Back
उषाताई शिंदेंचा धाडसी घेराव: येवला नगरपालिकेतील अधिकारी अडचणीत!
SKSudarshan Khillare
FollowJul 01, 2025 01:31:38
Yeola, Maharashtra
अँकर:- अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना झाल्यामुळे संस्थांचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून येवला शहरातील रस्ते स्वच्छता व दूषित पाणीपुरवठा या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या व माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे या आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट येवला नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना घेराव घालून जा विचारला याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी देखील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले थोड्या दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असा विश्वास मुख्यअधिकारी यांनी व्यक्त केला
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowJul 20, 2025 03:33:36Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nmc
कचरा विलगीकरणासाठी मनपा ॲक्शन मोड'वर
अँकर
केंद्र सरकारमार्फत देशभरात ओला कचरा स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यात येते. याअंतर्गत दरवर्षी स्वच्छ शहर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाचे या स्पर्धेचे नववे वर्षे होते. 'स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक'ची बिरुदावली मिरवणारे नाशिक शहर या स्पर्धेत देशभरातील पहिल्या दहा शहरांमध्ये यावे, ही नाशिककरांची इच्छा आहे. मात्र, यापूर्वीच्या आठ स्पर्धामध्ये हुलकावणी देणारे यश यंदाही नाशिक महापालिकेच्या हाती लागू शकले नाही. नाशिकला २२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. देशभरातील पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा समावेश झाला नसण्यामागे पर्याप्त विलगीकरण न होणे, जनतेकडून फीडबॅक न मिळणे ही काही कारणे आहेत. त्यामुळे आयुक्त खत्री यांनी आगामी स्वच्छ शहर स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरात ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण बंधनकारक करताना कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी जनजागृती आराखडा तयार केला जाणार असून, सल्लागार संस्थेमार्फत या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलीये...
1
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 20, 2025 03:33:21Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn encroachment av
Feed attached
कुठलीही पूर्वकल्पना न देता किंवा पडलेल्या मालमत्तांचे पंचनामे न करता मनपाने रस्ता रुंदीकरणाचा धडाका लावला होता. या बाबत प्रचंड टीकाही सुरू होती, याबाबत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शनिवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना या पडलल्या मालमत्तांचे पंचनामे करा व त्यांना प्रमाणपत्र द्या, कारवाईपूर्वी नोटीस द्या, अशा सूचना दिल्या. नियमानुसार असलेल्या बांधकामांनाच भरपाई देण्यात येणार आहे. नियमानुसार बांधलेल्या मालमत्ता रस्ता रुंदीकरणात पडत आहेत. त्यांना मोबदला देण्याबाबत चर्चा करण्यात आली. हा मोबदला प्रामुख्याने टीडीआर स्वरूपात देण्यात यावा, असा पर्याय पुढे आला. टीडीआर नको असेल तर त्यांच्याकडून तशा पद्धतीने लिहून घ्यावे. टीडीआरचे दर वाढवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना १.१ एफएसआय वापरल्यानंतर प्रीमियम वापरता येणार नाही. त्यांना टीडीआरच वापरावा लागेल. टीडीआर वापरून आणखी गरज पडेल असेल तर पैसे भरून प्रीमियम दिला जाईल. बांधकाम परवानगी असलेल्या मालमत्ता पाडू नका. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 20, 2025 03:33:07Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकींग - सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळाले नाही हे पाप त्यांच्यामुळेच झाले आहे, मंत्री जयकुमार गोरे यांचा खा. धैर्यशील मोहिते पाटलांना खोचक प्रतिउत्तर
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बाईट पॉईंटर
ऑन धैर्यशील मोहिते-पाटील
काहींना शिंगं फुटली आणि जिल्ह्याच्या राजकारणाची गणित फिस्कटली असं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं होतं याला उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की ते स्वतःबद्दल बोलले असावेत.
सोलापूर जिल्ह्याचे दुर्दैव आहे की जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री नाही असं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं होतं त्याला उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की-"ते पाप त्यांच्यामुळेच झालं आहे."
साऊंड बाईट -
खासदार धैर्यशील मोहिते पाटील
बाईट -
जयकुमार गोरे ( पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री )
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 20, 2025 03:32:57Yavatmal, Maharashtra:
AVB
शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून काही मागण्या केल्या आहेत. आमचे शक्तिपीठ महामार्गाला समर्थन आहे, मात्र संपादित भूमीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, शेतीचे दोन तुकडे झाल्यास उर्वरित 20 गुंठ्यापर्यंत शेतीचे भसंपादन शासनाने करावे, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला 12 फुटांचा सर्व्हिस रोड देण्यात यावा, पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची व्यवस्था करण्यात यावी. अशा मागण्यां शेतकऱ्यांनी केल्या आहे.
