Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411037

पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा

Sept 24, 2024 05:46:17
Pune, Maharashtra

पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 13, 2025 03:45:12
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील बानगे इथल्या राजेंद्र गोविंदा शिंदे यांनी तब्बल 51 हजार रुपये किमतीची कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ही चप्पल सर्वोत्कृष्ट ठरून कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केलं आहे. तब्बल ५१ हजार रुपयांची किंमत चप्पल आता इटलीला पाठवली जाणार आहे. राजेंद्र शिंदे हे ‘कोल्हापुरी चप्पल डेव्हलप प्रोजेक्ट’चे मास्टर ट्रेनर असून त्यांनी या क्षेत्रात २५ वर्षे या क्षेत्रात काम केले आहे. आगामी काळात एक लाख रुपयांच्या नाविन्यपूर्ण चपला तयार करण्याचा त्यांचा मानस असून, गिनिज बुकमध्ये कोल्हापुरी चप्पलचा समावेश व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 13, 2025 03:33:45
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरलगत असनाऱ्या नागरी वसाहतींच्या आणि गावांच्या सुनियोजित विकासासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४० अन्वये 'विशेष नियोजन प्राधिकरण' (SPA) हा महत्त्वपूर्ण दर्जा दिला आहे. या प्रस्तावामुळे प्राधिकरणाच्या कक्षेतील ४२ गावांमधील विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असून, कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये सुनियोजित विकासाचे एक नवीन पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीने कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर याचे आभार मानले आहेत.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 13, 2025 03:33:28
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 13, 2025 03:32:55
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर प्लेझंट पार्क मध्ये फर्निचर दुकानाला आग अग्निशमन जवानांकडून आगीवर नियंत्रण पालिकेच्या निष्काळजीपनामुळे आग लागल्याचा आरोप अँकर - मीरा–भाईंदरच्या प्लेझंट पार्क परिसरात मध्यरात्री भीषण आगीची घटना घडली आहे. अनधिकृतरित्या सुरू असलेल्या एका फर्निचर दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, दाट धुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वी दोन वेळा आग लागल्याच्या घटन घडल्या होत्या. तरीही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही आग लागल्याचे सांगितले जात असून, पुढील चौकशी सुरू आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 03:32:29
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर गेले असून सकाळी व रात्री तीव्र थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे, मफलर, टोपी यांचा वापर सुरू केला आहे.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत.थंडीचा विशेष फटका लहान मुले व वृद्ध नागरिकांना बसत असून सर्दी, खोकला व इतर आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, गरम कपड्यांचा वापर करावा,तसेच लहान मुले व वृद्धांची योग्य निगा राखावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 13, 2025 03:18:09
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग มाजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना आज अखेरचा निरोप.... सकाळी साडे नऊ वाजता देवघरहून अंत्ययात्रा, ११ वाजता वरवंटी येथे अंत्यसंस्कार.... लातूरमध्ये आज राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती... लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे राहणार उपस्थित.... लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर नेते हे येणार आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने देशाने एक अनुभवी, संयमी नेतृत्व गमावले आहे. अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 03:01:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू राहणार नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामे रखडण्याची भीती व्यक्त केली जातेय, आचारसंहितेपूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली वाढल्या आहेत.या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांना शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या फायलींना प्राधान्य देत त्या तातडीने टेंडर स्तरापर्यंत नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी मिळावी, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे चित्र आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 13, 2025 03:00:58
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 03:00:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नळ पाणीपुरवठा योजनांच्या ७३ कामांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. याबाबत संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला आहे, खुलासा प्राप्त होताच पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. २५ योजनांची प्राथमिक चौकशी करण्याची कार्यवाही सुरू आहे, या प्रकरणात जिल्ह्यातील आमदार प्रशांत बंब, विलास भुमरे, संजना जाधव यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेशी निगडित कार्यकारी अभियंता, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन समिती, त्रयस्थ तपासणी संस्था व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करीत संगनमताने निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करीत चुकीची मोजमापे नोंदवून मोठा गैरव्यवहार केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. हा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता. विधिमंडळात चर्चा झाल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे. यावर आता सखोल चौकशी होऊन कारवाईची अपेक्षा आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top