सांगली जिल्ह्यातील शिक्षक भरती विरोधात अल्पसंख्याक कन्नड भाषिक डीएड-बीएड पदवीधर संघटनेने धरणे आंदोलन केले आहे. राज्य सरकारने निवृत्त शिक्षकांची पुन्हा भरती केल्याने बेरोजगार पदवीधरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, तातडीने ही भरती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात संघटनेचे नेते सदाशिव खरात आणि पांडुरंग कोळी यांनी मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.