Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला में गुरु रविदास प्रतिष्ठान के भूमिपूजन से 100-बेड अस्पताल परियोजना शुरू

JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 11:52:55
Akola, Maharashtra
Anchor : संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या ‘बेगमपुरा’ या समतावादी संकल्पनेतून प्रेरणा घेत अकोला शहरातील न्यू तापडिया नगर येथे गुरु रविदास प्रतिष्ठानच्या वास्तूचे भूमिपूजन सोहळा पार पडला.विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सामूहिक रविदास जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.समाजहितासाठी उभारण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात चर्मकार समाजासह सर्व समाजघटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.प्रस्तावित प्रकल्पांतर्गत या ठिकाणी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून, पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण सहाय्य, तसेच आरोग्य व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला चर्मकार समाजातील अधिकारी, कर्मचारी, समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 13:33:30
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेत 38 नगरसेवकांची संख्या असलेल्या भाजपने 45 नगरसेवकांची शहर सुधार आघाडी स्थापन करत सत्ता स्थापन केली आहे.महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या शारदा खेडकर यांनी उबाठाच्या उमेदवाराचा 13 मतांनी पराभव करत विजय मिळवला. त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी भाजपचे उमेदवार अमोल गोगे यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर 13 मतांनी विजय मिळवला आहे. आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) तसेच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर पदाचा पदग्रहन सोहळा पार पडला. पदग्रहणानंतर महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी महानगरपालिकेतील आपल्या कक्षात प्रवेश करत अधिकृतपणे कामकाजाला सुरुवात केली आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 02, 2026 13:00:45
Navi Mumbai, Maharashtra:ठाणे में एकनाथ शिंदे बनाम गणेश नाईक के बीच शुरू हुई शाब्दिक लड़ाई Navi Mumbai पहुंचते-पहुंचते बेटे का बाप कौन पर आकर ठहर गई है। गणेश नाईक की चुनौती पर शिवसेना-शिंदे गट के उपनेता विजय चौगुले ने जवाब दिया, जिस पर नाईक समर्थकों ने उसे निशाने पर लिया। वनमंत्री गणेश नाईक ने भाजपा के समर्थन से शिंदे का नाम-ओनिशान मिटाने की धमकी दी थी, जिसे अब जवाब में तंज माना गया है। नेतृत्‍यबद्ध टीका-टिप्पणी अब एक-दूसरे के बेटे-बेटी पर आकर टिक गई है; चौगुले ने कहा, “शिंदे नामोनिशान मिटाने से पहले सूरज को भी नाम दें जिसे आपने जिंदा रखा है।” नाईक समर्थकों ने चुनौती दी कि चौगुले अपने बेटे का नाम भी नहीं दे पाएंगे, Schauham चौगुले उनका बेटा है—यह दावा किया गया। इस पूरे विवाद में राजनीतिक स्तर घटता दिख रहा है, पर नवी मुंबई के नागरिकों में नाराजगी साफ है।
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 12:49:28
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील तुषार कॉलनीत अज्ञात व्यक्तीने दोन उभ्या कारला आग लावल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. या आगीत कार्तिक सूरसे आणि गणेश गुडापे यांच्या मालकीच्या दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनची माहिती मिळताच कारंजा नगरपालिकाेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत दोन्ही कार पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून, कारला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी कार मालकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 12:46:52
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर–वाशिम रोडवरील विद्युत केंद्राजवळ असलेल्या विटभट्टी परिसरात खेळताना विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलीस व मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पडकी व कच्ची विहीर असतानाही पथकाच्या जवानांनी मोठ्या धाडसाने विहिरीत उतरून एका तासाच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. मृत मुलगी कु.सुंदरी धनसिंग सिसोदिया, वय तीन वर्षे, राहणार झीर पांजरीया, तालुका नेपानगर, जिल्हा बुरहानपूर अशी तिची ओळख पटली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 02, 2026 12:30:41
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 02, 2026 12:03:36
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 02, 2026 11:52:12
Baramati, Maharashtra:अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी गर्दीत दागिन्यांची चोरी....चोरी करणारे ७ चोरट्यांना बारामती तालुका पोलिसांकडून अटक..... राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारा वेळी भल्या मोठ्या गर्दीत गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी केल्यानंतर राज्यभरातून त्या ठिकाणी अनेक अजित पवार प्रेमी उपस्थित होते त्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले ते दागिने आपल्याला परत मिळतील मात्र सोन्यापेक्षा जास्त मौलवान असे अजित पवार आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत अशी प्रतिक्रिया अंत्यविधी ठिकाणाहून चोरी झालेल्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिलीय. बारामती तालुका पोलिसांनी सात चोरट्यांना अटक केली आहे. राजकुमार बाबुराव आठवले , मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस , एजाज भगु मीरावले , मोहम्मद सादिक मोहम्मद गफार, बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, तुषार कैलास मासाळ, नितीन अंकुश गायकवाड आदी आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार किशोर वीर, तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार, जितू शिंदे, हनुमंत खटके यांनी सहभाग घेतला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करत आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 02, 2026 11:46:18
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 10:50:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में शिवसेना और भाजप, युति के रूप में जिल्हा परिषद निवडणुका लढवत आहेत मात्र ही सर्व काही कागदावरच आहे का असा प्रश्न पडतोय कारण निवडणुकांच्या प्रचारात भाजप शिवसेने विरोधात चांगलं आक्रमक झाला आहे पालकमंत्र्यांनी धोका दिला दगाबाजी केली अशा पद्धतीचा आरोप ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी प्रचार सभेत केला आहे आणि त्यामुळे वातावरण चांगलंच तापले आहे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे या सगळ्या महापालिकेची चूक सुधारून शिवसेना-भाजपने युती केली मात्र प्रत्यक्षात ही युती फक्त कागदावरच आहे एकूण 63 जागांपैकी फक्त 16 जागांवरच या दोन्ही पक्षांची युती आहेत, इतर जागांवर दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना बी फॉर्म दिले आहेत त्यामुळे थेट आमने सामने लढत आहे त्यात लढत मैत्रीपूर्ण लढू अशा पद्धतीचा सुरुवातीला सांगण्यात येत असताना भाजपाने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर हल्लाबोल केला आहे पालकमंत्र्यांनी दगा दिला शिवसेनेने बेईमानी केली अशा पद्धतीचा आरोप भाजप नेते अतुल सावे यांनी केला आहे आणि त्यामुळे भाजपाला निवडून द्या असा आवाहन ते जनतेला करत आहेत... भाजपची ही सातत्याने टीका शिवसेना आलेला आहे झोंबत आहे त्यामुळे आता शिवसेनेनेही पलटवार केला आहे, ते कामही करू शकतो मात्र आम्ही शांत आहोत आमच्या सोबत बसा कोणी युती तोडली आणि कोण दगाबाज आहे याचे उत्तर मिळेल असं शिवसेनेचे म्हणणं आहे एकीकडे दोन्ही पक्ष युतीत आहेत, आणि एकमेकांवर टीका करण्याचे हे पक्ष संधी सोडत नाहीये.. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा हा प्रचार मतदारांचा मात्र चांगलंच मनोरंजन करत आहे, त्यात मतदार या टीकेच्या प्रचारात कोणाला कौल देतात यावरच दोन्ही पक्षाचं विजयाचे गणित अवलंबून आहे
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 02, 2026 10:47:00
Dharashiv, Maharashtra:धाराशिव मी महायुतीचा समन्वयक म्हणून काम केलंय या दोन वर्षांच्या काळात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाचा विषय कधीच काढला नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या बैठका, व्हायच्या माहिती राबवत असलेले योजना धोरण याच्यावर चर्चा झाली होती, यात सुनील तटकरे व प्रफुल पटेल हा विषय कधीच ठरलेला नव्हता. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलनीकरणावर चर्चा अजित दादांनी केली नसल्याचं मत व्यक्त केलं होतं, त्यानंतर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण दावा केला आहे. अजित दादा महाराष्ट्राचे भूषण होते, त्यांच्या नेतृत्वाला कोणीच डाग देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्या घातपाताचा विचारही कोणी करू शकत नाही; मात्र ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणेकडे आहेत आणि सत्य जे दिसेल ते बाहेर येईल. अश्याच परिस्थितीत अजित दादांच्या अपघाताबद्दल उगाच संभ्रम निर्माण नये यासाठीही बावनकुळे यांनी स्पष्टवक्ता भूमिका घेतली आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 02, 2026 10:46:12
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद काल अर्थ संकल्प सादर करण्यात ला जिल्हा परिषद निवडणुकीच्या धमधूमीत त्याकडे दुर्लक्ष होऊ नये त्यात आमच्या जिल्ह्याला जे मिळाल त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आहे कालच बजेट कोकणाच्या अर्थ कारणच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे 500 नवीन तलाव उभारण्यात येणार आहेत त्यामुळे मासेमारीला चालना मिळेलолд अभ्यासिक रूप से समुद्रात पकडलेले मासे कर मुक्त करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय फळ उत्पादनाला हाय वाल्यू क्रॉप चा दर्जा देण्यात आलाय कोकणातील नारळ बागांसाठी सुद्धा योजना राबविण्यात येणार आहे त्याचा फायदा कोकणाला मिळणार मुख्यमंत्रीांनी केवळ बैठका घेतल्या नाहीत तर कोकण आणि कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी 3244 कोटीची तरतूद केंद्र सरकार कडून