Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

घर में पुस्तकीय गुढी से पढ़ने की प्रेरणा दे रहे डॉ. संजय जगताप

PNPratap Naik1
Mar 19, 2026 07:47:53
Kolhapur, Maharashtra
परंपरेला फाटा देत कोल्हापूर शहरा शेजारी पाचगाव इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेचे अध्यापक डॉ.संजय जगताप गुरुजी यांनी आपल्या घरी पारंपारिक गुढी न उभारता घरातील स्वतःच्या ग्रंथालयातील व स्वलिखित पुस्तकांची ज्ञानाची आणि परिवर्तनाची गुढी उभारली. पुस्तकेच्या गुढीचे हे सातवे वर्ष आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे समाजात वाचण्याची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून जगताप यांनी उभारलेली गुढी परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून श्री.व्ही.टी. पाटील फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून वाचू आनंदे प्रकल्प सुरू केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 19, 2026 09:15:23
Shirur, Maharashtra:निसर्ग कोपलाय... आणि नशीब फाटलंय! ज्या मातीतून सोनं उगवण्याची स्वप्नं पाहिली, त्याच मातीने आज शेतकऱ्याचे अश्रू प्यायलेत. पश्चिम महाराष्ट्राचा वैभव असलेल्या पुणे जिल्ह्यात आभाळ फाटलं आणि इंदापूर, बारामतीसह शिरूरच्या काळजाला घरं पडलीत! कुठे सोसाट्याचा वारा, तर कुठे आभाळातून बरसणारे पांढरे गारांचे गोळे! अवघ्या काही मिनिटांच्या या निसर्ग कोपाने उभा शेतीमाल आडावा झालाय बळीराजा च्या डोळ्यात अश्रृ आलेत. आब्याच्या बागात कैय्रांच खच गळून पडलाय गव्हाचं सोनं काळं पडलंय, तर टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झालाय. हा पाऊस नव्हता... हा बळीराजाच्या घामावर पडलेला नियतीचा घाव होता! नुकसान ग्रस्त शेतकरी: नाना फुलसुंदर नुकसान ग्रस्त शेतकरी: गणेश जामदार सांगा आता आम्ही जगायचं कसं? खतं, बी-बियाणं आणि औषधांसाठी कर्ज काढलं होतं. पीक काढणीला आलं की कर्ज फेडू ही आशा होती, पण या गारांनी सगळं स्वप्नच चिरडून टाकलं. वावरात आता फक्त चिखल आणि अश्रू उरलेत! टोमँटो उत्पादक शेतकरी जगाचा पोशिंदा आज स्वतःच्या अन्नासाठी हवालदिल झालाय. बाजारभाव पडलेत म्हणून आधीच कंबरडं मोडलं होतं, आता निसर्गाने उरलं सुरलंही हिरावून नेलंय. आता प्रश्न एकच आहे... सरकारला या रडणाऱ्या डोळ्यांची आणि पडलेल्या शेतीमालाची दखल घ्यायला वेळ मिळेल का? की पुन्हा एकदा पंचनाम्यांच्या खेळात बळीराजाचा जीव टांगणीला लागणार? धर्मराज रासकर (नुकसान ग्रस्त शेतकरी) बळीराजा संकटात सापडलाय मदतीची हाक देतोय. त्यामुळ जगाच्या पोशिद्यांची आर्त हाक ऐकून मायबाप सरकार बळीराजा च्या मदतीला धावणार का हे येत्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे. बारामती वरून जावेद मुलाणी सह शिरूर वरूण हेमंत चापुडे झी मिडीया पुणे...
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 09:00:52
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 19, 2026 08:40:51
Latur, Maharashtra:मराठवाड्यावर पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा... गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान... गुढीपाडव्याच्या आनंदावर विरजण... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू... हिंगोली, बीड, लातूरमध्ये पावसाचे थैमान... उभी पिकं जमिनीवर... मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे... हिंगोली, बीड, लातूरसह संभाजीनगरच्या काही भागात गारपीट आणि वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे.. खास करून हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. नव्या सुरुवातीचा, स्वप्नांना पंख देणारा आणि समृद्धीची चाहूल देणारा गुढीपाडवा सण आज साजरा होत असतानाच... अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात दुःखाचं सावट निर्माण केलं आहे... वर्षभर कष्ट करून उभी केलेली पिकं एका रात्रीत जमिनीवर आडवी झाली... नेमकी काय आहे मराठवाड्यातील परिस्थिती पाहूया ZEE 24 TAAS चा स्पेशल रिपोर्ट...