बाईट : सचिन माहुरे
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 20, 2025 03:31:28Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_bike_chor
चोरीच्या महागड्या दुचाकी विक्री करणारी टोळी अटक
अँकर
नाशिक शहरातून चोरी केलेल्या दुचाकी ग्रामीण भागात कमी किमतीमध्ये विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात आलीये... गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने निलगिरी बाग, छत्रपती संभाजीनगर रोडवर ही कारवाई केलीये.... सत्यम उर्फ देवा मिलिंद गरुड, साहिल आझाद शेख , विकास बन्सीलाल कुमावत असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. टोळीकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त केल्या. गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली... एकजण चोरीच्या दुचाकीचा वापर करत आहे... पथकाने सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत गरुड नाव सांगितले. अधिक चौकशी केली असता शेख, कुमावत आणि एक अल्पवयीन मुलाच्या मदतीने शहरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दुचाकी, निफाड, पिंपळगावला विक्री केल्याची कबुली दिलीये.... ही टोळी चोरी केलेली महागडी दुचाकी ग्रामीण भागात अवघ्या १० ते १२ हजारांत विक्री करत होती. कागदपत्रे आणून देतो असे सांगून मिळेल ती रक्कम घेऊन संशयित दुचाकी विक्री करत होते. चोरीच्या दुचाकीचा नंबर बदली करून वापर करत होते. चोरीच्या दुचाकीच्या नंबरप्लेट काढून त्याची अदलाबदल करत दिशाभूल करत होते. चोरीची दुचाकी विक्री करण्याकरिता संशयित आई, आणि कुटुंबातील अन्य व्यक्ती आजारी असल्याचे सांगून पैशांची गरज असल्याने गाडीचा व्यवहार करायचे. असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे....
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 20, 2025 03:30:36Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
- दीपक काटेचा जामीन झाल्यानंतर आपली भूमिका मांडण्यासाठी आज सोलापूर शहरात येण्याची शक्यता
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक हल्ला प्रकरण काहीसे निवळले असताना पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा वादाचा भडका उडण्याची शक्यता
- दीपक काटे पत्रकार परिषद घेण्यासाठी सोलापुरात आला तर पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड आणि दीपक काटे यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता
- त्यामुळे दीपक काटे आज सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार का?
- दीपक काटेच्या पत्रकार परिषद झालीच तर त्यानंतर आणखी कोणते पडसाद उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 20, 2025 03:03:03Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Alefata Theft Open
File:03
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुश्क्या आवळण्यात आळेफाटा पोलिसांना आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून पोलिसांनी पाच आरोपींना जेरबंद केलंय तर अद्यापही पाच आरोपी फरार आहेत अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सध्या आळेफाटा पोलीस करत आहेत
Byte: रविंद्र चौधर (उपविभागीय पोलिस अधिकारी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 20, 2025 03:02:57Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी शहरातील वसमत रोडवर महावितरण च्या वतीने विद्युत वाहिणीस अडथळा ठरणाऱ्या अनेक झाडांची मध्यरात्री कत्तल कट्टल करण्यात आली. विद्युत वाहिणीस अडथळा ठरत नसलेली झाड ही तोडल्याचा वृक्षप्रेमी नागरिकांकडून आरोप होऊ लागला असून जेवढी झाडे तोडली किमान तेवढी झाडे तरी लावा अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांतून महावीतणकडे केली जात आहे...
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 20, 2025 03:01:27Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेल आहे, मंत्री जयकुमार गोरे यांचा राज ठाकरेंना टोला
*ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ऑन राज ठाकरे*
- राज ठाकरे यांनी कधीतरी काहीतरी सुरू करण्यासंदर्भात बोलावं
- बंद करणारी भाषा महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारी भाषा नाही
- महाराष्ट्र मराठी भूमी आहे, जेव्हा आपण विकसीत महाराष्ट्राची भाषा मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत पुढे घेऊन जावं लागतं, हे पुढे घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत
- निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेल आहे...
- या दिवशी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होत आहे अशा घोषणा ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा निघून जाते
- चिमणीच घरट पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घरट कधीच पूर्ण होत नाही..
