Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला महानगरपालिका में भाजपा ने सत्ता संभाली, शारदा खेडकर महापौर और अमोल गोगे उपमहापौर निर्वाचित

JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 13:33:30
Akola, Maharashtra
अकोला महानगरपालिकेत 38 नगरसेवकांची संख्या असलेल्या भाजपने 45 नगरसेवकांची शहर सुधार आघाडी स्थापन करत सत्ता स्थापन केली आहे.महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या शारदा खेडकर यांनी उबाठाच्या उमेदवाराचा 13 मतांनी पराभव करत विजय मिळवला. त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी भाजपचे उमेदवार अमोल गोगे यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर 13 मतांनी विजय मिळवला आहे. आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) तसेच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर पदाचा पदग्रहन सोहळा पार पडला. पदग्रहणानंतर महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी महानगरपालिकेतील आपल्या कक्षात प्रवेश करत अधिकृतपणे कामकाजाला सुरुवात केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Feb 02, 2026 14:18:06
Pimpri-Chinchwad, Maharashtra:भाजपचे सलग दोन वेळा बिन विरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडे यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उप महापौर पदासाठी शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपने महापौर पदासाठी सुरवातीला रवि लांडे आणि उप महापौर पदासाठी शीतल उर्फ विजय शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र शीतल शिंदे यांनी उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी नाराजी दाखवल्या नंतर ऐनवेळी भाजपने शर्मिला बाबर यांना उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी लावलं आहे. रवि लांडे हे महापौर पदासाठी आणि शर्मिला बाबर यांनी उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करत असताना पिंपरी चिंचवड भाजप मध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली आहे. महापौर आणि उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करत असताना पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघन उर्फ बापू काटे हे देखील उपस्थित नव्हते तर शीतल शिंदे यांच्या सह बरेच भाजप नगरसेवक हे गैर हजर असल्याचं पाहायला मिळालं आहे. शत्रुघन काटे हे देखील पिंपरी चिंचवड महापालिका मध्ये महापौर पदासाठी इच्छुक असल्याची जोरदार चर्चा पिंपरी चिंचवड शहरात सुरू होती. मात्र आमचा पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष असून लवकरच बाकी इच्छुक पदाधिकाऱ्याबद्दल योग्य निर्णय घेण्यात येईल अशी माहिती माध्यमांशी बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप गट नेते प्रशांत शितोळे यांनी दिली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 02, 2026 14:11:21
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 02, 2026 14:10:56
Baramati, Maharashtra:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर पवार कुटुंबाच्या सांत्वन भेटीसाठी सहयोग सोसायटी निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी... 28 तारखेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर पवार कुटुंबीयासह बारामतीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. सायंकाळी नंतर बारामती मधील सहयोग सोसायटी निवासस्थानी बारामतीकरांनी सांत्वनपर भेटी घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.. सहयोग निवासस्थानी सर्वच पवार कुटुंबीय उपस्थित आहे.. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार, अजितदादा यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, सहयोग निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटत आहेत...
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 02, 2026 13:50:24
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग — माजी आमदार वैभव नाईक पत्रकार परिषद ऑन नितेश राणे ( निधी देणार नाही वक्तव्य ) — मागील निवडणुकीत माझ्या उमेदवारांना निवडून द्या असे अनेक वेळा नितेश राणे बोलले आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला यश आलं मग तुम्ही किती निधी दिला हा प्रश्न आहे? नितेश राणेनी आधी आपल्या लोकप्रतिनिधीना निधी द्यावा त्यांचे प्रतिनिधी वणवण फिरत आहेत. ऑन बॅनर ( उमेदवार फोडले ) — शिवसेना पक्षाचे एबी फॉर्म घेऊन काही उमेदवार निवडणुकीत उभे होते त्यांना 25- 25 लाख रुपये देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले काही पण जे ठाम आहेत त्यांच्यासाठी आम्ही लढू रवींद्र चव्हाण यांनी मागील निवडणुकीत ह्यांना पैसे पुरविले होते मात्र आता त्यांनी यांच्यावरील आपला हात काढून घेतलाय.. त्यामुळे हे पैसे वाटू शकत नाहीत म्हणुन निवडणুক बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत.. ऑन बजेट — अनेक बजेट होऊन गेली मात्र मुंबई गोवा महामार्ग का पूर्ण झाला नाही हे बजेट पूर्णतः निराशाजनक आहे. हे बजेट शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.. ऑन 25 जागा बिनविरोध — मतदार संघात या लोकांची दहशत आहे. ऑन सतीश सावंत भाजपा प्रवेश — सतीश सावंतचा प्रवेश नेमका कशासाठी घेतलाय. पक्ष वाढीसाठी कि काही लोकांना थांबवण्यासाठी .... सतीश सावंत यांचा प्रवेश हा भाजपाला घातक आहे ऑन एकनाथ शिंदे दौरा — आमचे आमदार खासदार नसताना सुद्धा आम्ही लढतोय..शिवसेनेला कितीही विरोध केला तरी शिवसैनिक पुन्हा उभा राहिलाय... निवडणुकीची भिती असल्याने त्यांना वारंवार जिल्ह्यात यावं लागतंय
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 02, 2026 13:50:05