1031
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 19, 2026 08:16:32
1043
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 19, 2026 08:02:09
1028
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 08:00:12
Akola, Maharashtra:अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील एका चहा टपरीवर काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. “तू काय पाहत आहेस माझ्याकडे?” या कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला.या वादादरम्यान तीन युवकांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्धैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी केवळ सहा तासांत तीन आरोपींना दर्यापूर येथून अटक केली. आरोपी मध्य प्रदेशकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
1082
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 19, 2026 07:48:46
950
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 19, 2026 07:19:49
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात महायुतीचे नगरसेवक एकमेकांच्या विरोधात भिडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत. काल कोल्हापूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाली, या सभेत राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास आणि शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख एकमेकांना जोरदार भिडल्याचे दिसून आले. इतकंच नाही तर चौकात ये बघून घेतो, आम्ही बांगड्या घातल्या नाहीत असे वक्तव्य करत एकमेकाला भर सभागृहात धमकी दिली. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास आणि शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपाराणी निकम यांनी या दोघांनाही शांत राहण्यासंदर्भात कान टोचले, पण या दोघांमधील वाद थांबताना दिसत नाहीयेत. महानगरपालिकेच्या सभागृहात हे दोघेही एकमेकाला बघून घेण्याची भाषा करत असल्याचे पाहून सभागृहातील नगरसेवकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीदेखील या दोघांमधील शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात बोलताना कोल्हापूर शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यानी दोघांशीही चर्चा झाली आहे, असं पुन्हा होऊन येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.
1081
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 19, 2026 07:18:52
Ranbambuli, Maharashtra: सिंधुदुर्ग- मंत्री नितेश राणे बाईट मुद्दे- आज हिंदू नवीन वर्षाच्या सर्वात प्रथम मी महाराष्ट्राच्या सर्वच जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला अजून ताकद देणे, सक्षम करणे आणि पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठेवणे हेच आमचे आदरणीय मुख्यमंत्री (आणि) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्य संकल्पना आहे. ​आणि म्हणून आज आमच्या सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये हे नवीन वाहनं जे आम्ही जिल्हा नियोजनाच्या निधीच्या माध्यमातून दिलेले आहेत, त्याचे हस्तांतरण गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. *ऑन गारपीट, अवकाळी पाऊस-* जसं आंबा आणि काजू संदर्भात गेल्या तीन दिवसांपूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली की, निसर्गामुळे जे काही नुकसान होतंय, प्रामुख्याने आंबा-काजू या संदर्भात, अधिवेशन संपण्यापूर्वीच त्या पद्धतीची नुकसान भरपाई म्हणा किंवा सरकारची मदत म्हणा, आम्ही देण्यासाठी सज्ज आहोत. त्या पद्धतीची तयारी सरकार म्हणून आम्ही करतोय. *​ऑन हर्षवर्धन सकपाळ वक्तव्य बारामती पोट निवडणूक-* ​शेवटी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. अजित दादांसारखा एक मोठा नेता जेव्हा आपल्यातून निघून गेला, तर *सगळ्यांनी बिनविरोध ती सीट करणे ही एक भावना आहे आणि त्या पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता त्या चौकटीत जर काँग्रेसवाले बसत नसतील, तर ते त्यांच्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे प्रदर्शन करतायत.* आज प्रत्येक पक्षाची हीच भावना आहे की, दादांसारखा एक ताकदीचा नेता आपल्याकडून निघून गेल्यामुळे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे, म्हणून ती बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. *पण काँग्रेसच्या निर्लज्जपणाला काही कधीच टोक नाहीच. बाईट- नितेश राणे मंत्री
1094
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 19, 2026 07:16:52
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रौत्सवाचा जल्लोष मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कार्यालयात देवींची पूजा करण्यात आली प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे आयोजित चैत्र नवरात्रौत्सवाचा आज सायंकाळी ६ वाजता मंगल नगर येथील जनसंपर्क कार्यालयातून भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला ढोल-ताशांच्या गजरात आणि अलोट गर्दीत आई जगदंबेचे आगमन मिरवणूक निघाली त्यात स्वतः मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले होते संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. १९ ते २८ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात भाविकांना भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. आईच्या दरबारात सहभागी होण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरकराना आव्हान केले आहे उत्सवाचे स्वरूप यंदा अत्यंत भव्य आणि दिव्य असणार आहे. बाईट- प्रताप सरनाईक ,
1079
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 19, 2026 06:48:23
933
comment0
Report
Advertisement
Back to top