Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Apr 15, 2025 08:30:20
Sangli, Maharashtra
सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 28, 2025 09:01:53
Chandrapur, Maharashtra:टायटल: काँग्रेसला मित्र पक्ष नकोत, शिवसेना उबाठा चा चंद्रपुरात वंचित शी घरोबा, 66 पैकी समसमान जागा लढविणार, काँग्रेसने कुठलीही चर्चा न केल्याचा शिवसेना उबाठाचा आरोप तर वंचित ला काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्याने नवी आघाडी केल्याचा वंचित नेत्यांचा दावा अँकर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुक शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढविण्याची घोषणा केली. चंद्रपुरात आयोजित पत्रपरिषदेत एकमेकांना स्वताच्या पक्षाचे दुपट्टे घालून एकत्र आल्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली. दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान म्हणजे 33-33 उमेदवार उभे करणार आहेत. काँग्रेस कडून सन्मानजनक वाटा न दिल्याने आम्ही युती करत असल्याचं म्हणत दोन्ही पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र दोन्ही पक्ष भाजप विरोध या मुद्यावर एकत्र आले असल्याचा खुलासा करण्यात आलाय.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 28, 2025 08:54:08
Ratnagiri, Maharashtra:गुहागर तालुक्यातील झोंबडी गावच्या माळरानाला भीषण आग गुहागर guhu g? (Note: Original content preserved as provided) "गुहागर तालुक्यातील झोंबडी गावच्या माळरानात आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सत्रात ही आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वडव्यामधील मोठ्या प्रमाणावर गवत जळून खाक झाले असून आगीचा वेग वाढल्याने झाडे जळून नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र कडक उन्हामुळे आणि वाऱ्याच्या झोतामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. आगीमुळे परिसरातील माळरान पूर्णपणे काळवंडले असून पुढील नुकसान टाळण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 28, 2025 08:33:17
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... - नाशिकमध्ये युतीची शक्यता धूसर, भाजपकडून 122 जागा पैकी 85 जागांची मागणी... - भाजप पक्षात इच्छुकांच्या संख्या जास्त, इलेक्ट्रिव मेरिट वर जागा मिळाव्या- भाजप शहराध्यक्ष - नाशिक भाजपकडून 85, शिंदेसेनेकडून 45तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागांचा प्रस्ताव... - शेवटच्या क्षणापर्यंत भाजप मित्र पक्षांना सोबत घेण्यासाठी करणार प्रयत्न - भाजप शहराध्यक्ष. - तीनही पक्षांचे प्रमुख नेते दिलेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार भाजपचे सुनील केदार यांची माहिती... - नाशिकमध्ये युतीचे घोडे अडकले जागा वाटपावर, शिंदे सेनेनंतर भाजपकडूनही 122 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी... बाईट: सुनील केदार,शहराध्यक्ष भाजप नाशिक.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 28, 2025 07:45:17
Washim, Maharashtra:अँकर : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रात दिगंबर व श्वेतांबर पंथीय भाविकांमध्ये वादातून घडला होता.२५ डिसेंबर रोजी झालेल्या वादानंतर दिगंबर समाजाचे विजय जैन यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग धरून २६ डिसेंबर रोजी काही श्वेतांबर पंथीयांनी विजय जैन यांना मंदिर परिसरातून जबरदस्तीने उचलून नेत ५ ते ६ जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे या मारहाणीत विजय जैन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.ही घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही व मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.दिगंबर समाजाने प्रकरणाची माहिती थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि शिरपूर पोलिसांच्या भूमिकेविरोधात आज दुपारी २ वाजता शिरपूर येथे दिगंबर पंथीयांकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 28, 2025 07:19:00
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 28, 2025 07:18:19
Pandharpur, Maharashtra:ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणाचे बटण दाबले ते स्वर्गात जाणार, सांगोल्यातील विजयी सभेत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांचा अजब दावा सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा सत्कार कार्यक्रमात माजी आमदार शहाजी पाटील यांनी तुफान टोल बाजी केली माजी आमदार दीपक साळुंखे म्हणतात मी किंग मेकर मी जिकडे तिकडे विजय असा त्यांचा दावा होता. पण ते पांढऱ्या पायाचे आहेत. अशी घाणघाती टीका माजी आमदार पाटील यांनी केली. यांची उदाहरणे देताना शहाजी बापू म्हणाले गणपत आबा कडे गेला त्यांचा पराभव झाला, विजय सिंह मोहिते कडे गेला त्यांचा पराभव झाला, लोकसभेला संजय शिंदे कडे गेला त्यांचा पराभव झाला, पुन्हा निंबाळकर कडे गेला त्यांचा पराभव झाला. आता भाजप कडे गेला त्यांचा पराभव झाला. दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचा आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 28, 2025 05:52:17
Amravati, Maharashtra:सन्मानजनक जागा दिल्या तरच युतीत लढू, शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांची भूमिका; आज युतीचा फैसला होण्याची शक्यता अँकर : अमरावती महापालिका में युती संदर्भात भाजप और शिंदे यांच्या शिवसेनेच्या नागपूर और अमरावतीत अनेक बैठका पार पडल्या आहे. मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असल्याने युतीची घोषणा होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे. अशातच शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी युतीच्या प्रस्तावावर भाष्य केलं असून आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या तरच युतीत लढू अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आता युती होते ही युतीत बिघाडी होते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. दरम्यान आज महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर येथे भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये युतीची अंतिम बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो आणि युतीची घोषणा होते का याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 28, 2025 05:50:27
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 28, 2025 05:35:05
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... चाकूर तालुक्यातील नायगाव शिवारात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बार मालक दुकान बंद करत असतानाच, तिघे दारूच्या नशेत बारमध्ये आले आणि दारू तसेच सिगारेट देण्याचा आग्रह करू लागले. बार मालकाने ते देण्यास नकार दिल्यानंतर सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणातच हाणामारीत बदलला. तिघांनी मिळून बार मालकाला बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. गजानन कासले असं मृत बार मालकाचे नाव आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top