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार आता जागृत झाले आहेत. सध्याच्या राजकारण्यांच्या भ्रष्ट आणि कपटनीतीच्या राजकारणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी होतेय. त्याची जाणीव सर्वसाधारण मतदारांना झालीय. त्यामुळे उबाठाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबत जनतेच्या मनात अपार सहानुभूती निर्माण झालीय आहे. एका बाजूला धनशक्ती आणि जनशक्ती अशी ही लढत असेल आणि जनशक्तीचा विजय होईल. पालकमंत्री नितेश राणे— पालकमंत्र्यांची ही मस्ती आम्ही एक ना एक दिवस जिरवूच.. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या पालकमंत्र्याला संविधानाच्या दृष्टीने त्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. पक्षपाती दृष्टिकोन मनात ठेवून जर निधीच वाटप करणारा पालकमंत्री मिळालाय हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच दुर्दैव म्हणावं लागेल.. आम्ही त्यांना संविधानाच्या माध्यमातून धडा शिकवू. ज्या पद्धतीने विमानाचा अपघात झाला त्या विमानात पाचच प्रवासी असल्याचं पहिल्या दिवसापासून जाहीर केलं जात होत. तो सहावा नंबर मिटकर यांनी कुठून आणला हे त्यांनीच जाहीर कराव.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 02, 2026 13:00:45
Navi Mumbai, Maharashtra:ठाणे में एकनाथ शिंदे बनाम गणेश नाईक के बीच शुरू हुई शाब्दिक लड़ाई Navi Mumbai पहुंचते-पहुंचते बेटे का बाप कौन पर आकर ठहर गई है। गणेश नाईक की चुनौती पर शिवसेना-शिंदे गट के उपनेता विजय चौगुले ने जवाब दिया, जिस पर नाईक समर्थकों ने उसे निशाने पर लिया। वनमंत्री गणेश नाईक ने भाजपा के समर्थन से शिंदे का नाम-ओनिशान मिटाने की धमकी दी थी, जिसे अब जवाब में तंज माना गया है। नेतृत्‍यबद्ध टीका-टिप्पणी अब एक-दूसरे के बेटे-बेटी पर आकर टिक गई है; चौगुले ने कहा, “शिंदे नामोनिशान मिटाने से पहले सूरज को भी नाम दें जिसे आपने जिंदा रखा है।” नाईक समर्थकों ने चुनौती दी कि चौगुले अपने बेटे का नाम भी नहीं दे पाएंगे, Schauham चौगुले उनका बेटा है—यह दावा किया गया। इस पूरे विवाद में राजनीतिक स्तर घटता दिख रहा है, पर नवी मुंबई के नागरिकों में नाराजगी साफ है।
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 12:49:28
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील तुषार कॉलनीत अज्ञात व्यक्तीने दोन उभ्या कारला आग लावल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. या आगीत कार्तिक सूरसे आणि गणेश गुडापे यांच्या मालकीच्या दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनची माहिती मिळताच कारंजा नगरपालिकाेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत दोन्ही कार पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून, कारला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी कार मालकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 12:46:52
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर–वाशिम रोडवरील विद्युत केंद्राजवळ असलेल्या विटभट्टी परिसरात खेळताना विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलीस व मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पडकी व कच्ची विहीर असतानाही पथकाच्या जवानांनी मोठ्या धाडसाने विहिरीत उतरून एका तासाच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. मृत मुलगी कु.सुंदरी धनसिंग सिसोदिया, वय तीन वर्षे, राहणार झीर पांजरीया, तालुका नेपानगर, जिल्हा बुरहानपूर अशी तिची ओळख पटली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 02, 2026 12:30:41
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 02, 2026 12:03:36
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 11:52:55
Akola, Maharashtra:Anchor : संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या ‘बेगमपुरा’ या समतावादी संकल्पनेतून प्रेरणा घेत अकोला शहरातील न्यू तापडिया नगर येथे गुरु रविदास प्रतिष्ठानच्या वास्तूचे भूमिपूजन सोहळा पार पडला.विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सामूहिक रविदास जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.समाजहितासाठी उभारण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात चर्मकार समाजासह सर्व समाजघटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.प्रस्तावित प्रकल्पांतर्गत या ठिकाणी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून, पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण सहाय्य, तसेच आरोग्य व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला चर्मकार समाजातील अधिकारी, कर्मचारी, समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 02, 2026 11:52:12
Baramati, Maharashtra:अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी गर्दीत दागिन्यांची चोरी....चोरी करणारे ७ चोरट्यांना बारामती तालुका पोलिसांकडून अटक..... राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारा वेळी भल्या मोठ्या गर्दीत गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी केल्यानंतर राज्यभरातून त्या ठिकाणी अनेक अजित पवार प्रेमी उपस्थित होते त्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले ते दागिने आपल्याला परत मिळतील मात्र सोन्यापेक्षा जास्त मौलवान असे अजित पवार आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत अशी प्रतिक्रिया अंत्यविधी ठिकाणाहून चोरी झालेल्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिलीय. बारामती तालुका पोलिसांनी सात चोरट्यांना अटक केली आहे. राजकुमार बाबुराव आठवले , मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस , एजाज भगु मीरावले , मोहम्मद सादिक मोहम्मद गफार, बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, तुषार कैलास मासाळ, नितीन अंकुश गायकवाड आदी आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार किशोर वीर, तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार, जितू शिंदे, हनुमंत खटके यांनी सहभाग घेतला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करत आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 02, 2026 11:46:18
0
comment0
Report
Advertisement
Back to top