Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने मित्राचा खून! धक्कादायक घटना सांगलीत!

Sarfaraj Musa
Jul 01, 2025 01:32:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने मित्राचा,दोघा अल्पवयीन मित्रांकडून खून.. अँकर - समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने एका मित्राचा त्याच्या अल्पवयीन मित्रांकडून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या आरग येथे घडला आहे.सुजल पाटील वय,21 असं मृत तरुणाचं नाव आहे, आर्मी मधील एका तलावामध्ये अर्धनग्न अवस्थेत सुजल याचा मृतदेह आढळून आला होता. सुजल आणि त्याचे दोघे मित्र हे बेळंकी या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले होते, त्यानंतर तिघेही दुचाकीवरून घरी परतत असताना,आरग मधल्या बेळंकी रोडवरील तलावाजवळ पोहोचले असता,दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रांकडून सुजल याच्यासोबत समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र सुजलने विरोध केल्याने,चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल याला मारहाण करत तलावातल्या पाण्यात बुडवून ठार करत अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला,या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सुजलच्या दोघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतला आहे.मात्र समलैंगिक संबंधातून अल्पवयीन मित्रांकडूनच मित्राचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बाईट - अजित सिद - पोलीस निरीक्षक,मिरज ग्रामीण..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement