Back
अकोला में डाबकी रोड हत्या केस के तीनों आरोपी छह घंटे में गिरफ्तार
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 08:00:12
Akola, Maharashtra
अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील एका चहा टपरीवर काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. “तू काय पाहत आहेस माझ्याकडे?” या कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला.या वादादरम्यान तीन युवकांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्धैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी केवळ सहा तासांत तीन आरोपींना दर्यापूर येथून अटक केली. आरोपी मध्य प्रदेशकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:15:230
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 09:00:520
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 19, 2026 08:40:511031
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 08:16:321043
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 08:02:091028
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 19, 2026 07:48:46950
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:47:531022
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:19:491081
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:18:521094
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 19, 2026 07:16:521079
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:16:241052
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 07:01:00994
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 07:00:321089
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 19, 2026 06:48:23933
Report