Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

मराठी नव वर्ष के अवसर पर सिंधुदुर्ग पुलिस को मिली 28 नई गाड़ियाँ

UPUmesh Parab
Mar 19, 2026 07:16:24
Ranbambuli, Maharashtra
मराठी नव वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस ताफ्यात 28 नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. जिल्हा नियोजनच्या निधीतून हया गाड्या देण्यात आल्या असून त्याचे हस्तांतरण गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी नितेश राणे यांनी हया गाड्यांमुळे सिंधुदुर्ग पोलीस दल अजून बळकट झाल्याचा विश्वास व्यक्त केलाय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 19, 2026 08:16:32
593
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 19, 2026 08:02:09
896
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 08:00:12
Akola, Maharashtra:अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील एका चहा टपरीवर काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. “तू काय पाहत आहेस माझ्याकडे?” या कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला.या वादादरम्यान तीन युवकांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्धैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी केवळ सहा तासांत तीन आरोपींना दर्यापूर येथून अटक केली. आरोपी मध्य प्रदेशकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
889
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 19, 2026 07:48:46
909
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 19, 2026 07:47:53
Kolhapur, Maharashtra:परंपरेला फाटा देत कोल्हापूर शहरा शेजारी पाचगाव इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेचे अध्यापक डॉ.संजय जगताप गुरुजी यांनी आपल्या घरी पारंपारिक गुढी न उभारता घरातील स्वतःच्या ग्रंथालयातील व स्वलिखित पुस्तकांची ज्ञानाची आणि परिवर्तनाची गुढी उभारली. पुस्तकेच्या गुढीचे हे सातवे वर्ष आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे समाजात वाचण्याची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून जगताप यांनी उभारलेली गुढी परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून श्री.व्ही.टी. पाटील फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून वाचू आनंदे प्रकल्प सुरू केला आहे.
928
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 19, 2026 07:19:49
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात महायुतीचे नगरसेवक एकमेकांच्या विरोधात भिडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत. काल कोल्हापूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाली, या सभेत राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास आणि शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख एकमेकांना जोरदार भिडल्याचे दिसून आले. इतकंच नाही तर चौकात ये बघून घेतो, आम्ही बांगड्या घातल्या नाहीत असे वक्तव्य करत एकमेकाला भर सभागृहात धमकी दिली. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास आणि शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपाराणी निकम यांनी या दोघांनाही शांत राहण्यासंदर्भात कान टोचले, पण या दोघांमधील वाद थांबताना दिसत नाहीयेत. महानगरपालिकेच्या सभागृहात हे दोघेही एकमेकाला बघून घेण्याची भाषा करत असल्याचे पाहून सभागृहातील नगरसेवकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीदेखील या दोघांमधील शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात बोलताना कोल्हापूर शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यानी दोघांशीही चर्चा झाली आहे, असं पुन्हा होऊन येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.
1074
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 19, 2026 07:18:52
Ranbambuli, Maharashtra: सिंधुदुर्ग- मंत्री नितेश राणे बाईट मुद्दे- आज हिंदू नवीन वर्षाच्या सर्वात प्रथम मी महाराष्ट्राच्या सर्वच जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला अजून ताकद देणे, सक्षम करणे आणि पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठेवणे हेच आमचे आदरणीय मुख्यमंत्री (आणि) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्य संकल्पना आहे. ​आणि म्हणून आज आमच्या सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये हे नवीन वाहनं जे आम्ही जिल्हा नियोजनाच्या निधीच्या माध्यमातून दिलेले आहेत, त्याचे हस्तांतरण गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. *ऑन गारपीट, अवकाळी पाऊस-* जसं आंबा आणि काजू संदर्भात गेल्या तीन दिवसांपूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली की, निसर्गामुळे जे काही नुकसान होतंय, प्रामुख्याने आंबा-काजू या संदर्भात, अधिवेशन संपण्यापूर्वीच त्या पद्धतीची नुकसान भरपाई म्हणा किंवा सरकारची मदत म्हणा, आम्ही देण्यासाठी सज्ज आहोत. त्या पद्धतीची तयारी सरकार म्हणून आम्ही करतोय. *​ऑन हर्षवर्धन सकपाळ वक्तव्य बारामती पोट निवडणूक-* ​शेवटी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. अजित दादांसारखा एक मोठा नेता जेव्हा आपल्यातून निघून गेला, तर *सगळ्यांनी बिनविरोध ती सीट करणे ही एक भावना आहे आणि त्या पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता त्या चौकटीत जर काँग्रेसवाले बसत नसतील, तर ते त्यांच्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे प्रदर्शन करतायत.