- तसेच निवडणूक आली की मराठीच प्रेम.. निवडणूक आल्यानंतर मुंबईच प्रेम.. हे जे आहे ते सत्तेपर्यंत कधीही पोहोचवणार नाही
बाईट -
जयकुमार गोरे ( पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री )
1
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 20, 2025 03:01:15Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे शॉक सर्किटमुळे लागलेल्या आगीत चार दुकाने खाक झाली. बसस्थानक परिसराच्या काही अंतरावर असलेले चार व्यावसायिकांचे टेलरिंग शॉपला आग लागली. त्यानंतर गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच पुसद येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 20, 2025 03:00:41Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये गांजा तस्कर तरुणला बेड्या खडकपाडा पोलिसांची कारवाई, पाच लाखाचा मुद्देमाल ही जप्त
Anc... कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पाच लाख किमतीचा गांजा जप्त करत एका तरुणाला अटक केली आहे. रवी गवळी असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
Vio:- १७ तारखेला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली. योगीधाम-अमृतधाम सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, साई दर्शन ढाब्यासमोर आणि वालधुनी नदीच्या काठावर सापळा रचून रवी शिवाजी गवळी याला ताब्यात घेण्यात आले. गवळी हा अनुपमनगर, जयदुर्गे चाळ, खडकपाडा येथील रहिवासी आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्यामुळे रवी गवळीविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Byte :- कल्याणजी घेटे ( कल्याण एसीपी)
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 03:00:32Raigad, Maharashtra:
स्लग - माणगावमधील तरुणांनी केलं खवले मांजराचे संरक्षण ...... सुरक्षित पकडून दिलं वनविभागाच्या ताब्यात ...... पुराच्या पाण्यात वाहत आले मानवी वस्तीत ..... वन्यजीव संरक्षणात खवले मांजराला सर्वोच्च स्थान ......
अँकर - वन्यजीव संरक्षणात सर्वोच्च स्थान असलेले खवले मांजर रात्रीच्या सुमारास माणगाव शहरातील खांदाड परिसरात आढळून आले. स्थानिक तरुणांनी वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याशी संपर्क साधत या खवले मांजराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने त्याला सुखरूप दूर जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. मादी जातीचे हे खवले मांजर अतिशय सशक्त आणि पूर्ण वाढ झालेलं आहे. या परिसरात कुठंही खवले मांजराचा नैसर्गिक अधिवास दिसून येत नाही. पुराच्या पाण्यासोबत ते वाहून इथवर आले असावे असा वन्यजीव अभ्यासकांचा दावा आहे. खवले मांजराला निसर्गात अनन्य साधारण महत्व असून ते नैसर्गिक परिसंस्थांचा महत्वाचा भाग आहे. त्याची तस्करी रोखण्यासाठी कायदा करण्यात आला आहे.
बाईट - शंतनु कुवेसकर , वन्यजीव अभ्यासक
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 20, 2025 02:32:04kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडले आहे.
( मराठी और हिंदी दोनो मे )
-----
*प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने पाठवण्यात आल्या 3 लाख राख्या*
राखी, बहीण भावाच प्रेमाचं नात असलेला हा म्हणजे रक्षाबंधन. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांसाठी प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीने तीन लाख राख्या पाठविण्यात आल्यात. नागपुरातील चिटणवीस सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने 3 लाख राख्या पाठविल्या. प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या कर्नल लवलीना यांना सुपूर्द करण्यात आल्या. . मोठ्या प्रमाणात यावेळेला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.
