Back
अजित पवार के अंतिम संस्कार के दौरान गहनों की चोरी, बारामती पुलिस ने 7 चोर पकड़े
JMJAVED MULANI
Feb 02, 2026 11:52:12
Baramati, Maharashtra
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी गर्दीत दागिन्यांची चोरी....चोरी करणारे ७ चोरट्यांना बारामती तालुका पोलिसांकडून अटक..... राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारा वेळी भल्या मोठ्या गर्दीत गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी केल्यानंतर राज्यभरातून त्या ठिकाणी अनेक अजित पवार प्रेमी उपस्थित होते त्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले ते दागिने आपल्याला परत मिळतील मात्र सोन्यापेक्षा जास्त मौलवान असे अजित पवार आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत अशी प्रतिक्रिया अंत्यविधी ठिकाणाहून चोरी झालेल्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिलीय. बारामती तालुका पोलिसांनी सात चोरट्यांना अटक केली आहे. राजकुमार बाबुराव आठवले , मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस , एजाज भगु मीरावले , मोहम्मद सादिक मोहम्मद गफार, बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, तुषार कैलास मासाळ, नितीन अंकुश गायकवाड आदी आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार किशोर वीर, तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार, जितू शिंदे, हनुमंत खटके यांनी सहभाग घेतला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 13:33:300
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 02, 2026 13:00:450
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 12:49:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 12:46:520
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 02, 2026 12:30:410
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 12:03:360
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 11:52:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 11:46:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 02, 2026 10:50:500
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 02, 2026 10:47:000
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 10:46:120
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 02, 2026 10:37:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 10:31:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 02, 2026 10:21:270
Report