचे दिसले. नंतर बिबट्याने पुन्हा झाडीत धूम ठोकली. बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय... येथे अवघ्या अर्धा किलोमीटरच्या परिसरात दीड महिन्यात चार ते पाच वेळेस बिबट्याचे दर्शन झाले आहे...बिबट्याने दोन वासरांसह तीन ते चार कुत्र्यांना भक्ष बनविले आहे....काल जेथे बिबट्या दिसून आला तेथून सकाळी सात वाजेनंतर विद्यार्थी शाळेत जात असतात. तसेच नागरिकांची रेलचेलदेखील वाढते. नशीब बिबट्या शाळेतील विद्यार्थ्यांची ये-जा सुरू होण्याच्या काही मिनिटे तेथे होता. येथून जवळच बालाजी बेंडकुळे यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले होते. बेंडकुळे यांनी घराच्या खिडकीतून बिबट्याचे छायाचित्रही टिपले होते. तर त्याच्या अवघ्या दहा दिवस अगोदर २३ मे रोजी बिबट्याने वासराला गोठ्यातून बाहेर काढत फरफटत नेत ठार मारले होते. त्यामुळे या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_KOYNA_UPDATE
सातारा - सातारा जिल्ह्यातील कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणारे कोयना धरण जून महिन्यातच 51 टक्के भरले आहे.सध्या धरणात 53.69 टीएमसी पाणीसाठा असून धरणात 30 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होते आहे.सध्या धरणाचा पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात होतो आहे.गेल्या 24 तासात कोयना पाणलोट क्षेत्रात 87 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
0
Share
Report
Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Pm Modi Kharmale
File'01
Rep: Hemant Chapude(JUNNAR )
Anc: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये जुन्नर तालुक्यातील खोडद गावचे वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश खरमाळे आणि त्यांच्या कुटूंबाच्या कार्याचे कौतुक केलंय,खरमाळे यांनी जुन्नरच्या डोंगरदऱ्या खोऱ्यात पहाडांवरती जलसंधारण,वृक्ष लागवत,पशु पक्षांना पानवटे तयार करत समाजाला एक वेगळा संदेश दिलाय आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये त्यांच्या कार्याचं कौतुक केलंंय...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
( पक्ष प्रवेशावेळचा अजित पवार यांचा बाईट, त्यानंतर उद्य़ सामंत यांचा नाराजीचा बाईट, त्यानंतर सुनिल तटकरे यांचा प्रत्युत्तराचा बाईट अशा तीन फ्रेम शक्य झाल्यास कराव्यात)
रत्नागिरी- राष्ट्रवादीतील एका पक्ष प्रवेशाने रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत घमासान
अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर शिवसेनेकडून राजकीय डावपेच
राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना काटशह देण्यासाठी शिवसेनेकडून व्युह रचना
रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय खेळीची चर्चा,
शेखर निकम यांच्या विरोधात विधानसभा लढलेले प्रशांत यादव यांच्याशी शिवसेना साधते जवळीक
अजित यशवंतराव यांच्या मुंबईतील प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमच्यावर टिका करणाऱ्यांना आमच्याशी समन्वय न साधता पक्ष प्रवेशावर घेतला आक्षेप
तर विधानसभेला खालच्या शब्दात सदभावना करणारे नेते, परस्परांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले आता एकमेकांच्या सोबत आलेत
त्यामुळे कुणी कुणाला साधन सुचिता सांगावी हा प्रश्न असं सांगत थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सामंत यांचे टोचले कान
बाईट - अजित पवार उपमुख्यमंत्री
बाईट - उदय सामंत, मंत्री उद्योग
बाईट - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळी वाढ झाली. तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सारंखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे तीन मीटरने उघडले आहेत. बॅरेजचे दरवाजे उघडल्याने पाणीच्या विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. नंदुरबार जिल्हा सोबतच जळगाव आणि धुळे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठाच्या गावांना सतर्कतेच्या इशारा दिला आहे तर सोबतच नदीपात्रात कोणीही मच्छीमार करू नाही असं आवाहन देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरण आणि धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बेरीज चे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून जाणारी तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याने, तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बेरीजचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याच्या विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठी च्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे डोंगररांगांमध्ये दरड कोसळण्याची भीती वाढलेली आहे. ही भीती लक्षात घेत, अक्कलकुवा तालुक्याच्या ग्रामीण भागात जोडणाऱ्या देवगई घाटात दरड कोसळून नाही यासाठी संरक्षण जाळी लावली जात आहे. अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान दरड कोसळत असते त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे. दरड कोसळत असते त्यामुळे अनेक गावांच्या संपर्क आणि घाट बंद होत असतो, त्यामुळे लोखंडी जाळी लावून दरड कोसळणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report