गेल्या 31 वर्षांपासून प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे हा उपक्रम राबवल्या जात आहे
Byte
कर्नल लवलीना, सैन्य अधिकारी
बाईट
फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, सचिव प्रहार समाज जागृती
≠==========================================================================
*बॉर्डर पर तैनात सैनिकों के लिए भेजी गई 3 लाख राखियां ,आर्मी पोस्टल सर्विस की अधिकारी को सौंप गई राखियां,
बॉर्डर पर तैनात फौजियों के लिए नागपुर से 3 लाख राखियां प्रहर समाज जागृति संस्था के संलग्न विद्यार्थियों ने भेजी है ,पिछले 31 वर्षों से प्रहार समाज जागृति संस्था देश की निस्वार्थ रक्षा करने वाले भारत के बहादुर सैनिकों के लिए राखी भेजती आ रही है ,पिछले वर्ष इन विद्यार्थियों ने ढाई लाख राखी भेजी थी, जिसमें इस वर्ष 50000 का इजाफा करते हुए, इस वर्ष सैनिकों के लिए 3 लाख राखियां भेजी गई ,नागपुर में आयोजित कार्यक्रम में आर्मी पोस्टल सर्विस की कर्नल लवलीना कौ 3 लाख राखीयाँ सौपी गई,
प्रहर समाज जागृति संस्था की छात्राओं ने मुख्य अतिथि कर्नल लवलीना सहित आर्मी पोस्टल सर्विस के जवानों को राखी बाधी , इस आयोजन में नागपुर के 30 से अधिक शिक्षण संस्थाओं ने उनकी संस्थाओं द्वारा बनाई गई राखीयाँ भी फौजियों के लिए सौपा, यह राखियां दूर दराज क्षेत्रों में जहां पर सैनिक विषम परिस्थितियों में अपनी कर्तव्य का पालन कर रहा है, वहां पर यह राखियां भेजी जाएगी ,उसको यह राखियां अहसास दिलाएंगी कि वह अकेला नहीं है, पूरा देश उसके पीछे है ,पूरा देश उसका परिवार है,
इस दौरान कर लवलीना ने कहा कि इस संस्था द्वारा गत वर्ष की तुलना में 50000 अधिक रखीयाँ भेजी जा रही है, यह राखियाँ सैनिकों को देश की रक्षा करने के लिए प्रेरित करती है, यह राखी हमारे देश की रक्षा करने का दायित्व प्रदान करती है, उन्होंने आगे कहा की राखियां फौजियों तक पहुंचाने का दायित्व उन्हें दिया गया है, वह अच्छे तरीके से फौजियों तक यह राखियां, राखी से पहले पहुंचा देंगे ,
प्रहर समाज जागृति संस्था की सचिव रिटायर फ्लाइट लेफ्टिनेंट शिवाली देशपांडे ने बताया कि 3 लाख राखियों के साथ-साथ प्रहार के विद्यार्थियों ने देश के जवानों के लिए कुछ संदेश, कई बार सैनिकों को छुट्टी नहीं मिलती, रक्षाबंधन पर जाकर रक्षाबंधन पर अपने परिवार के साथ राखी बंधवाए ,इसलिए यह राखियां हमारे संस्था के बच्चे भेजते हैं, संस्थान या लक्ष्य रखा है कि अगले वर्ष के तीन लाख की संख्या को बढ़ाकर 4 लाख राखियां भेजी जाएगी,
2
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 20, 2025 02:31:56Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2007_BHA_HOSPITAL_CHECK
FILE - 3 VIDEO
आरोग्य विभागाकडून श्याम हॉस्पिटलची चौकशी सुरू
Anchor :- साकोली येथील श्याम हॉस्पिटल येथे ९ जुलैला एका १७ वर्षीय
अल्पवयीन मुलीसोबत डॉ. देवेश अग्रवाल याने सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते. याची पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपी डॉक्टर तेव्हापासून फरार आहे. याबाबत, शनिवार, १९ जुलैला आरोग्य विभाग भंडारा चमु संध्याकाळी श्याम हॉस्पिटलचे निरीक्षक करण्यासाठी आली होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आरोग्य विभाग चमुने
येथे कागदोपत्री कारवाई केली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
3
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 20, 2025 02:31:51Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_RECORD
हरित धाराशिव, धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी लावली 15 लाख झाडे, एशिया बुक आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.
नोंद होणारा धाराशिव ठरला पहिला जिल्हा
अँकर
धाराशिव_हरित धाराशीव उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात 15 लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या उच्चांकी वृक्ष लागवडीची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. वृक्ष लागवडीत या दोन्ही संस्थेत नोंद होणारा धाराशिव जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. 234 ग्रामपंचायत नगरपरिषदा व नगरपालिकेच्या 5 हजार हेक्टर क्षेत्रात ही वृक्षलागवड करण्यात आली आहे. सिने अभिनेता स्वप्निल जोशी व परिवहन मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाई यांच्या उपस्थितीत ही वृक्ष लागवड करण्यात आली .जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून मोठी तयारी करून ही वृक्ष लागवड यशस्वी केली. धाराशिवीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या या झाडांची जपणूक व संवर्धन करण्याचं मोठं आवाहन प्रशासन व नागरिकांसमोर असणार आहे.
Byte प्रताप सरनाईक पालकमंत्री
1
Share
Report