करुन घेतलीय सी प्लेन विझीएफ योजना सुरु करण्यात आलीय त्याचा फायदा कोकणातील पर्यटणाला मोठी कलाटणी मिळेल भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प नरेंद्र मोदीजींनी केलाय त्यानुसार ते त्या दिशेने वाटचाल करत आहेत येणाऱ्या चार वर्षात कोकणाचा काया पालट होईल जनतेचा सकारात्मक प्रतिसाद आहे महायुतीसाठी पोषक वातावरण आहे धनुष्य बाण आणि कमळ चिन्ह वाल्याना निधी मिळणार अपक्ष उमेदवार असलेल्याना काही मिळणार नाही अपक्षाला मत घालून आपलं मत वाया घालवू नका विरोधक कमकुवत आहेत त्यामुळे बिनविरोध पॅटर्न दिसला हि सुरवात आहे उबाठा कडून उमेदवारांना ताकद मिळत नाही कमळ आणि धनुष्यबान समोरील बटण दाबा आणि भरघोस निधी मिळवा मंत्री नितेश राणे यांची घोषणा ऑन एकनाथ शिंदे दौरा महायुती म्हणुन त्यांच आम्ही स्वागत करू अर्थ संकल्पावर हिंदी byte ऑन ए आर रहमान जो ए आर रहमान ने हिंधू राष्ट्र के विरुद्ध टिपणी कि उसके बाद उसको कपिल शर्मा शो मे बुलाया गया अगर ऐसा कोई इस्लाम के खिलाप बोला तो उसको मारा जाता हमारे हिंदू राष्ट्र के बारे मे ऐसा बोलेगा तो हम चूप नाही बैठेंगे
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 02, 2026 10:37:33
Yeola, Maharashtra:• मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद मुद्दे • मंत्री छगन भुजबळ On राष्ट्रवादी विलीनीकरण... - दोघे ठाकरे जसे एकत्र आले तशी पवार एकत्र यावे - परंतु अशा काही चर्चा झाल्या, असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगले की माझ्याशी कधीही हे बोलले नाही..कल्पनाही नाही.. - जे काही करायचे ते आम्हाला बीजेपी सोबत राहून करायचे.. - असं काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला bjp ला विचारावे लागेल.. - भाजपचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनाही विचारावं लागेल कोणाला घ्यायचे कोणाला नाही घ्यायचे... - काय बोलणं झाले हे किंवा बोलणे झाले असेल, काय बोलणे झाले हे माझ्यासहीत कोणालाही माहीत नाहीये.. - मुख्यमंत्र्यांना तर विचारावेच लागेल ना.. - यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना... - जर सरकार मधून बाहेर पडायचे असेल NDA बरोबर जायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे... - असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही... - आम्ही उपमुख्यमंत्रीची निवड केली...त्यांचे नेतृत्व आहे.. - त्यांच्या नेतृत्वात चर्चा होगील ना, आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असे काही नाही... - राजकारणाच्या गोष्टी कधी होतात कधी नाही होतात... • मंत्री छगन भुजबळ On शशिकांत शिंदे ( शपथ घेऊन सांगितले ) - बरं झाले असेल ; - परंतु आता परिस्थिती बदलली नेते बदलले आहेत... - त्यांना त्याची काही माहिती होती का घरात ? सुनेत्रा ताईना.. - विचारतील बघतील त्यांना काय करायचे ते.. - त्यांच्या नेतृत्वाखालील बाकी नेते देखील चर्चा करतील.. - शेवटि हा निर्णय सामुदायिक रीतीने घ्यावे लागेल.. - त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपला सुद्धा उभे राहणे आवश्यक आहे ...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 02, 2026 10:31:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:नशेखोरांच्या त्रासामुळे संतप्त ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन. सांगलीमध्ये खुनाची मालिका सुरूच आहे, खुनाच्या घटनेवरून संतप्त झालेल्या नागरिकांनी आज थेट सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला, पोलीस अधीक्षकांकडुन निवेदन स्वीकारण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून ठिय्या आंदोलन केलं. सुमारे तास भर पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठा गोंधळ सुरू होता, दोन दिवसांपूर्वी इनाम धामणी येथील एका शेतकऱ्याचा विश्रामबाग लिमया मळा येथे नशेखोरांकडून निर्घृण खून करण्यात आला होता, त्यानंतर शहरातल्या नशेखोरी व गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाल्याने, संतप्त इनाम धामणीतील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला आहे, त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी आणि नशेखोरीवर पोलिसांनी तातडीने आळा घालावा, अशी मागणी करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आली आहे. अखेर पोलीस अधीक्षका संदिप घुगे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारत, तातडीने याबाबत कारवाई केली जाईल, असा आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 02, 2026 10:21:27
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप ही महायुती म्हणून लढते तर काही ठिकाणी स्वतंत्र लढते या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपा कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह आरोग्य व्यवस्था भक्कम करणे... अंगणवाड्या समृद्ध करणे यांसह ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल प्रशस्त करण्याचा समावेश त्यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या नवनवीन योजना या घरोघरी पोहोचवून त्याचा लाभ नागरिकांना करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top