* आज प्रत्येक पक्षाची हीच भावना आहे की, दादांसारखा एक ताकदीचा नेता आपल्याकडून निघून गेल्यामुळे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे, म्हणून ती बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. *पण काँग्रेसच्या निर्लज्जपणाला काही कधीच टोक नाहीच. बाईट- नितेश राणे मंत्री
1094
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 19, 2026 07:16:52
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रौत्सवाचा जल्लोष मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कार्यालयात देवींची पूजा करण्यात आली प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे आयोजित चैत्र नवरात्रौत्सवाचा आज सायंकाळी ६ वाजता मंगल नगर येथील जनसंपर्क कार्यालयातून भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला ढोल-ताशांच्या गजरात आणि अलोट गर्दीत आई जगदंबेचे आगमन मिरवणूक निघाली त्यात स्वतः मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले होते संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. १९ ते २८ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात भाविकांना भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. आईच्या दरबारात सहभागी होण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरकराना आव्हान केले आहे उत्सवाचे स्वरूप यंदा अत्यंत भव्य आणि दिव्य असणार आहे. बाईट- प्रताप सरनाईक ,
1040
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 19, 2026 06:48:23
933
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 19, 2026 06:46:19
1083
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 19, 2026 06:33:11
Amravati, Maharashtra:अमरावतीत काँग्रेस कडून गुढीपाडवा महोत्सवाचे आयोजन; सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा असे म्हणत काँग्रेस कडून अनोखा निषेध अमरावती शहरातील राजकमल चौकात आज काँग्रेस पक्षाकडून गुढीपाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 101 फुटाची गुढी उभारून या गुढीपाडवा महोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधीवध गुढीची पूजा करून सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी महिला काँग्रेसच्या वतीने शहरातून टू व्हीलर रॅली सुद्धा काढण्यात आली होती. आखाती देशातील युद्धाच्या परिणाम नंतर देशात सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असतानाही सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा? अशा प्रकारचे प्रतीकात्मक पोस्टर लावून यावेळी काँग्रेसच्या वतीने सरकारचा निषेध सुद्धा करण्यात आला. जनतेची भावना आहे की सिलेंडर झाला आडवा आणि कसा करू गुढीपाडवा? या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारखे आहे. जे सत्तेमध्ये आहे त्यांनी जो कळवटपणा पसरवलेला आहे तो कळवटपणा सत्याधराच्या मनातला व जनतेच्या आयुष्यातून कमी होवो, व त्यांच्या मनात थोडा तरी गोडवा यावा, सोबतच आमच्या आयुष्यातील कळवटपणा दूर होऊन गोडवा यावा अशी प्रतिक्रिया माजी मंत्री काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी दिली
1098
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 19, 2026 06:05:36
Ambernath, Maharashtra:बदलापुरात नववर्ष स्वागत यात्रेचा उत्‍साह ढोलताशांच्या गजरात दुमदुमली निघाली नववर्ष स्‍वागत यात्रा; आज बदलापुरात सकाळ पासूनच नववर्ष स्वागत यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला , महिलांच्या ढोल पथकांचा गजर, जोडीला भगव्या ध्वज पथाकांची साथ, त्याला लहानग्यांची लेझीमची जोड, सोबत दुचाकीवर पारंपरिक पैठणी परिधान केलेला महिला वर्ग आणि विविध विषयांवरील सामाजिक संदेश देणारे चित्ररथ असे आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. या स्वागत यात्रेत लहानग्यांसोबत वृद्ध आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बदलापुर कात्रप परिसरातील श्रीराम प्रतिष्ठान यांनी कात्रप परिसरात तर हनुमान मारूती देवस्थान यांच्या वतीने गांधी चौकात ही स्वागत यात्रा काढण्यात आली होती या स्वागत यात्रेत बदलापुरातील विविध सामाजिक संस्था आणि मंडळांनी चित्ररथही साकारले होते. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आले ,
1088
comment0
Report
Advertisement
Back to top